उरण ः वार्ताहर, प्रतिनिधीप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वैभव महाडिक यांनी तयार केलेल्या ‘नेटपॅक’ या ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या अॅपच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात करण्यात आले होते. या नेटपॅक अॅपचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व गायक नंदेश उमप यांच्या हस्ते सोमवारी (दि. 25) उद्घाटन करण्यात आले. …
Read More »Monthly Archives: January 2021
आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा
पनवेल ः रामप्रहर वृत्तअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 28) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सभा होणार असून सभेला पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल …
Read More »कोरोना काळातील सेवाभावी कार्याबद्दल सफाई कर्मचार्यांचा सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना महामारीच्या काळात पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचार्यांनी मोलाचे योगदान दिले. स्वच्छता हीच सेवा मानून त्यांचे कार्य अविरतपणे सुरूच आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी राहण्यास मदत होत आहे. याबद्दल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते …
Read More »रिलायन्स गॅस पाइपलाइनविरोधात कर्जतमध्ये शेतकर्यांचा उद्रेक
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आंदोलन तूर्तास स्थगित कर्जत ः बातमीदारकर्जत तालुक्यातून गेलेल्या रिलायन्स गॅस पाइपलाइनमध्ये प्रकल्पबाधित झालेल्या 10 गावांतील 49 शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे गेली दोन वर्षे प्रकल्पबाधित शेतकरी आंदोलन करीत असूनही शासनाकडून कोणताही न्याय मिळत नसल्याने प्रजासत्ताक दिनी (दि. 26) गॅस पाइपलाइन प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी …
Read More »भाजपकडून शनिवारी ’तिरंगा रॅली’ची घोषणा
नवी दिल्ली ः दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ व नांगलौईसह इतर ठिकाणच्या हिंसाचारात जखमी झालेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते …
Read More »‘सुदर्शन‘मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात
धाटाव : प्रतिनिधी धाटाव एमआयडीसीतील सुदर्शन कंपनीमध्ये मंगळवारी (दि. 26) प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कंपनीचे इंजिनीरिंग विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक गर्ग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कंपनीच्या सुरक्षारक्षकांडून संचलन करण्यात आले. विवेक गर्ग यांनी सर्व कर्मचारी, कामगारांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सुदर्शननगर या कंपनीच्या कर्मचारी वसाहतीमध्येही ध्वजारोहण समारंभ …
Read More »प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
कर्जत : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्जत तालुक्यात मंगळवारी ध्वजारोहण करण्यात आले. मात्र या सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी होत असलेले विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आले होते. तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. कर्जत तालुका पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणत सभापती सुषमा ठाकरे यांनी …
Read More »काजू प्रक्रिया उद्योगांचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक
सात वर्षांपूर्वी सरकारने कोकणासह राज्याला तसेच देशाला परकीय चलन मोठया प्रमाणात उपलब्ध करून देणार्या आंबा आणि काजू या पिकांपासून विविध उत्पादन तयार करण्याच्या उद्योगांना संरक्षण देण्यासाठी दापोलीतील कृषी विद्यापिठामध्ये आंबा, काजू बोर्डाचे कार्यालय सुरू केले. मात्र, हे कार्यालय सुरू होण्यापूर्वीच रत्नागिरीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. हा आंबा काजू बोर्ड सक्रीय होण्यापूर्वीच …
Read More »खालापुरात गांजा विकणारे चौघे अटकेत
आरोपीमध्ये एक नायजेरियन खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात दोन ठिकाणी गांजाची विक्री करणार्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीत एका नायजेरियन इसमाचा समावेश असल्याने आंतराराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा संशय आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहपाडा गावाच्या मच्छिमार्केटच्या गल्लीजवळ निखिल अरूण शिंदे (वय 24, रा. दहिवली, ता.कर्जत) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी …
Read More »दीपाली लोणकर यांना न्याय मिळवून देणार -चित्राताई वाघ
खोपोली : प्रतिनिधी कोप्रान कंपनीमधील दीपाली लोणकर यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून तडकाफडकी कमी केले आहे. न्याय मिळावा म्हणून त्यांनी खालापूर तहसील कार्यालयासमोर रविवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक व कामगार आयुक्तांची चर्चा केली असून, लवकर दीपालीला न्याय मिळवून देऊ, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper