Breaking News

Monthly Archives: February 2021

ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याला सुरक्षा; अतिरेकी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त

मुरूड : प्रतिनिधी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यात अतिरेकी हे पर्यटकांना ओलीस ठेवून देशविघातक कृत्य करू शकतात असा पोलीस यंत्रणेचा गुप्त अहवाल असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या अनुषंगाने येथे सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा सर्वदूर प्रसिद्ध असून, तो पहाण्यासाठी असंख्य पर्यटक येत असतात, पण या …

Read More »

धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; पत्नी करुणा यांची पोलिसांकडे तक्रार, मुलांना बंगल्यात डांबल्याचा आरोप, आमरण उपोषण करण्याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणार्‍या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी आता मुंडेंविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यात गेल्या तीन महिन्यांपासून मुंडे यांनी आपल्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून …

Read More »

व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर

अलिबाग : प्रतिनिधी आवास येथील बा. ना. हायस्कूल या ठिकाणी नुकतीच रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेतून सिंधखेड (धुळे) येथे  6 व 7 फेब्रुवारी रोजी होणार्‍या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याच्या संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात राजेश पाटील, (मॉडेल रांजणखार, कर्णधार), …

Read More »

रायगड जिल्ह्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अलिबाग : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यासाठी  रायगड जिल्हा परिषदेला (राजिप)   चालू आर्थिक वर्षात चार कोटी 11लाख 61हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीपैकी एक कोटी नऊ हजार 570 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला …

Read More »

थकीत रक्कम मिळाल्याने माथेरानच्या सफाई कामगारांचे उपोषण स्थगित

कर्जत : बातमीदार माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या ठेकेदाराकडील सफाई कामगारांनी थकीत मानधन मिळावे यासाठी 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले होते. तब्बल नऊ दिवसांनी मागण्यांवर सन्मानजनक तोडगा निघाल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला माथेरान नगरपालिकेच्या ठेकेदाराकडील सफाई कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषण मागे घेण्यासाठी नगर …

Read More »

माणगावमध्ये स्कूल बसची ट्रॅक्टरला धडक

माणगाव : प्रतिनिधी शहरातील टेंबेनाका येथे  बुधवारी (दि. 3) सकाळी  स्कुल बसने कचरा उचलणार्‍या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात नगरपंचायतीच्या सफाई कामगाराला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.तर ट्रॅक्टरमधील दोन सफाई कामगार जखमी झाले. माणगाव नगरपंचायतीचे सफाई कामगार नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कचर्‍याच्या ट्रँक्टर (एमएच-11, जी-2796) सह शहरातील टेंबेनाका …

Read More »

बंद मोबाइल टॉवर शेतकर्यांसाठी डोकेदुखी

महाडमधील शेतकर्‍यांना महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाईची नोटीस महाड : प्रतिनिधी तालुक्यातील अनेक गावात गेली काही वर्षे बंद असलेले मोबाईल टॉवरची विनाशेती दंडात्मक वसुली झालेली नाही. महसूल विभागाने आर्थिक वर्ष समाप्तीआधी मोबाईल टॉवरकडून दंडवसुली मोहीम सुरु केली आहे. त्याच्या नोटीसा शेतकर्‍यांना देण्यात आल्याने आणि कंपन्यांनी बंद केलेले टॉवर जागीच पडून राहिल्याने …

Read More »

युनियन बँकेचे पोलादपूर एटीएम सात महिने बंद

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील एकमेव युनियन बँकेच्या पोलादपूर शाखेतील एटीएम बंद होऊन तब्बल सात महिने झाले आहेत, मात्र ग्राहकांची गैरसोय आजतागायत सुरूच आहे. दरम्यान, या कालावधीमध्ये बँकेने एटीएम सेवाशुल्कापोटी किमान साडेतीन हजार ग्राहकांचे प्रत्येकी 180 रुपयांपर्यंतची रक्कम परस्पर खात्यातून लांबविण्याचा प्रकार नियमित सुरू ठेवला आहे. पोलादपूर तालुक्यात 2009 सालापासून युनियन …

Read More »

रोहा पं. स. कार्यालयावर ग्रामपंचायत कर्मचार्यांचा धडक मोर्चा

धाटाव : प्रतिनिधी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने रोहा पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यात प्रामुख्याने उत्पन्न व वसुलीची अट घालणारा 27 एप्रिल 2020चा शासन निर्णय रद्द करणे, …

Read More »

खालापुरातील कचर्याची विल्हेवाट लावणार्या कारखान्याला ग्रामस्थांचा प्रखर विरोध

खालापूर : प्रतिनिधी मुंबईतील विविध रुग्णालयांतील जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी खालापूर तालुक्यातील आत्करगाव येथे एसएमएस नावाचा कारखाना येऊ घातला असून, त्याला आत्करगाव, आडोशी, चिंचवली, टेंबेवाडी, होनाड, कुंभेवाडी, आत्करगाववाडी, जंगमवाडी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा विरोध दर्शविला. या संदर्भात ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, खालापूर तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच स्थानिक खासदारांना निवेदन दिले आहे. …

Read More »