Breaking News

Monthly Archives: January 2021

माथेरानच्या मलंग पॉईंटचे सुशोभीकरण परिसरातील झाडांना कठड्याचा आधार

कर्जत : बातमीदार माथेरानच्या पर्यटनाला नवीन झळाळी मिळत आहे, ती नगरपालिकेकडून होत असलेल्या सुशोभीकरणामुळे. येथे होत असलेल्या पॉईंट सुशोभीकरणामध्ये नामशेष होत असलेल्या मलंग पॉइंटला गतवैभव मिळाले आहे. माथेरान नगरपालिका 11 पॉइंटच्या सुशोभीकरणाचे काम करणार आहे. त्यापैकी सनसेट पॉईंटकडे जाणार्‍या रस्त्यामध्ये लुईझा पॉईंटच्या बाजूला असलेल्या मलंग पॉइंटचे सुशोभीकरण सुरू आहे. निसर्ग …

Read More »

जलप्रदूषण करणार्या सलून मालकावर कर्जत नगरपालिकेकडून कारवाईचा बडगा

कर्जत : बातमीदार शहरातील सलून चालकाने आपल्या दुकानातील केसांनी भरलेली पोती उल्हास नदीच्या पात्रात टाकली होती. त्याबद्दल उल्हास नदी संवर्धन टीमने केलेल्या तक्रारीवरून नगरपालिका प्रशासनाने शहरातील वेस्टर्न लूक सलूनवर कारवाई केली असून, यापुढे असे प्रकार करणार्‍यांवर मुंबई अधिनियम अ‍ॅक्टनुसार कारवाई केली जाईल, असे संकेत नगरपालिकेने दिले आहेत. कर्जत शहरातील केश …

Read More »

समाजाचे आधारवड : संजयआप्पा ढवळे

कोणतीही संस्था, संघटना, पक्ष मजबूत करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असते. त्यावर सर्वच निर्भर असते. ज्या ठिकाणी उत्तम नेतृत्व ती संस्था, संघटना, असोसिएशन, राजकीय पक्ष नावारूपाला व भरभराटीला आल्याशिवाय राहत नाही. असेच एक सक्षम नेतृत्व संजयआप्पा द्वारकानाथ ढवळे यांच्या रूपाने माणगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाला लाभले आहे. त्यांचा आज गुरुवारी (दि. …

Read More »

कोंढवी किल्ल्याची आता पर्यटन विकासासाठी साद

पोलादपूर तालुक्यातील कोंढवी परिसरातील फणसकोंड, गांजवणे, खडपी, चोळई, धामणदिवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळ्याची वाडी या गावांचे आराध्य ग्रामदैवत आठगाव कोंढवी भैरवनाथ मंदिराच्या लगत नवीन भव्य पाषाण मंदिर बांधण्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर याकामी पाण्याची साठवण टाकी खणण्यासाठी खड्ड्यातील माती उपसण्यात आली. या मातीच्या ढिगार्‍यामध्ये 15 अश्मयुगीन पाषाण मूर्ती आढळून आल्याने …

Read More »

टीम इंडियाची फिनिक्स भरारी

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत 2-1ने हरवून नवा इतिहास रचला आहे. या मालिकेत भारताने यंदा विजयाची हॅट्ट्रिक केली. गेल्या सलग दोन वर्षी या प्रतिष्ठेच्या मालिकेत आपण ‘कांगारूं’ना नमविले आहे, पण या वेळी पहिल्या कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने मिळविलेला …

Read More »

आता पीटरसनने भारतीय संघाला डिवचले

म्हणतो, खूप आनंद साजरा करू नका! आमच्यापासून सावध राहा!! लंडन : वृत्तसंस्थाभारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत 2-1च्या फरकाने पराभूत करीत ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात देदीप्यमान कामगिरी करणार्‍या टीम इंडियासाठी पुढचे आव्हान तयार आहे. 5 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच इंग्लंडच्या माजी …

Read More »

आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर

ऋषभ पंतची मोठी झेप दुबई : वृत्तसंस्थाभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीत स्फोटक फलंदाजी करणारा भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे, तर विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे …

Read More »

समांतर न्यायालयांचे पेव

दुर्दैवाने सध्या समाजमाध्यमांचा रेटा अन्य प्रस्थापित माध्यमांनाही आपल्या मागून येण्यास भाग पाडत आहे. विशेषत: टीव्ही पत्रकारितेवर समाजमाध्यमांतील क्रिया-प्रतिक्रियांचा नकळत मोठा प्रभाव पडत गेला आहे. आजमितीस देशात शेकडो वृत्तवाहिन्या विविध भाषांमधून प्रसारित होत असतात. या वृत्तवाहिन्यांना सनसनाटी बातम्या आणि वादग्रस्त आशयाचे (कंटेंट) आकर्षण वाटू लागले. त्याचीच परिणती मीडिया ट्रायल नावाच्या भस्मासुरात …

Read More »

‘एसटीसारखे सुरक्षित वाहन नाही ही भावना प्रवाशांमध्ये दृढ करा’

मुरूड : प्रतिनिधी रस्ते अपघाताचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. तथापि खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीचे रस्ते अपघाताचे प्रमाण अल्प आहे. एसटीसारखे सुरक्षित वाहन दुसरे नाही, ही भावना प्रवाशांमध्ये दृढ करा, असे आवाहन मुरुड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी येथे केले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुरक्षितता मोहीमेचा   शुभारंभ उपनिरीक्षक सुबनावळ …

Read More »

रिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाला यश; पहिल्या टप्प्यात 351 जणांना मिळणार नोकरीची संधी; आंदोलन स्थगित

नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीविरुद्ध प्रकल्पग्रस्तांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. पहिल्या टप्प्यात 351 प्रकल्पग्रस्तांना ठेकेदारीत नोकरी मिळण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, उर्वरित प्रकल्पग्रस्तांनासुद्धा नोकरीत घेण्याचा शब्द मिळाला आहे. त्यामुळे आंदोलनाला सोमवारी (दि. 18) 53व्या दिवशी स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा मुंबई …

Read More »