Breaking News

Monthly Archives: March 2021

पहिल्याच वन डेत भारत तीनशेपार; धवन, विराट, पांड्या, राहुल यांची अर्धशतके

पुणे ः प्रतिनिधी कसोटी आणि टी-20 मालिकेत दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारताने मंगळवारी (दि. 23) इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मोहिमेला प्रारंभ केला. पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करीत निर्धारित 50 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 317 धावा केल्या. भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन या अनुभवी जोडीने  संयमी सुरुवात केली आणि 13व्या …

Read More »

माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे मास्कचे वाटप

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्या अनुषंगाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता शहरात जुने स्टँड येथे रविवारी (दि. 21) सायंकाळी माजी नगराध्यक्ष योगिता चव्हाण, राजिपचे माजी सभापती ज्ञानदेव पवार, यशस्वी उद्योजक विजयशेठ मेथा यांच्या हस्ते 500 मास्कचे वाटप करण्यात आले. …

Read More »

सराईत वाहनचोर जेरबंद : कर्जत गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदार कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथून मोटरसायकल, रिक्षा चोरणार्‍या चोरास कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केले आहे. त्याने तीन लाख 70 हजार रुपयांची पाच वाहने चोरली होती. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या चोर्‍यांना प्रतिबंध करण्याकरिता रविवारी (दि. 21) कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रगटीकरण पथक कर्जत शहरात …

Read More »

योग्य प्रसिद्धी आणि नियोजनाअभावी फणसाड अभयारण्याकडे पर्यटकांची पाठ

मुरूड ः प्रतिनिधी रायगडातील कोकण किनारपट्टीवर हिरव्यागार झाडांच्या कुशीत वसलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड अभयारण्य होय. मुंबईपासून 160 किमी अंतरावर पनवेल, पेण व अलिबाग मार्गावरील विस्तीर्ण असे फणसाड अभयारण्य म्हणजे निसर्गाचे एक वरदानच आहे, मात्र फणसाड अभयारण्याची योग्य ती प्रसिद्धी न केल्याने महसुलात प्रचंड घट झाली. तसेच सुविधांचा अभाव …

Read More »

राज्यात काही शहरांमध्ये लॉकडाऊनचे संकेत

मुंबई ः प्रतिनिधीकोरोना रुग्णवाढ न थांबल्यास राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळावेच लागतील, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.राज्यात रोज कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी (दि. 23) …

Read More »

संवाद… कोरोनाबाधित रुग्णांशी!

पनवेल महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांना कॉल करून त्यांची माहिती घेण्यासाठी संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या संपर्क कक्षातील शिक्षिकांनी आपुलकीने चौकशी केल्यावर काही रुग्ण ’तुम्ही चांगले काम करता, खूश राहा, सुखी राहा,’ असा आशीर्वाद देत आहेत. महापालिकेच्या या कामाचे ते कौतुकही करीत असल्याचे समजते. पनवेल महापालिका क्षेत्रात 10 मार्च …

Read More »

रक्त-प्लाझ्मादान शिबिरास प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन 90 वर्षांपूर्वी देशाच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले. या महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ देश व विदेशात रक्तदान व प्लाझ्मादान शिबिर आयोजित करण्यात आले. त्या अनुषंगाने मंगळवारी (दि. 23) पनवेलच्या खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात रक्त व प्लाझ्मादान …

Read More »

नवनीत राणा आक्रमक

अरविंद सावंतांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामहाराष्ट्रातील सचिन वाझे प्रकरण संसदेत उपस्थित करणार्‍या अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.संसदेत सचिन वाझे प्रकरण …

Read More »

राज्यात पोलीस बदल्यांचे रॅकेट

फडणवीसांचा गौप्यस्फोट; मुख्यमंत्री ठाकरेंनी पांघरूण घातल्याचाही आरोप मुंबई ः प्रतिनिधीपरमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारविरोधात आणखी गौप्यस्फोट केला. राज्यात पोलीस बदल्यांचे रॅकेट कार्यरत होते. त्या संदर्भात फोन टॅपिंग करण्यात आले, मात्र सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणावर पांघरूण घातले, असा दावा फडणवीस …

Read More »

1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस

केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आणखी वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस घेता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी …

Read More »