Breaking News

Monthly Archives: October 2020

रायगड जिल्ह्यात 329 नवे पॉझिटिव्ह; आठ रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 9) नव्या 329 रुग्णांची आणि आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 473 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 196 व ग्रामीण 51) तालुक्यातील 247, अलिबाग 23, उरण 10, कर्जत आठ, खालापूर व माणगाव प्रत्येकी सात, पेण व महाड प्रत्येकी …

Read More »

पनवेल तालुक्यात 247 नवे कोरोनाबाधित

एकाचा मृत्यू; 286 रुग्णांची कोरोना संसर्गावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 9) कोरोनाचे 247 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 286 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 196 रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 231 रुग्ण बरे झाले आहे. पनवेल …

Read More »

माणगाव तालुक्यात भातकापणीला सुरुवात

शेतात पाणी तुंबल्याने कामात अडथळा माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भातपिके तयार झाली असून, कापणीच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र परतीच्या पावसाचे पाणी शेतात तुंबून राहिल्याने कापणीच्या कामात शेतकर्‍यांना अनंत अडचणी येत आहेत. कोरोनाचे सावट तसेच निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या शेतकर्‍यांना परतीच्या पावसाचाही फटका बसला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला तालुक्यातील भातशेती कापणीस …

Read More »

नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा -दादासाहेब घुटुकडे

नागोठणे : प्रतिनिधी आपल्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत असला तरी त्याचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवास 17 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून, या सणाबरोबरच ईद ए मिलाद तसेच आगामी काळात येणारे सण साधेपणने साजरे करावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांन केले. नवरात्रोत्सव तसेच येणार्‍या …

Read More »

कोरोना काळातही सेवा देणार्या शिक्षकांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

नवी मुंबई : बातमीदार कोरोनाकाळात मास्क स्क्रिनिंग तसेच ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन तपासणी करणे, आरोग्य केंद्रांवरील ड्युटी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन तास या दुहेरी जबाबदार्‍या प्रामाणिकपणे बजावून सुद्धा नवी मुंबईतील ठोक मानधनावर कार्यरत शिक्षक महापालिकेकडून तसेच राज्यसरकारकडून दुर्लक्षित केले जात असल्याने ह्या शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे. दरम्यान, …

Read More »

भाजयुमोचा कार्यअहवाल फडणवीस यांना सादर

पनवेल : भाजप महाराष्ट्र कार्यसमितीच्या बैठकीच्या वेळी भाजयुमो महाराष्ट्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरात गेल्या तीन महिन्यांत म्हणजेच जुलै 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत केलेल्या कार्याचा अहवाल माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सादर केला. प्रदेश कार्यकरणी गठन ते मराठवाडा, पुणे शहर …

Read More »

‘कलादर्पण’च्या ऑनलाइन कार्यक्रमाला प्रतिसाद

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त कलादर्पण या कलाप्रेमी संस्थेच्या वतीने एका शास्त्रीय संगीतावर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. मिलिंद गोखले यांच्या संकल्पनेतून स्वराधना या संगीतप्रेमी संस्थेने हा कार्यक्रम केला. कल्याण छाया या नावाने झालेल्या कार्यक्रमात पनवेल परिसरातील कलाकारांनी सहभाग घेतला. या गायकांनी कल्याण थाटातील यमन, कल्याण, …

Read More »

पनवेलमध्ये आढळले 182 पॉझिटिव्ह; तालुक्यात 70 टक्के सर्वेक्षण पूर्ण; 600 कर्मचार्यांचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत पनवेल तालुक्यात 182 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तालुक्यात आतापर्यंत 70 टक्के सवेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 22 सप्टेंबर रोजी या मोहिमेला सुरुवात झाली आहे. 600 कर्मचारी ही मोहीम राबवत आहेत. या …

Read More »

घरफोडी करणारे गजाआड

पनवेल : बातमीदार बंद गाळ्याचे शटर तोडून घरफोडी करणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, वर्कशॉप फॅब्रिकेशनचे साहित्य, गुन्ह्यातील दुचाकी आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. खांदा कॉलनी, सेक्टर 9 येथील मेडिकलच्या शटरचे लॉक तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि मोबाईलची चोरी केली होती. …

Read More »

नवरात्रीतील गरब्यावर कोरोनाचे सावट; नृत्य नसल्याने तरुण-तरुणींचा हिरमोड; व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर

पनवेल : वार्ताहर मार्च मध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि अनेक लहान-मोठ्या व्यापार्‍यांना तसेच मोलमजुरी करणार्‍यांना देशोधडीला लावले ते आजतगायत. अनेकांचे आराध्य दैवत गणपती सण सुद्धा सुना सुना गेला. त्यानंतर आता 17 ऑक्टोबरला घटस्थापना आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे गरबा नृत्याचा कार्यक्रम कुठेही होणार नसल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला असून अनेक लहान …

Read More »