कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. कोकणातील समुद्रकिनारी असलेल्या भागात नारळ व सुपारी पिकांची मोठी बागायत जमीन आढळून येते. नारळ व सुपारीची उंच झाडे कोकणाचे वैभव वाढवत असतात. सुपारी हे पीक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे पीक आहे.झाडावर आलेली सुपारी काढल्यानंतर तिला कडक उन्हात शेकवल्यावर तिची कातणी केल्यावर व …
Read More »Monthly Archives: January 2021
सूड आणि आसूड
जनतेच्या प्रश्नांकडे संपूर्ण डोळेझाक करून आपापल्या खुर्च्या तेवढ्या सांभाळण्याच्या कामात व्यग्र असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराकडे पाहून कपाळावर हात मारावा की संतापाने उसळून उठावे असेच महाराष्ट्रातील तरुण पिढीला वाटत असेल. जनतेच्या समस्यांचा मुद्दा आला की केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे अंगलट आल्यावर चांगले काम करणार्या व्यक्तींना सूडबुद्धीने कायद्याच्या …
Read More »पनवेलच्या ग्रामीण भागात महाविकासपर्व
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नातून 30 कोटींच्या कामांना महापालिकेची मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त, प्रतिनिधीपनवेलच्या विकासाचा सातत्याने आलेख उंचावणारे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिका हद्दीतील शहर व ग्रामीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून …
Read More »पनवेलसह रायगडात ‘ड्राय रन’ यशस्वी
अलिबाग : प्रतिनिधीकेंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांत शुक्रवारी (दि. 8) कोरोना प्रतिबंधक लसीकरण सराव फेरी (ड्राय रन) यशस्वीरीत्या राबविण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात तीन आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेत एक आरोग्य संस्था या ठिकाणी ड्राय रनचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार पनवेलसह रायगड जिल्ह्यात हा …
Read More »अवकाळी पावसाचा मच्छीमारांना फटका
असंख्य बोटी किनार्यावर मुरूड : प्रतिनिधीसध्या पडत असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका मच्छीमारांना बसला आहे. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींनी किनारा गाठला आहे.आगरदांडा, राजपुरी, खोरा बंदरात मोठ्या संख्येने बोटी शाकारण्यात आल्या आहेत.खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी एका बोटीला किमान 80 हजार रुपयांपर्यंत सामग्रीचा खर्च होत असतो. त्यानुसार …
Read More »पोलादपूरमध्ये वीज पडून घर आगीमध्ये भस्मसात
पोलादपूर : प्रतिनिधीतालुक्यातील लहुळसे गावात असलेल्या एका सामायिक घराच्या इमारतीवर गुरुवारी (दि. 7) सायंकाळी मुसळधार पावसादरम्यान वीज पडली. त्यामुळे आग लागून हे घर भस्मसात झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.लहुळसे गावातील शिवराम गणपत रिंगे यांच्या वडिलोपार्जित घरावर गुरुवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास वीज पडली. वीज कोसळण्यादरम्यान घरात …
Read More »`उधार’राजाचे जाहीर आभार
उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा टोला नागपूर : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी नागपुरात दाखल होत गोसेखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचनक्षमता याबाबतची संपूर्ण माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांच्या या दौर्याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौर्याबाबत फडणवीसांनी ट्विट केले. …
Read More »आयपीएल-14साठी खेळाडूंचा होणार लिलाव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या हंगामाचे आयोजन यूएईत केले होते. दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चाललेल्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करीत सलग दुसर्यांदा विजेतेपद पटकावले. त्यानंतर आता बीसीसीआयने पुढच्या हंगामाची सुरुवात केली आहे. आयपीएलच्या 14व्या …
Read More »महेंद्रसिंह धोनी होणार मालामाल!
आयपीएलमध्ये 150 कोटी पगार घेणारा पहिलाच खेळाडू रांची : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)मध्ये सर्वाधिक पगार घेणार्या खेळाडूंमध्ये महेंद्रसिंह धोनी अग्रस्थानावर आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या प्रवासात त्याने सर्वांत जास्त म्हणजेच 137 कोटी पगार घेतला आहे आणि यंदा होणार्या आयपीएल-14मध्ये तो आणखी एक विक्रम नावावर करणार आहे. आयपीएलच्या पुढील पर्वात धोनी आयपीएलमध्ये …
Read More »यंदा बालेवाडीत रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा?
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि 64व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. कोरोनाविषयक सर्व शिष्टाचारांचे पालन करून या स्पर्धेला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, ही स्पर्धा पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडांगणावर फेब्रुवारीच्या उत्तरार्धात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper