पनवेल : रामप्रहर वृत्त – राज्यामध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद देत आहे. पनवेलमध्ये व्यापार्यांसह नागरिकांनी लॉकडाऊनचे कडक पालन केले आहे. जागो जागो शुकशुकाट पहावयास मिळत आहे. तसेच एकीकडे नियमांचे उल्लंघन करणार्यांवर …
Read More »Monthly Archives: July 2020
पनवेलकरांना गुड न्यूज! देहरंग धरण भरले
पनवेल : रामप्रहर वृत्तगेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या दमदार पावसामुळे पनवेल तालुक्यातील देहरंग धरण पूर्णपणे भरले आहे. यामुळे पनवेलकरांचा वर्षभराचा पाणीप्रश्न सुटला आहे. पनवेल महापालिकेच्या मालकीचे असलेले देहरंग धरण 125 हेक्टर क्षेत्रावर बांधण्यात आले आहे. पनवेल शहरातील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी हे धरण महत्त्वपूर्ण आहे. या धरणातून पनवेल शहराला रोज 12 …
Read More »कर्जत आगारातून प्रवासी वाहतूक सुरू
ग्रामीण भागातही गाड्या सुरू करण्याची मागणी कर्जत ः बातमीदारराज्य परिवहन मंडळाच्या कर्जत आगारातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पनवेल, अलिबाग आणि खोपोली या शहरांत जाण्यासाठी प्रवासी वाहतूक राज्य परिवहन मंडळाने सुरू केली आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांची नाळ एसटीसोबत जुळली असल्याने ग्रामीण भागातही एसटी गाड्या सुरू …
Read More »बाळासाहेबांच्या ‘त्या’ भूमिकेने धक्काच बसला होता -शरद पवार
मुंबई ः प्रतिनिधीआणीबाणीच्या काळात संपूर्ण देश इंदिरा गांधींच्या विरोधात होता. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे इंदिरा गांधींसोबत उभे राहिले. नुसतेच उभे राहिले नाहीत, तर महाराष्ट्राच्या निवडणुकीत मी उमेदवारही उभा करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने आम्हाला सगळ्यांना धक्काच बसला होता, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणीबाणीच्या काळातील …
Read More »‘तो’ मेसेज म्हणजे अफवा!
मुंबई : प्रतिनिधीसोशल मीडियावर सध्या 140 या अंकाने सुरुवात होणार्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसीव्ह केल्यास आपल्या खात्यातील सर्व रक्कम काढली जाते, असा मेसेज व्हायरल होत आहे, मात्र या व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. जोपर्यंत बँक अकाऊंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड …
Read More »आता अभिनेत्री केतकी चितळेकडून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख
मुंबई : प्रतिनिधीस्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने शोदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असतानाच आता मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर एक पोस्ट लिहून महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे ती ट्रोल होत आहे.जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. हा व्हिडीओ सोशल …
Read More »गणेशमूर्तीला उंचीचे बंधन
राज्य सरकारकडून भाविकांसाठी नियमावली मुंबई : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने 12 मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीच्या उंचीला चार फुटांचे, तर घरगुती मूर्तीला दोन फुटांचे बंधन घालण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी राज्यातील गणेशोत्सव मंडळांसोबत बैठका घेतल्या होत्या. त्यात झालेल्या चर्चेनुसार राज्य …
Read More »कोरोनाबाधितांची विक्रमी वाढ
देशात दर तासाला हजारापेक्षा जास्त रुग्ण नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात शनिवारी (दि. 11) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 27 हजार 114 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ आहे. याचाच अर्थ दर तासाला एक हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित देशात आढळून येत आहेत. यासोबतच देशात गेल्या चार …
Read More »रायगडात 384 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 11) कोरोनाच्या 384 रुग्णांची भर पडली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 169, पनवेल ग्रामीण 54, पेण तालुक्यातील 38, उरण 30, खालापूर 28, अलिबाग 18, कर्जत 15, मुरूड 12, पोलादपूर 10, रोहा सहा, महाड दोन, तळा व श्रीवर्धन …
Read More »पोलीस, विद्यापीठ कर्मचार्यांना मदतीचा हात
माणगाव ः प्रतिनिधीकोरोनाच्या संकटकाळात समाजासाठी झटणारे वाहतूक पोलीस, लोणेरे विद्यापीठातील कर्मचारी व गोरेगाव येथील महिला पोलिसांना माणगावमधील मुभा रुरल डेव्हलपमेंट अॅण्ड एज्युकेशन सामाजिक संस्थेमार्फत मदतीचा हात देण्यात आला. संस्थेचे सहसंस्थापक सुशील कदम यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हस्के, शिवम कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर माणगावचे संस्थापक भालचंद्र खाडे, लोणेरे विद्यापीठाचे प्रा. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper