नवी मुंबई बंगाली असोसिएशनचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त वाशी येथील ‘द नवी मुंबई बंगाली असोसिएशन’ (एनएमबीए) या संघटनेने 41 वर्षात पदार्पण केले आहे. ‘कोरोनाकाळात आरोग्य, सुरक्षितता व कल्याण’ या संकल्पनेतून ‘नवी मुंबई बंगाली असोसिएशन’तर्फे दुर्गा पूजा साजरी करण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष नेमाई गोराई यांनी या वेळी माहिती देताना सांगितले …
Read More »Monthly Archives: October 2020
फडके विद्यालयाच्या ई-लर्निंग डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या ई-लर्निंग डिजिटल क्लासरुमचा उद्घाटन सोहळा शनिवारी (दि. 24) झाला. हिंदुस्तान ऑर्गेनिक केमिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुबोध भिडे, भारत विकास परिषदे पनवेलचे अध्यक्ष गिरिष समुद्र व ज्युपिटर डायकेमचे संचालक सी. चेलप्पन तसेच महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष …
Read More »विक्रांत पाटील यांनी केला नवदुर्गांचा सन्मान
पनवेल : वार्ताहर नवरात्री म्हणजे देवी शक्तीचे विविध रूपे आणि आदिशक्तीची आराधना; म्हणूनच यानिमित्त नारी शक्तीचा सन्मान करण्याचा उपक्रम पनवेलचे माजी उपमहापौर व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र विक्रांत पाटील यांनी साकारला आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व व्यवयसायिक अशा विविध क्षेत्रात अपार कष्ट करून, कठीण परिस्थितीत आपल्या …
Read More »दिव्यांग व कुष्ठरुग्णांसाठीच्या निधीत वाढ केल्याबद्दल भाजपचे आभार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांग तसेच कुष्ठरुग्णांसाठी निधीत वाढ केल्याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांचे शिवाजी कांबळे, के. बी. सवडे, संभाजी वाघमारे, रेश्मा कांबळे, अशोक आंबेकर आदींनी आभार व्यक्त केले. दिव्यांग लोकांची पनवेल महापालिकेच्या क्षेत्रातील संख्या 1500 ते 1600 इतकी आहे आणि दरवर्षी त्यामध्ये वाढ होत आहे. …
Read More »कृतिशील तत्त्वचिंतकाची जन्मशताब्दी
सुमारे पाच हजार वर्षांची पार्श्वभूमी लाभलेल्या श्रीमद भगवद् गीता या ग्रंथाविषयी समाजाच्या विविध स्तरांमधील आकर्षण अद्यापही कमी झालेले दिसत नाही. पाठांतर, प्रवचन अथवा विद्वानांच्या सभेत चर्चा या पातळीवर बव्हंशी भगवद् गीतेचे अस्तित्व साधारण प्रत्येक कालखंडात आढळत आले आहे. तथापि, ज्ञानयोग आचरणारे आद्य शंकराचार्य, भक्तियोगी संत ज्ञानेश्वर आणि कर्मयोगी लोकमान्य टिळक …
Read More »आमदार महेश बालदी यांना रेखाचित्र भेट
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील सारडे गावचे रेखाचित्रकार कुणाल रामचंद्र पाटील यांनी कोरोना काळात आपला छंद जोपासला आहे. त्यांनी आमदार महेश बालदी यांचे रेखाचित्र (पेन्सिल स्केच) काढून गुरुवारी (दि. 22) उरण भाजप कार्यालयात त्यांची भेट घेऊन फ्रेम दिली. या वेळी आमदार महेश बालदी यांनी रामचंद्र पाटील यांच्या कलेचे कौतुक करीत …
Read More »‘सीकेटी’त ऑनलाइन नवरात्रोत्सव जल्लोषात
पनवेल : रामप्रहर वृत्त नवरात्र हा स्त्रीशक्तीचा सन्मान करणारा उत्सव त्यातही सप्तमी म्हणजे ‘सरस्वती पूजन’ विद्येच्या देवतेची पूजा करण्याचा दिवस. दरवर्षी चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमात सरस्वतीपूजा मोठ्या उत्साहात केली जाते. याही वर्षी हा उत्सव ऑनलाइन पण मोठ्या जल्लोषात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजनाने झाली. या वेळी रिया …
Read More »पनवेलमध्ये दुर्गामाता दौड
पनवेल : रामप्रहर वृत्त नवरात्रोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये दुर्गामाता दौड हा उपक्रम राबविला जात आहे. मागील चार वर्षांपासून 40 ते 50 युवकांच्या संख्येने निघणारी दौड यंदा कोविड-19चा प्रादुर्भाव पाहता मोजक्याच संख्येने काढली जात आहे. श्री दुगार्माता दौड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री …
Read More »उरण नगर परिषद हद्दीत विकासकामांचा झपाटा
उरण : वार्ताहर उरणचे आमदार महेश बालदी यांच्या आमदारकीला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्तीचे औचित्य साधून उरण नगर परिषद हद्दीतील आनंदनगर येथील रस्ता व गटारे यांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 24) भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरसेवक राजेश ठाकूर …
Read More »सांडशी-कर्जत बससेवा लवकरात लवकर सुरू करा
कर्जत भाजप युवा मोर्चाची मागणी कडाव : प्रतिनिधी लॉकडाऊनमध्ये बंद केलेली कर्जत-सांडसी बससेवा लवकरात लवकर सुरू करा, अशी मागणी भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी आगार व्यवस्थापकांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर रेल्वेसेवा, बससेवा, शाळा आदी यंत्रणा बंद करण्यात आल्या होत्या. अनेक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर परिस्थिती पूर्ववत होऊ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper