Breaking News

Monthly Archives: August 2020

घराच्या छताचे प्लास्टर कोसळले

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईमध्ये सध्या घरातील छत पडण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रविवारी (दि. 16) सीबीडी बेलापूर सेक्टर 4 या इमारतीतील ग बी, 10/11/4:1 या घराच्या छताचे प्लास्टर कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणासही दुखापत झाली नसली तरी कुटुंबातील व्यक्ती थोडक्यात बचवल्या. मात्र यामुळे फर्निचरचे किरकोळ …

Read More »

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने खारघर टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांना मिळाला न्याय

खारघर : प्रतिनिधी लॉकडाऊनमध्ये अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असताना सायन-पनवेल महामार्गावरील खारघर टोल नाक्यावर मागील सात वर्षांपासून कार्यरत असलेल्या 39 कर्मचार्‍यांना एप्रिल महिन्यापासून कामावरून तडकाफडकी कमी करण्यात आले होते. टोल कंत्राटदाराच्या या भूमिकेमुळे कामगारांनी आंदोलनाचा पर्याय निवडला होता, परंतु या आंदोलनापूर्वी झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने पहिल्या टप्प्यात 17 कामगारांना कामावर …

Read More »

पनवेल तालुक्यात 212 नवे रुग्ण

तिघांचा मृत्यू; 153 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 16) कोरोनाचे 212 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 153 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 148 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 125 रुग्ण बरे …

Read More »

तांबडी घटनेप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा! अन्यथा अधिवेशन काळात मोर्चा काढणार; मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा

रोहे : प्रतिनिधी मराठा समाजाच्या समन्वयकांनी रविवारी (दि. 16) रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील अत्याचारात बळी गेलेल्या मुलीच्या कुटुंबीयांची दुसर्‍यांदा भेट घेत सांत्वन केले. या वेळी त्यांनी या घटनेत न्याय मिळवून देण्यासाठी समस्त मराठा समाज एकवटला आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी; अन्यथा येत्या अधिवेशन काळात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा …

Read More »

रायगडात 15 रुग्णांचा मृत्यू; 329 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 16) 15 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, 329 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे 304 रुग्ण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये कर्जत तालुक्यातील चार, पनवेल तीन, रोहा व अलिबाग प्रत्येकी दोन आणि उरण, खालापूर, पेण व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर …

Read More »

स्वावलंबी अन् आरोग्यपूर्ण भारत

भारतीय स्वातंत्र्याचा 73वा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा झाला असला तरी उत्साह कायम होता. ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. देशाला स्वावलंबी बनविण्याबरोबरच देशवासीयांचे आरोग्य जपण्याचा निर्धार यंदा पंतप्रधानांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी… भारताला लाभलेले सक्षम व खंबीर असे …

Read More »

नवी मुंबईत होणार कृत्रिम तलावांची निर्मिती

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गणपती विसर्जन काळात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिका, नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने शहरात 125 कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असला, तरी कृत्रिम तलावांची भर पडल्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि विसर्जन स्थळावर गर्दी …

Read More »

रोडपाली येथे आरोग्य शिबिर, औषधांचे वाटप

कळंबोली : प्रतिनिधी किशोर धर्मा पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. हर्षली एकनाथ कडके यांच्या टीमने कोरोनाच्या महासंकटात रोडपालीगाव व परिसरातील नागरिकांना दिलासा देताना विविध आजारांवरील मोफत आरोग्य शिबिर व औषधे यांचे वाटप करण्यात आले. या वेळी शेकडो नागरिकांची तपासणी करण्यात आली. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या महामारीत नागरिक मोठ्या …

Read More »

खारपाटील गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण

पनवेल : वार्ताहर आदर्श शिक्षक गजानन गणू खारपाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या परिवाराकडून दशक्रिया विधी आणि उत्तरकार्यादिनी चिरनेर स्मशानभूमी आणि खाडी येथे वड, पिंपळ रोपांची लागवड करण्यात आली. गुरुजींचा शैक्षणिक वारसा स्मरणात राहण्याकरिता दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येईल, असे त्यांचे पुत्र पत्रकार मिलिंद खारपाटील यांनी या ठिकाणी जाहीर केले. या …

Read More »

‘रोटरी’तर्फे कळंबोलीत रक्तदान शिबिर

कळंबोली : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ कळंबोली यांच्या सौजन्याने शनिवारी (दि. 15) स्वतंत्र दिनी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. समाज मंदिर कळंबोली येथे आयोजित या रक्तदान शिबिरात 58 रक्तदात्यानी रक्तदान केले. या वेळी शासन नियमांच्या अधिन राहून त्याचे काटेकोर पालन करत नागरिकांनी मोठ्या …

Read More »