उरण : वार्ताहर शाळा हा विषय राजकीय असूच शकत नाही. शाळा हे विद्येचे मंदिर असून त्यासाठी नवघर ग्रामस्थ मंडळ पुढाकार घेऊन शाळा नवीन बांधण्यास तयार असताना फक्त राजकीय आकसापोटी व स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्याकरिताच ते परवानगी नाकारत आहेत हि बाब दुर्देवी आहे. शाळेच्या कामात राजकीय रंग नको, असे मत आमदार महेश …
Read More »Monthly Archives: October 2020
एस. पी. विरोधात हक्कभंग ठराव मांडणार -आमदार रविशेठ पाटील
पेण : वार्ताहर पेण न. प. प्रकरणात पोलिसांनी रात्री 2.30 वाजता आमदार रविशेठ पाटील यांच्या घराची झाडाझडती केल्याने आमदार रविशेठ पाटील यांनी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग ठराव मांडणार असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांना दिली. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले कि, अनिरुध्द पाटील यांच्यावर चोरीचा, खुनाचा, दरोड्याचा गुन्हा असल्यासारखे …
Read More »शेतकर्यांचे अश्रू पुसण्यासाठी पालकमंत्र्यांचा पत्ताच नाही..!
नुकसानभरपाई द्या, अन्यथा उग्र आंदोलन -शेतकरी संघटना सुधागड : रामप्रहर वृत्त परतीच्या पावसाने रायगडातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकर्यांचे हाताशी आलेले चांगले पिक आडवे झाल्याने शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले आहेत. हे अश्रू पुसण्याचे काम सरकारचे आहे. मात्र पालकमंत्र्यांचा येथे पत्ताच नाही, असा गंभीर आरोप रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा …
Read More »सीबीआयला नो एंट्री
राज्य सरकारने 1989 साली सीबीआयला राज्यात तपास करू देण्यास संपूर्ण मोकळीक दिली होती. ती मोकळीक नव्या आदेशानुसार काढून घेण्यात येत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी जाहीर केले. काही दिवसांपूर्वी उघड झालेल्या टीआरपी घोटाळ्याची पार्श्वभूमी या निर्णयामागे आहे. परंतु यामागे मुंबई पोलिसांचे तपासाचे स्वातंत्र्य आबाधित राखण्याची भूमिका आहे की कुठेतरी …
Read More »पनवेल महानगरपालिकेचा जनतेला दिलासा देणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प मंजूर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांनी सन 2019-20चा सुधारित आणि सन 2020-21चा मूळ अंदाजपत्रक सादर केलेल्या 945 कोटींची जमा, खर्च 943.42 कोटी आणि शिल्लक 1.59 कोटींच्या अर्थसंकल्पास गुरुवारी (दि. 22) महासभा आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी मान्यता दिली. जनतेला कोरोना काळात दिलासा देणारा …
Read More »मुरूडमध्ये भाज्यांचे दर कडाडले
मुरूड : प्रतिनिधी अवकाळी पावसाने मुरूड तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, अतिपावसामुळे भाजीचे पीकदेखील नष्ट झाले आहे. दरम्यान, आवक घटल्याने किरकोळ बाजारातील भाज्यांच्या दरात प्रतिकिलो 50 ते 60 रुपयांची वाढ झाली आहे. भाज्यांच्या महागाईमुळे ग्राहकांच्या महिन्याच्या खर्चातही वाढ झाली आहे. मुरूड तालुक्यात अवकाळी पाऊससुद्धा दिवसाला 130 मिलीमीटरपेक्षा जास्त पडला. …
Read More »द्रुतगती महामार्गावर टँकर पेटला
दुसर्या अपघातात दोघे जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (दि. 22) पहाटेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणार्या टँकरच्या केबिनमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मुंबईहून पुण्याला जाणारा टँकर (आरजे-18, जीबी-51 49) गुरुवारी बोरघाट चढत असताना टँकरच्या केबिनने अचानक पेट घेतला. त्यात टँकर …
Read More »काशिद किनार्याला पर्यटकांची प्रतीक्षा
मुरूड : प्रतिनिधी पर्यटकांच्या गर्दीने नेहमी गजबजणारा काशिद समुद्रकिनारा लॉकडाऊनमुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुना सुना झाला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने या किनार्याचे मोठे नुकसान झाले आहे. मोठमोठी सुरूची झाडे स्टॉलवर पडल्याने स्थानिक स्टॉलधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संकटांवर मात करीत येथील काही स्टॉलधारकांनी बुधवार (दि. 21)पासून आपले स्टॉल …
Read More »रायगड जिल्ह्यात 208 नवे पॉझिटिव्ह; नऊ रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, गुरुवारी (दि. 22) नव्या 208 रुग्णांची आणि नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 275 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 136 व ग्रामीण 36) तालुक्यातील 172, रोहा व महाड प्रत्येकी सात, अलिबाग सहा, खालापूर …
Read More »प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना मिळणार नवी मुंबई पालिकेच्या कामांची कंत्राटे
आमदार मंदा म्हात्रे यांना यश नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना आमदार मंदा म्हात्रे यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे. स्थानिकांना अंधारात ठेऊन एकाच ठेकेदाराला दिलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची कामे रद्द करण्यात आले होते. या कामांचे कंत्राट स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना देणेबाबत तसेच साफसफाईच्या 96 कामांचे देण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper