मुरूड तहसीलदारांना निवेदन मुरुड : प्रतिनिधी प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने मुरूड तहसील कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी शुक्रवारी (दि. 29)काळ्या फिती लावून राज्यव्यापी आंदोलनाचे रितसर निवेदन तहसीलदार गमन गावित यांना दिले. चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत यापूर्वी वारंवार निवेदने देऊनही …
Read More »Monthly Archives: January 2021
खारघरमधील कृत्रिम फुफ्फुस काळवंडले
राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने दखल घेण्याची मागणी खारघर : प्रतिनिधी खारघरच्या हिरानंदानी चौकात 15 जानेवारी रोजी वातावरण फाऊंडेशनने प्रदूषणाची गुणवत्ता तपासण्यासाठी पांढर्या शुभ्र रंगाचे कृत्रिम फुफ्फुस लावण्यात आले होते. हे कृत्रिम फुफ्फुस अवघ्या 10 दिवसांतच काळवंडलेे आहेत. त्यामुळे या परिसरात प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे राज्य प्रदुषण …
Read More »पनवेलमध्ये स्ट्रॉबेरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग
वावंजे गावातील शेतकर्याचे कौतुक खारघर : प्रतिनिधी महाबळेश्वरमधील प्रसिध्द स्ट्रॉबेरीचे पीक पनवेल तालुक्यातील एका शेतकर्याने घेतले आहे. वावंजे गावातील सज्जन गोवर्धन पवार (वय 40) यांनी हा प्रयोग वावंजे परिसरातील श्री मलंगड डोंगराच्या पायथ्याशी सात गुंठे जागेत राबविला आहे. पनवेलची स्ट्रॉबेरी हा चर्चेचा विषय ठरला असून हा प्रयोग यशस्वी करणार्या शेतकर्याचे …
Read More »आयुक्तांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे फसवणूक
पनवेल : वार्ताहर आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या बनावट फेसबुक अकाऊंट संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या नावाचे हुबेहुब बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे त्यांच्या फेसबुक फ्रेंड्ससोबत चॅटिंग करून गुगले पेद्वारे पैसे ट्रान्सफर करण्याची मागणी करण्यात येत आहे. …
Read More »पनवेल बसस्थानकातील शौचालयाची तातडीने दुरुस्ती करा
सभापती सुशिला घरत यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या बसस्थानकावरुन घाटमाथ्यावर तसेच कोकणात जाण्यासाठी सोयीचे बसस्थानक आहे. या बसस्थानकावरुन रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या बसस्थानकाचे काम थांबलेले आहे. तसेच या ठिकाणच्या शौचालयाची दुरवस्था झाल्याने विशेषता महिला प्रवाशांना याचा नाहक त्रास …
Read More »पागोट्याच्या सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर
गुप्त मतदानाद्वारे आठ विरुद्ध दोन निकाल उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्या पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच अॅड. भार्गव दामाजी पाटील यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 29) ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत सरपंचांविरोधातील अविश्वासाचा ठराव आठ विरुद्ध दोन असा …
Read More »पनवेलमध्ये चौथ्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याहस्ते शहरातील लाइफलाइन हॉस्पीटल येथे चौथ्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपायुक्त संजय शिंदे, अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, लाइफलाइन हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश पाटील, डॉ. जयश्री पाटील, डायरेक्टर पराग बेडसे, डॉ. आनंद गोसावी, चांडक, रेहाना, डॉ.लोहारे, डॉ. अजिंक्य पाटील, डॉ. केतकी …
Read More »जेएनपीटीचा सेझच्या डीपीआरसाठी पुढाकार
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) नौकानयन मंत्रालयाच्या ’सागरमाला’ कार्यक्रमांतर्गत बहुउत्पाद विशेष आर्थिक क्षेत्र (मल्टीप्रॉडक्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन) (एसईझेड) विकसित करीत आहे. नवी मुंबई येथील जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीच्या 277 हेक्टर जमीनीवर हे सेझ विकसित करण्यात येत आहे. जेएनपीटी-सेझ साठीचा विकास आराखड्याचा प्रस्ताव तयार …
Read More »उरण येथे राम निधी अभियानांतर्गत बाईक रॅली
उरण : वार्ताहर अयोध्येत उभारण्यात येणार्या श्रीराम मंदिरासाठी राम मंदिर निधी अभियाना अंतर्गत उरणमध्ये मंगळवारी (दि. 26) सायंकाळी बाईक रॅली आणि रथ यात्रा काढण्यात आली. प्रथम मोरा येथील राम मंदिरात भाजप उरण व्यापारी असोशिएशचे अध्यक्ष हितेश शाह, अभियान प्रमुख दर्शन पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व बाईक रॅली, रथ …
Read More »भारताने जगाला कोरोना संकटातून वाचवले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने कोरोना नियंत्रणात आणून जगाला एका मोठ्या संकटातून वाचवले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जागतिक आर्थिक मंचाद्वारे आयोजित ’दावोस अजेंडा’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी दूरदूश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. या वेळी जगभरातील 400 मोठ्या उद्योजकांचे प्रमुख प्रतिनिधी या कार्यक्रमाला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper