Breaking News

Monthly Archives: January 2021

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते कळंबुसरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील कळंबूसरेच्या अद्यावत नूतन ग्रामपंचायत कार्यालयच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा रविवारी (दि. 10) उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंटकचे राष्ट्रीय नेते महेंद्र घरत हे होते. आमदार महेश बालदी या वेळी म्हणाले की, गावचे नाव उच्च पातळीवर न्यायचे …

Read More »

मुंबईच्या विभाजनाला शिवसेनेची मूक सहमती? -अ‍ॅड. आशिष शेलार

सावंतवाडी : प्रतिनिधी मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी मुंबईसाठी दोन आयुक्त असले पाहिजेत, ही मुंबईच्या विभाजनाची जी मागणी केली आहे, त्याला शिवसेनेची मूक सहमती आहे काय? नसेल तर काँग्रेसला खडे बोल सुनवा, नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घालून सत्तेतून बाहेर काढा, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी …

Read More »

भारतासमोर तगडे आव्हान

चौथ्या दिवशीही गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका सिडनी : वृत्तसंस्थासिडनी येथे सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसर्‍या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपताना भारताने दोन विकेट्सच्या बदल्यात 98 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी अजूनही 309 धावांची गरज आहे. चौथ्या दिवसाच्या दुसर्‍या सेशनपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सच्या बदल्यात 312 धावा केल्या होत्या आणि 406 धावांची आघाडी घेतली. …

Read More »

हजारो कोंबड्यांचे प्राण वाचले

सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीत युद्धपातळीवर लसीकरण पाली : प्रतिनिधी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सिद्धेश्वर (ता. सुधागड) ग्रामपंचायत हद्दीतील गावे व वाड्यांमधील कोंबड्या रोगामुळे मृत्यूमुखी पडत होत्या. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ चिंतेत होते. हे निदर्शनास आल्यानंतर सरपंच उमेश यादव आणि व दुग्ध व्यावसायिक दत्ता इंदुलकर यांनी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांना …

Read More »

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्पर्धा विश्व अॅकॅडमीमध्ये अभिवादन

अलिबाग : रामप्रहर वृत्त येथील नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि रोहे येथील स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, तसेच स्पर्धा विश्व अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सावित्रीमाई जयंती तथा महिला मुक्तीदिन साजरा करण्यात आला. या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. स्पर्धा विश्व अकॅडमीमध्ये उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

बेकायदेशीर वाळू उपशाने नागोठणेतील शेतकरी संतप्त

जिल्हाधिकार्‍यांचे वेधणार लक्ष नागोठणे : प्रतिनिधी अंबा नदीच्या जांभूळटेप भागातील खाडीतून बेकायदेशीररित्या वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. त्यामुळे खारबंदिस्तीला खांडी पडून खारे पाणी शेतात येते व शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ हिराचंद गदमले, दामोदर भोईर, किरण भोईर, महादेव भोईर, लहू भोईर, केशव भोईर, कल्पेश भोईर …

Read More »

द्रुतगती महामार्गावर बसला अपघात

12 प्रवासी जखमी खालापूर, खोपोली : प्रतिनिधी ब्रेक निकामी झाल्याने एका खाजगी प्रवासी बसने रविवारी (दि. 10) पहाटे ट्रकला जोरदार धडक दिली. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत झालेल्या या अपघातात 12 प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खोपोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करण्यात आले. ‘वैभव ट्रॅव्हल्स‘ ची …

Read More »

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला

मुरूड ः प्रतिनिधीमुरूड पर्यटनस्थळी ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी, खोरा, दिघी आदी परिसरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. शनिवार-रविवारी पर्यटकांची संख्या अधिक असते. अशा वेळी 400 पर्यटकांनीच किल्ला पाहावा ही अट जाचक असून जलवाहतूक सोसायट्यांना ती मान्य नसल्याने बोट मालक-चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. परिणामी पर्यटकांना किल्ला न बघताच …

Read More »

प्रताप सरनाईकांची 78 एकर जमीन ईडीने केली जप्त

किरीट सोमय्या यांची माहिती कल्याण ः प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राइट हॅण्ड असलेले शिवसेनेचे घोटाळेबाज नेते प्रताप सरनाईक यांची टिटवाळा गुरुवली येथील 100 कोटींची 78 एकर जमीन ईडीने जप्त केली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. घोटाळा केलेली 100 कोटींची रक्कम परत न केल्यास सरनाईक यांच्या अन्य …

Read More »

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या नगरसेवकपदाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्यांतून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम केले. तसेच त्यांनी कोरोना महामारीच्या काळातही अनेकांना मदतीचा हात पुढे करीत सेवाकार्य बजावले. त्यांनी वर्षभरात केलेल्या या कार्याची माहिती नमूद असलेल्या ‘भरारी दृष्टीक्षेप …

Read More »