नगरसेविका सीता पाटील यांची मागणी पनवेल : वार्ताहर – खांदा वसाहतीत फेरीवाल्यांवर 10 वर्षांपासून राष्ट्रीय फेरीवाला धोरण अमलात आलेले नाही. नियमानुसार त्याची अंमलबजावणी करून गोरगरीब फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी भाजप नगरसेविका सीता पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात नुकतेच त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन पर्यायी जागा देऊन फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे, …
Read More »Yearly Archives: 2020
नागाव येथील शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत हद्दीतील शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वासू ठेऊन भाजपमध्ये शुक्रवारी (दि. 25) प्रवेश केला. 15 जानेवारी 2021 रोजी होऊ घातलेल्या नागाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळेस …
Read More »शेतकर्यांनी कृषी कायद्यांचे स्वागत करावे
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी – व्यापार्यांकडून शेतकर्यांचे होणारे शोषण थांबवून शेतकर्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या योजना सुरू केल्या. नवीन कृषी कायदे तयार केले आहेत. या कायद्यांचे शेतकर्यांनी स्वागत करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस व राज्याच्या माजी …
Read More »रायगडात पर्यटकांवर निर्बंध
नऊ ठिकाणी होणार कोरोनाविषयक तपासणी अलिबाग ः प्रतिनिधीनववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात येणार्या पर्यटकांवर निबर्धांचे सावट आहे. जिल्ह्यात दाखल होणार्या पर्यटकांची नऊ ठिकाणी कोरोनाविषयक प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी रात्री संचारबंदी लागू असणार आहे, मात्र हॉटेल, रिसॉर्टमध्ये कोरोनाविषयक नियमांचे पालन करून नववर्ष स्वागत करण्यास मुभा देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी …
Read More »अलिबागमध्ये शेतकरी संवाद अभियान; पंकजा मुंडेंची उपस्थिती
अलिबाग ः देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिनानिमित्त पोयनाड येथे शेतकरी संवाद अभियान अंतर्गत कार्यक्रम झाला. या वेळी भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस व राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर आमदार रविशेठ पाटील, भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष वैकुंठ …
Read More »राज्य सरकारकडून शेतकर्यांची फसवणूक : फडणवीस
पुणे ः प्रतिनिधीराज्यातील शेतकर्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो, पण आज प्रामाणिक शेतकर्यांना ठेंगा दाखविण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 25) केली. पुण्याच्या मांजरी बुद्रूक येथे शेतकरी संवाद यात्रेत ते बोलत होते.दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून …
Read More »पनवेल भाजप कार्यालयात थेट प्रक्षेपण
पनवेल ः रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’शेतकर्यांशी संवाद’ या कार्यक्रमाचे शुक्रवारी (दि. 25) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रोजेक्टरद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या वेळी भाजप पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी …
Read More »नवे कृषी कायदे शेतकर्याला बळ देणारे
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन; देशभरातील शेतकर्यांशी साधला संवाद नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकाही लोकांना फक्त खोटी माहिती पसरवण्यामध्ये रस आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे बाजारपेठ आणि एमएसपी पद्धत रद्द होईल असे पसरवले जात आहे, पण असे काही घडणार नाही. नवे कृषी कायदे शेतकर्याला बळ देणारे आहेत. आधी शेतकर्यासाठी जोखीम जास्त असायची, पण …
Read More »महाडीबीटी योजनेचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा -कृषी अधिकारी
पेण : प्रतिनिधी महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागाच्या वतीने शेतकरी योजनेच्या नावाखाली शेतकर्यांसाठी सर्व योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून विशिष्ट संगणक प्रणाली सुरू केली आहे, त्याचा लाभ पेण तालुक्यातील शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन पेण तालुका कृषी अधिकारी अनिल रोकडे यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या …
Read More »वणवा विझवताना वन कर्मचारी जखमी; वनपालाच्या प्रसंगावधानाने वाचले वॉचमनचे प्राण
कडाव : प्रतिनिधी तालुक्यातील मुळगाव येथील डोंगराला लागलेला वनवा विझविण्याच्या प्रयत्नात वनविभागाचे रोजंदारी वॉचमन रामचंद्र देशमुख जखमी झाले. वनपाल काळूराम लांघी यांनी त्यांना वेळीच डोंगरावरून खाली आणले आणि रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने वॉचमन देशमुख यांचे प्राण वाचले आहेत. कर्जत तालुक्यातील खांडपे वन परिमंडळातील मुळगाव कंपार्टमेंटमधील डोंगरावर बुधवारी (दि. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper