Breaking News

Monthly Archives: October 2020

तांबडी बलात्कार व हत्या प्रकरण ; विशेष पोक्सो न्यायालयात पोलिसांकडून दोषारोपपत्र सादर

अलिबाग, रोहा : प्रतिनिधीरोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या खटल्यासाठी शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सोमवारी (दि. 12) अलिबाग जिल्हा न्यायालयात हजेरी लावली. त्यांनी तांबडी येथे जाऊन गुन्हा घडला त्या ठिकाणची स्थळ पाहणीही केली. …

Read More »

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी उत्सव योजना

मोदी सरकार देणार 10 हजार अ‍ॅडव्हान्स नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना व लॉकडाऊनमुळे डबघाईस आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (दि. 12) सरकारकडून करण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती दिली. यात केंद्र सरकारने चार योजना जाहीर केल्या असून, उत्सवांसाठी केंद्रीय कर्मचार्‍यांना 10 …

Read More »

सरकारने एका जातीचा विचार केला, 85 टक्के जनतेचे काय?

प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल मुंबई : प्रतिनिधीएमपीएससी परीक्षांवर तोडगा काढता आला असता, मात्र ही परीक्षा रद्द करताना राज्य सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित 85 टक्के जनतेचे काय, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर …

Read More »

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर

महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजप महिला मोर्चाचे आंदोलन   पनवेल : रामप्रहर वृत्तमहाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करीत राज्य …

Read More »

आशावाद जपून

महाराष्ट्रातील कोरोनाचे थैमान तूर्तास काहिसे थंडावल्यासारखे दिसते आहे. सप्टेंबर महिन्यात केसेसमध्ये झालेली भयभीत करणारी वाढ गेल्या पंधरवडाभरात ओसरताना दिसल्याने सरकारी गोटातील संबंधितांनी नक्कीच सुटकेचा निःश्वास टाकला असेल. मात्र तरीही आगामी सणासुदीच्या काळात संसर्गामध्ये वाढ होण्याचा धोका लक्षात घेता अनलॅाकची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत आतापासूनच घोषणा करणे निश्चितच उतावीळपणाचे ठरेल. सप्टेंबर महिन्यात …

Read More »

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव पहिल्या स्थानावर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नावे या यादीमध्ये आहेत. स्टार प्रचारकांच्या …

Read More »

रायगड जिल्ह्यात 273 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 11) नव्या 273 रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 336 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 184 व ग्रामीण 32) तालुक्यातील 216, पेण 16, खालापूर 10, अलिबाग आठ, रोहा व कर्जत प्रत्येकी सहा, महाड पाच, श्रीवर्धन दोन आणि …

Read More »

उरण येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

112 रक्तदात्यांनी केले रक्तदान उरण : वार्ताहर उरण तालुका ग्राहक सहकारी संस्था (मर्यादित) द्रोणागिरी बाजारतर्फे रविवारी (दि. 11) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत द्रोणागिरी बाजार, गानू सदन, पोलीस  लाईन समोर, उरण नागाव रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एनएमएमसी रक्तपेढी वाशी (नवी मुंबई) यांच्या सहकार्याने सदर शिबिर …

Read More »

बालग्रामच्या मुलांसाठी भिक्षाफेरीतून मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त रविवारी कोकण कट्टा ह्या विलेपार्ले या समाजसेवी ग्रुपने ग्राम संवर्धन सामजिक संस्थेतील बालग्रामच्या  अनाथ, गरीब, आदिवासी आणि गरजू मुलांसाठी माणुसकीची भिक्षाफेरीतून बाराशे किलो धान्य व दैनंदिन लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश मंचेकर, दिलीप पवार, मिलिंद पालेकर कोकण …

Read More »

महाराष्ट्रात मंदिरे, लोकल, जीम बंदच

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी राज्यातील जनतेला संबोधित केले. मागच्या काही महिन्यांपासून लोकल, मंदिर आणि जीम सुरु करण्याची मागणी सातत्याने होत आहे. ऑक्टोबरच्या मध्यावर लोकल सेवा सुरु होऊ शकते, अशा बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. त्यामुळे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल काही निर्णय जाहीर करतात, याकडे …

Read More »