Breaking News

Monthly Archives: October 2020

भांदरे नदीवरील पूल कोसळला; काळ प्रकल्प अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

माणगाव : प्रतिनिधी काळ प्रकल्पाचा भांदरे चौकीजवळील व नदीवरील पूल कोसळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून परिसरातील मळेगाव आदिवासीवाडी, हातकेळी, मुगवली, कविळवहाळ व भांदरे या गावांचा संपर्क तुटला असून, ग्रामस्थांचा शेतावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पूल तुटल्याची माहिती सरपंचांनी सर्व संबंधित विभागांना दिली असूनही दोन महिने होत आले तरी काळ प्रकल्पाचे …

Read More »

नवी मुंबईत बस स्थानकांवर लांबच लांब रांगा

पनवेल : बातमीदार टाळेबंदी शिथिलीकरणानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व व्यवहार आता पूर्ववत सुरू झाले आहेत. नागरिकांनाही आता कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र या शहरांची जीवनवाहिनी असलेली लोकल मात्र अद्याप सुरू करण्यात न आल्याने नवी मुंबईतून मुंबई, ठाण्यात प्रवास करताना नोकरदारांचे नाकेनऊ येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सर्व ताण …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते श्री समर्थ कृपा फोटो स्टुडीओचे उद्घाटन

उरण : वार्ताहर उरण शहरातील भाजप कार्यालयाजवळ असलेल्या श्री समर्थ कृपा फोटो स्टुडीओचे गुरुवारी (दि. 8) उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्टुडीओचे मालक राहुल कांबळे यांनी आमदार बालदी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप शहर …

Read More »

इतर आजारांवरही नवी मुंबई मनपाने लक्ष देण्याची गरज -निशांत भगत

नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भाजपचे युवा नेते निशांत भगत यांनी आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून पालिका आयुक्तांसमोर त्यांच्या प्रभागातील महत्वाचे तीन मुद्दे मांडले. ज्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम कोविड व्यतिरिक्त होणार्‍या आजारांवर लक्ष वेधले. चिकन गुनिया ह्या तापसदृश्य आजाराचा …

Read More »

भाजप बेस्ट कामगार संघाची महाव्यवस्थापकांसोबत बैठक

पनवेल : वार्ताहर भाजपा बेस्ट कामगार संघाची बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांच्याबरोबर करारा संदर्भात बोलणी झाली आहे.कुलाबा येथे सुरेंद्रकुमार बागडे यांच्यासोबत बेस्ट कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये बेस्ट कामगारांचे मागील सोळा महिन्यांपासून ड्युटी शेड्युल जे थांबलेले आहे ते लवकरात लवकर चालू करावे. यावर लवकरात लवकर तोडगा काढून …

Read More »

वेगाने वाहन चालविणार्यांना दणका

महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेकडून 10115 वाहनांवर कारवाई पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणार्‍या अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याने विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्‍या 10115 वाहनांवर कारवाई करण्यात आली. राज्यातील महामार्गांवर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी कर्मचारी यांनी कंबर …

Read More »

खोपोलीत भाजपतर्फे मोफत चष्मेवाटप

खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष खोपोली शहर मंडळाच्या वतीने सेवा सप्ताहाच्या निमित्ताने 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता मोहीम,प्लास्टिक मुक्ती, आदी कार्यक्रम झाले. विविध कार्यक्रमापैकी सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत नेत्रतपासणी करण्यात आली. बुधवारी गरजुंना चष्मे मोफत वाटपाचा कार्यक्रम खोपोली शहर मध्यवर्ती कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पार पडला. 75 नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून …

Read More »

पनवेलमध्ये 319 नवे रुग्ण; सहा जणांचा मृत्यू; 276 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 7) कोरोनाचे 319 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 276 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 273 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 222 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …

Read More »

उत्तम चालले आहे

या सरकारचे हे काय चालले आहे, असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचा एकेकाळचा मित्रपक्ष म्हणवणार्‍या पक्षातर्फे विचारला जात आहे. खरे पाहता असा प्रश्नच कोणाला पडायला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली संपूर्ण देश एकदिलाने वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत आहे. शत्रूशी निकराने मुकाबला करत आहे आणि त्याच वेळी स्वत:चा सर्वंकष विकासदेखील साधत …

Read More »

रायगड जिल्ह्यात 430 नवे पॉझिटिव्ह; 13 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये घट होत असून, बुधवारी (दि. 7) नव्या 430 रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 393 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 273 व ग्रामीण 46) तालुक्यातील 319, अलिबाग 27, रोहा 22, महाड 14, माणगाव …

Read More »