Breaking News

Monthly Archives: February 2021

शिवजयंतीनिमित्त भाजपची शिवगान स्पर्धा

‘सीकेटी’त रायगड जिल्ह्याची प्राथमिक फेरी कर्जत ः बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठ सेलच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा अंतिम सोहळा किल्ले अजिंक्यतारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याची प्राथमिक फेरी …

Read More »

पार्किंगअभावी पर्यटकांची गैरसोय

खोरा बंदरातील सुविधा उद्घाटनाविना; वाहने रस्त्यावर मुरूड ः प्रतिनिधी खोरा बंदरात नुकतेच एक कोटींचा खर्च करून 400 गाड्यांच्या क्षमतेच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे, मात्र काम पूर्ण होऊन दीड वर्ष झाले तरी अजून पार्किंगचा ठेका देण्यात आला नाही. परिणामी जागा असूनही पर्यटकांना आपल्या गाड्या रस्त्यावर लावाव्या लागत आहेत. त्यामुळे पर्यटकांना …

Read More »

कपडा व्यापार्‍याने तयार केलीय चेन्नईची खेळपट्टी

चेन्नई : वृत्तसंस्था भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातून 43 वर्षीय व्यक्तिचेही पदार्पण झाले आहे. 2021 वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात व्ही. रमेश कुमार यांना तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून कॉल गेला… इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठीच्या खेळपट्टीच्या क्युरेटरची जबाबदारी स्वीकाराल का, असे त्यांना विचारण्यात आले. रमेश यांनाही हे आश्चर्यकारक वाटले. यापूर्वी त्यांनी कधीच …

Read More »

आयपीएल 2021 : स्मिथ-मॅक्सवेलसह 13 खेळाडूंची बेस प्राइज सर्वाधिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेच्या 2021च्या हंगामासाठी 18 फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलसह 13 खेळाडूंची मूळ किंमत सर्वाधिक दोन कोटी रुपये आहे. प्रत्येक संघात कमाल 25 खेळाडूंना स्थान देता येते. लिलावात 814 भारतीय आणि 283 परदेशी खेळाडूंचा …

Read More »

मोठ्या आव्हानापुढे टीम इंडिया ढेपाळली; पुजारा-पंतने सावरले; मात्र संघ अद्याप 321 धावांनी पिछाडीवर

चेन्नई : वृत्तसंस्था इंग्लंड संघाने दिलेल्या 579 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसर्‍या दिवसाखेर भारतीय संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात 257 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघ अद्याप 321 धावांनी पिछाडीवर आहे. तिसर्‍या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वॉशिंगटन सुंदर (33) आणि आर. अश्विन (8) नाबाद होते. दिग्गज फलंदाज झटपट माघारी परल्यामुळे भारतीय …

Read More »

फणसाड अभयारण्यात जळीत रेषा काढण्याच्या कामाला वेग

मुरूड : प्रतिनिधी जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी फणसाड अभयारण्यातर्फे दरवर्षी जळीत रेषा काढण्याचे काम केले जाते. रस्त्यालगत असणारे गवत अथवा झाडेझुडपे जाळून टाकली जातात, जेणेकरून वणव्यांपासून जंगलाचे संरक्षण केले जाईल. त्या अनुषंगाने मुरूड येथील नवाबांचा राजवाडा परिसरात जळीत रेषा काढण्याचे काम सुरू आहे. या वेळी फणसाड अभयारण्याचे वनरक्षक अरुण पाटील, …

Read More »

पाच तासांत 5555 जोर; पेणच्या अजय पाटीलचा विक्रम

पेण ः प्रतिनिधी हनुमान व्यायामशाळा पेण व श्री फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पेणमध्ये जोर (हिंदू पुशअप) मारण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पेण तालुक्यातील बळवळी येथील 26 वर्षीय अजय कमलाकर पाटील या तरुणाने पाच तासांत 5555 जोर काढून विक्रम प्रस्तापित केला आहे. रविवारी (दि. 7) सकाळी 7 वाजून …

Read More »

सर्वांच्या सहकार्यामुळेच अभूतपूर्व यश -मोहन काळे

कर्जत : प्रतिनिधी कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर महाविद्यालयाला महाराष्ट्रातील बेस्ट कॉलेज तसेच प्राचार्य डॉ. मोहन काळे यांना बेस्ट प्रिन्सिपल अ‍ॅवॉर्ड मिळाल्याने महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या अ‍ॅवॉर्डचे श्रेय तुम्हा सर्वांचे आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच अभूतपूर्व यश मिळाले. यापुढेही असेच सहकार्य लाभल्यास आपल्या महाविद्यालयाचे नाव अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास फार्मसी …

Read More »

मच्छिमारांना होणार्या त्रासाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

संबंधित पोलीस अधिकार्‍यांना सूचना द्या; पनवेल व उरणच्या आमदारांची मागणी उरण : वार्ताहर उरण विधानसभा मतदारसंघातील करंजा गावातील मासेमारी  करणार्‍या कोळी बांधवांना समुद्रात मासेमारी यांत्रिकी नौकांना त्रास सहन करावा लागत आहे. या होणार्‍या त्रासाबद्दल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे …

Read More »

नेरळचे व्हिजन

नेरळ ग्रामपंचायतीमध्ये पुढील चार वर्षे काम करीत असताना मागील आठ महिने कोरोना काळात गेलेला वेळ आगामी काळात भरून काढण्यासाठी विकासकामांचे नियोजन रावजी शिंगवा आणि प्रथमेश मोरे यांनी केले आहे. ग्रामपंचायतीवर कितीही प्रसंग आले तरी सतत पुढील विचार करणारे सदस्य मंडळ यांनी आता आपल्यापुढे नेरळचे व्हिजन आखून ठेवले आहे. त्यात नेरळकरांना …

Read More »