Breaking News

Monthly Archives: August 2020

विद्यार्थी मारहाणीचा पनवेलमध्ये निषेध

उत्तर रायगड भाजयुमो राज्य सरकारविरोधात आक्रमक पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना काळात शैक्षणिक शुल्कात 30 टक्के कपात करा, ज्या परीक्षा झाल्याच नाहीत त्यांचे शुल्क परत करून विद्यार्थ्यांना दिलासा द्या, या मागण्यांचे पत्र द्यायला गेलेल्या धुळे शहरातील विद्यार्थ्यांना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पालकमंत्री सत्तार अब्दुल यांच्यासमोर अमानूष मारहाण करण्यात आली. …

Read More »

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच!

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच, असे कोर्टाने शुक्रवारी (दि. 28) स्पष्ट केले तसेच परीक्षा घेतल्याशिवाय कोणतेही राज्य विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा …

Read More »

मंदिरे खुली करण्यासाठी आज घंटानाद आंदोलन

पनवेल : कोरोना काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ’मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्यातील मांस, मदिरा सर्वकाही सुरू केले, मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ’हरी’ला बंदिस्त करून ठेवले आहे. सर्व धार्मिक स्थळे व मंदिरे तत्काळ खुली करण्यात यावी, या मागणीसाठी देवस्थान व धार्मिक संस्थांच्या वतीने शनिवारी (दि. 29) ’दार …

Read More »

गौरी-गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन

नवी मुंबई : बातमीदार गणेश चतुर्थीला वाजत गाजत झालेल्या आगमनानंतर  बाप्पाला व माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईला निरोप देण्यात आला.  बाप्पांना व गौरींना दुपारपासूनच निरोप देण्यास सुरुवात झाली. या वेळी पालिकेचे मंडप नवी मुंबईतील प्रत्येक तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ सजलेले  दिसले तसेच या मंडपात स्वयंसेवक, पालिकेचे अधिकारी व पोलीस देखील सज्ज होते. तलावात …

Read More »

लाखोंची चोरी 10 दिवसांत उघड

कर्जत : बातमीदार दहिवली येथील मार्केट यार्डमध्ये असलेल्या मानस एजन्सी या नावाचे होलसेल दुकानातील खायची बिस्कीट आणि रोख रक्कम अशी पावणे चार लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कर्जत पोलिसांनी यशस्वी तपास करताना अवघ्या 10 दिवसांत मुद्देमालासह चोरट्यांना ताब्यात घेतले. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत कर्जत शहरात असलेल्या …

Read More »

‘रोटरी’तर्फे आदिवासींना अन्नधान्य

मुरुड, रेवदंडा : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सी फेस व रोटरी क्लब ऑफ अलीबाग सी शोअर यांच्या संयुक्त विद्यमाने खानाव जवळील वेलटवाडी या आदिवासी वाडीवरील निसर्ग चक्रीवादळग्रस्त पंचवीस आदिवासी कुटुंबियांना एका कार्यक्रमात अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले गेले. या वेळी नायब तहसीलदार अजित टोळकर, सर्कल अधिकारी मोकल, तलाठी …

Read More »

माथेरानच्या डोंगरातील वाड्या रस्ते आणि विजेच्या प्रतीक्षेत

वन जमिनीतून जागा देण्याची मागणी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात असलेल्या 12 आदिवासी वाड्या या रस्ता आणि काही वाड्या विजेपासून वंचित आहेत. येथील आजारी रुग्णाला आजही डोली करून आणावे लागत आहे. दरम्यान, आदिवासी संघटना या प्रश्नी आक्रमक झाल्या असून, त्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. कर्जत हा आदिवासीबहुल …

Read More »

पनवेलमध्ये 263 नवे पॉझिटिव्ह

पाच जणांचा मृत्यू; 274 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 27) कोरोनाचे 263 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 274 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 192 रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला, तर 198 रुग्ण बरे झाले आहे. …

Read More »

लसीच्या प्रयत्नांना वेग

जगभरातील सर्वच देशांचे लक्ष सध्या कोरोना विषाणूवरील लसीच्या उत्पादनाकडे लागले असून सर्वांना परवडणारी आणि दीर्घ काळ प्रभावी लस विकसित करण्यासाठी देशोदेशीचे शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. गुरूवारी जगभरातील आजवरच्या कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटी 40 लाखांवर गेली. जगभरात एव्हाना या विषाणूमुळे आठ लाख 22 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. …

Read More »

कुष्ठरुग्ण बंधू-भगिनींना अन्नधान्याचे वाटप

पनवेल : गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 60 हजार कुटुंबांना अन्नधान्य देऊन त्यांचा गणेशोत्सव गोड केला जात आहे. या अंतर्गत …

Read More »