Breaking News

Monthly Archives: January 2021

‘माथेरानच्या राणी’ला पर्यटकांची पसंती; मध्य रेल्वेच्या उत्पन्नात 33 लाख 61 हजारांची भर

कर्जत : रामप्रहर वृत्त अनलॉक होताच मुंबई आणि परिसरातील नागरिकांनी वन डे ट्रिप म्हणून माथेरानची वाट धरली. माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या मिनीट्रेनमधून फिरण्यास सर्वांनी पसंती दर्शविली आहे. यातून मध्य रेल्वेच्या उत्पन्नात 33 लाख 61 हजारांची भर पडली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये अनेक महिने घरात राहावे लागल्यामुळे सर्वांनाच बाहेर फिरण्याचे …

Read More »

माथेरानमधील शाळांची घंटा वाजली

कर्जत : बातमीदार कोविडच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या माथेरानमधील शाळा सोमवारपासून (दि. 11) सुरू झाल्या आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये असलेल्या खासगी आणि नगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट वाढला आहे. माथेरान येथील प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर मराठी माध्यमिक विद्यालय आणि सेंट झेव्हीयर इंग्लिश माध्यमिक या दोन शाळा सोमवारपासून नियमित सुरू झाल्या आहेत. शासनाच्या नियमांचे …

Read More »

हा तर ट्रेलर, लढा अजून बाकी आहे!; ‘रिलायन्स’विरोधातील प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन 47व्या दिवशीही सुरूच

नागोठणे : प्रतिनिधी आम्ही रिलायन्स किंवा अंबानींच्या नाही, तर व्यवस्थेच्या विरोधात लढत आहोत. संविधानाचे कलम 19प्रमाणेच नागोठण्यातील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू  आहे. त्यात यश आता जवळ येत चालले आहे. हा ट्रेलर असून लढा अजून चालू झालेलाच नाही, अशी स्पष्टोक्ती माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांनी येथे सभेत केली. नागोठणे येथील रिलायन्स …

Read More »

पनवेल एसटी आगाराच्या कामाला मुहूर्त कधी?

गुजरात परिवहन महामंडळाच्या सुरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बांधणार, असे सेनेचे नेते तत्कालीन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले होते. या बस पोर्टमध्ये तळमजल्यावर बस थांबा, प्रवासी विश्राम कक्ष, दुसर्‍या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय, तर तिसरा आणि चौथा मजला व्यावसायिकांसाठी असे नियोजन केल्याचे सांगून …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून संपत्ती लपवली; भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. दरम्यान, आता सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती लपवली असल्याचा आरोप करत त्यांनी ही तक्रार …

Read More »

एक कदम आत्मनिर्भरता की ओर प्रशिक्षण शिबिरास खारघरमध्ये प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड महिला मोर्चा, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि खादी ग्रामोद्योग कमिशन यांच्या माध्यमातून ‘एक कदम आत्मनिर्भता की ओर’ अंतर्गत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सोमवारी (दि. 11) करण्यात आले होते. हे शिबिर खारघर येथील रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले असून, या शिबिराचे उद्घाटन …

Read More »

सिडकोकडून बांधकाम क्षेत्राला दिलासा; आर्थिक वर्षात जमिनींच्या राखीव किमती गोठविणार

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको संचालक मंडळाच्या 19 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत नवी मुंबईच्या विविध नोडमधील आणि नोडबाहेरील क्षेत्रांसाठी सिडकोच्या मालकीच्या जमिनींच्या राखीव किंमती 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत गोठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अविकसित जमिनीची किंमत, सर्व प्रकारच्या …

Read More »

वर्षाअखेर जेएनपीटीची उच्चांकी मालवाहतूक

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) डिसेंबर, 2020 मध्ये 459,920 दशलक्ष टीईयूची हाताळणी केली. गेल्या वीस महिन्यांतील एक महिन्यात सर्वाधिक कंटेनर हाताळणीचा हा उच्चांक आले. मागील वर्षी याच महिन्यात केलेल्या कंटेनर हाताळणीच्या तुलनेत हे 9.90 टक्के अधिक आहे आणि मालवाहतुकीच्या संदर्भात डिसेंबर-2019 मध्ये हाताळलेल्या एकूण 5.79 दशलक्ष …

Read More »

पेणमध्ये मकरसंक्रांतीची लगबग

सुगड पूजन परंपरेतून कुंभार समाजाच्या हाताला काम पेण : अनिस मनियार शहरासह संपूर्ण पेण तालुक्यात सध्या मकर संक्रांतीच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. संक्रांतीसाठी लागणारी सुगडी बनवण्याच्या कामाने वेग घेतला आहे. भारतीय सण, परंपरेमुळे कुंभार समाजाचा सुगडी बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय टिकून आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी वाणाला अधिक महत्त्व आहे. तीळगूळ …

Read More »

बर्ड फ्लू : रायगड जिल्ह्यातही सतर्कता

अलिबाग : प्रतिनिधी सध्या तरी रायगड जिल्ह्यात कुठेही पक्षी अथवा कोंबड्यांचे संशयास्पद मृत्यू झाल्याची बाब समोर आली नाही. अजून तरी रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला नाही. तरीदेखील खबरदारी घेतली जात आहे. रायगड जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रत्येक तालुक्यात शीघ्र प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा …

Read More »