Breaking News

Monthly Archives: October 2020

कुंडेवहाळ येथील कुलुमाता मंदिर सभामंडप आणि सुशोभीकरणाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथील कुलुमाता मंदिराच्या सभामंडप आणि सुशोभीकरण लोकार्पण शनिवारी (दि. 17) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला क्वारी संघटनेचे अध्यक्ष सुनील भोईर, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर, उपसरपंच करिष्मा वास्कर, माजी उपसरपंच आर. आर. वास्कर, दत्तात्रय वास्कर, ग्रामपंचायत सदस्य जागृती …

Read More »

पीओपीवरील बंदी उठविण्यासाठी मूर्तिकार पेणमध्ये एकवटले

आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पेण : प्रतिनिधीप्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तींवर प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून घालण्यात आलेली बंदी उठविण्यात यावी अशी मागणी पेण येथील मूर्तिकारांच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. या संदर्भात माजी मंत्री व आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी व कामगार यांची शनिवारी (दि. 17) …

Read More »

शेकापचे अनेक कार्यकर्ते करणार भाजपात प्रवेश

पनवेल : उरण विधानसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते रविवार दिनांक 18 ऑक्टोबरला भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. दुपारी 12 वाजता पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार …

Read More »

देवेंद्र फडणवीस उद्यापासून अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौर्‍यावर

शेतकर्‍यांच्या नुकसानीची करणार पाहणी मुंबई : प्रतिनिधीराज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. सोमवार (दि. 19)पासून त्यांच्या दौर्‍याला प्रारंभ होईल.देवेंद्र फडणवीस …

Read More »

घराबाहेर पडल्याने एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का? : रावसाहेब दानवे

पैठण : प्रतिनिधीघराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का, असा सवाल भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विचारला आहे. राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे, असेही त्यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले की, अशी अनेक संकट येत राहतात. आम्ही …

Read More »

प्रजा संकटात, राजा मात्र घरात!

वाढत्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार दौरा मुंबई : प्रतिनिधीगेल्या चार-पाच दिवसांत परतीच्या पावसाने राज्याला तडाखा दिला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि कोकणातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली नाही. दुसरीकडे काही नेते विविध भागांचे दौरे करून परिस्थितीचा …

Read More »

मूलगामी प्रकाशनकडून 21 हजार पुस्तकांची भेट

रोहे : प्रतिनिधी कातकरी बोलीभाषिक मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी पुण्यातील मूलगामी प्रकाशन संस्थेच्या वतीने ‘आमच्या गोष्टी : मराठी-कातकरी स्तर 2’ या द्विभाषिक पुस्तकांच्या 21000 प्रतींचे लेखिका वर्षा सहस्त्रबुद्धे यांच्या वतीने रायगड जिल्ह्यात मोफत वितरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या कातकरी बोलीभाषिक मुलांसाठी मूलगामी प्रकाशनने …

Read More »

माथेरानच्या रग्बी हॉटेलमधील कामगारांना पाच महिने पगार नाही

पुन्हा कामावर घेण्यासदेखील टाळाटाळ कर्जत : बातमीदार रिलायन्स ग्रुपच्या माथेरानमधील रग्बी हॉटेल मध्ये 10 वर्षे नोकरी करणार्‍या 25 आदिवासी कामगारांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार नाही. कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीमध्ये कामावर येऊ नका, असे हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना सांगितले, पण आता या कामगारांना हॉटेलच्या गेटवरसुध्दा उभे राहू दिले जात नाही. हॉटेल व्यवस्थापनाच्या  …

Read More »

‘मिठाईवर एक्सपायरी डेट टाकणे बंधनकारक’

अलिबाग : जिमाका खुल्या स्वरूपात विक्री करीत असलेले पेढा, जिलेबी, लाडू इत्यादी अन्न पदार्थ खरेदी केल्यापासून किती दिवसाच्या आत वापरावे, म्हणजेच मिठाई खाण्यास योग्य असल्याची अंतिम मुदत (एक्सपायरी डेट) ठळकपणे नमूद करणे हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांना  1 ऑक्टोबरपासून बंधनकारक करण्यात आले असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) …

Read More »

खालापुरात पाणीटंचाई

पंप हाऊसमध्ये बिघाड, जलवाहिनीलाही गळती खालापूर : प्रतिनिधी नगर पंचायतीच्या पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने तसेच जलवाहिनीला जागोजाग गळती लागल्याने खालपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाणी टंचाई भासत आहे. दरम्यान, नागरिकांना अंघोळ तसेच दैनंदिन कामांसाठी पागोळीचे पाणी वापरावे लागत असून, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तालुक्यातील कलोते धरणातून खालापूर शहराला पाणी …

Read More »