Breaking News

Monthly Archives: January 2021

उरण येथे मोटरसायकल हेल्मेट रॅली

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी 32 वे रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत उरण येथे जनजागृती व्हावी या उद्देशाने बुधवारी (दि. 20) मोटरसायकल हेल्मेट रॅली काढण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलचे मोटार वाहन निरिक्षक दिनेश बागुल यांनी हिरवा झेंडा दाखवून मोटरसायकल हेल्मेट रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली केअर पॉईंट हॉस्पिटल बोकडविरा (उरण) येथून …

Read More »

पनवेल आयटीआयची इमारत धोकादायक

राज्य शासनाचे दुर्लक्ष; पुनर्बांधणीसाठी अभाविपची स्वाक्षरी मोहीम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) पनवेल या शैक्षणिक संस्थेची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. या बाबत राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन …

Read More »

मनीषा वाघे स्वगृही परत

पनवेल : तालुक्यातील आपटा ग्रुप ग्रामपंचायतीमधून भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले. येथील सारसई गावातून विजयी झालेल्या मनीषा वाघे यांची फसवणूक करून त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करायला लावण्यात आला होता, मात्र त्यांनी भाजपवर विश्वास ठेवून घरवापसी केली. त्यांचे पं. स. सदस्य तनुजा टेंबे यांनी पक्षात स्वागत केले आहे. या वेळी तालुका उपाध्यक्ष …

Read More »

बेकायदा तोडलेल्या झाडांची पाहणी; संबंधितांवर कारवाई करा -सभापती समीर ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल-सायन महामार्गावर कळंबोली सर्कलनजीक असणार्‍या पेट्रोल पंपाजवळ महामार्गालगतची चार ते पाच जुनी झाडे कटरने तोडून बेकायदा नामशेष करण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन बेकायदा वृक्षतोड करणार्‍या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘ब’ चे सभापती समीर ठाकूर  यांनी …

Read More »

वलप आणि पाटणोलीतील विजयी उमेदवारांचे अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुक नुकतीच झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवती यश मिळविले असून, 14 पैकी 9 ग्रापंचायतींवर झेंडा फडकावला. यातील वलप आणि पाटणोली येथील भाजपच्या विजयी सदस्यांनी बुधवारी (दि. 20) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी लोकनेते रामशेठ …

Read More »

‘वीजपुरवठा खंडित केल्यास राज्य सरकारविरुद्ध दोन हात’

मुंबई : प्रतिनिधी वीजपुरवठा खंडित केल्यास राज्य सरकारविरुध्द दोन हात करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट इशाराच दिला आहे. महावितरणच्या वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या धोरणावरून शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राजू शेट्टी …

Read More »

टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजपची मागणी लसीकरण कार्यक्रमात अकार्यक्षमता; आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धच्या लसीकरण मोहिमेला मुंबईसह राज्यात मोठी खीळ बसली असून मुंबईत मंगळवारी दिवसभरात केवळ 13 लोकांना व राज्यभरात केवळ 181 लोकांनाच कोरोना लस देण्यात आली आहे. राज्यात 9.83 लाख लसी उपलब्ध असताना सुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी लस कमी देण्यात आल्याची ओरड केली जात आहे. केंद्राकडे बोट दाखविणार्‍या …

Read More »

मनोरंजनाचे तांडव

केंद्र सरकार काही महत्त्वाची पावले टाकत असले तरी अजुनतरी ओटीटी व्यासपीठांना लगाम घालणारी व्यवस्था आपल्याकडे नाही हे मान्य करावे लागेल. अशाप्रकारची व्यवस्था निर्माण करणे हे दुधारी तलवारीसारखे आहे. ओटीटी कार्यक्रमांना सेन्सॉर बोर्डाचा अंकुश लावला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक चवताळून उठतात आणि या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना मोकळे सोडले तर तांडव सारखा पेचप्रसंग …

Read More »

पनवेलच्या सौंदर्यीकरणात पडणार भर

विविध विषयांना महासभेत मंजुरी पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेच्या बुधवारी (दि. 20) झालेल्या महासभेत कळंबोली येथील सेक्टर 6मध्ये आयजीपीएल कंपनीच्या सीईआर फंडातून उभारण्यात येणारे उद्यान, सेक्टर 11मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय  सभागृह आणि पनवेल शहरातील लेंडाळे तलावाच्या सुशोभीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पनवेलच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे.पनवेल महापालिकेची महासभा आद्य …

Read More »

कोरोना काळात 10 हजार रक्तपिशव्यांचे संकलन

प्रा. सुधीर पुराणिक यांच्या पुढाकाराने एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे अभियान पाली : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक व पाली (ता. सुधागड) येथील जे. एन. पालिवाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुधीर पुराणिक यांच्या पुढाकाराने कोरोना काळात तब्बल 10 हजार रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. कोरोना संकटकाळात रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रा. …

Read More »