Breaking News

Monthly Archives: October 2020

शेतकर्‍यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी -भाजप नेत्या शर्मिला सत्वे

माणगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसात भातपीक जमीनदोस्त होऊन माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून राज्य शासनाने संकटग्रस्त शेतकर्‍यांना लवकरच नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी माणगावचे नायब तहसीलदार बी. वाय. भाबड …

Read More »

भीती दुसर्या लाटेची

कोरोना महामारीचे या घटकेला दिसणारे चित्र मोठ्या विचित्र मन:स्थितीत ढकलणारे आहे. एकीकडे कोरोनाचा आपल्या देशातील रुग्णआलेख उतरणीला लागलेला दिसत असल्याने हायसे वाटते आहे. तर त्याचवेळी युरोप अमेरिकेत दिसणार्‍या कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेमुळे छाती पुन्हा दडपून जाते आहे. अमेरिका, फ्रान्स, स्पेन आदी अनेक देशांमध्ये पुन्हा संसर्गाचे विक्रमी आकडे समोर येऊ लागले …

Read More »

पनवेल : दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे भाजप शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरिश मोकल आणि नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Read More »

रायगडात 126 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 126 कोरोना रुग्णांची आणि तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 27) झाली, तर दिवसभरात 170 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 75 व ग्रामीण 22) तालुक्यातील 97, पेण सहा, खालापूर व माणगाव प्रत्येकी पाच, अलिबाग चार, उरण व कर्जत प्रत्येकी दोन, …

Read More »

रावे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पेण : वार्ताहर तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणार्‍या व्यक्तींचा नुकताच रावे येथे ग्रामस्थ मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. श्री रायबादेवी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास गाव पंच कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंदन पाटील, माजी अध्यक्ष संतोष पाटील, राजा पाटील, मनोहर टावरी, हिरामण पाटील, धनाजी पाटील, …

Read More »

नवीन पनवेलच्या घरफोडी प्रकरणात पाच नेपाळी सुरक्षारक्षकांना अटक

पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल सेक्टर-19 मधील डॉ. रविंद्र इनामदार यांच्या घरात तब्बल 82 लाख रुपयांची घरफोडी करणार्‍या टोळीतील पाच नेपाळी सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे. या घरफोडीच्या गुह्यात सहभागी असलेले तीन सुरक्षा रक्षक नेपाळ येथे पळून गेल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नवीन पनवेल सेक्टर-19 …

Read More »

भारतीय मजदूर संघाची आज पनवेल प्रांत कार्यालयावर निदर्शने

उरण : वार्ताहर लेबर कोड 2020 मधील कामगार विरोधी तरतुदी मागे  घ्याव्यात या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने  पनवेल प्रांत कार्यालयावर बुधवारी (दि. 28) सकाळी 11 ते 1 या दरम्यान निदर्शने करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. शासनाने कारखान्यांना ले ऑफ, क्लोजर, कामगार …

Read More »

पनवेलसाठी जास्तीच्या बेडची उपलब्धता करा

नगरसेविका दर्शना भोईर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पनवेल क्षेत्राकरीता कोविड-19च्या अनुषंगाने जास्तीच्या बेडची उपलब्धता करुन देण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदीती तटकरे यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या …

Read More »

ओबीसी संघर्ष समिती म्हसळ्यात काढणार मोर्चा

मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन म्हसळा : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या कारणाने मराठा समाज आपली नोंद ओबीसी मध्ये करावी, अशी सध्या मागणी करत आहे. त्याला आमचा स्पष्ट विरोध असल्याचे म्हसळा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे ठाम मत असून समितीच्या वतीने म्हसळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच …

Read More »

पनवेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे होणार सुशोभीकरण; संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पनवेल शहरातील पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि धार्मिक संघटनांची संयुक्त बैठक मंगळवारी (दि. 27) झाली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा  सुशोभीकरण कामाला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी …

Read More »