Breaking News

Monthly Archives: March 2021

कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कर्जत तालुक्याला विळखा; एका आठवड्यात 69 जण पॉझिटिव्ह

कर्जत ः प्रतिनिधी एक वर्ष कोरोनाशी सामना करता करता जनतेच्या नाकीनऊ आले. गेल्या महिन्यात कर्जत तालुका कोरोनामुक्तही झाला होता. त्यामुळे कोरोना जाईल असे वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे सर्वच कार्यक्रमांवर पुन्हा निर्बंध आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचा फायदा घेऊन साखरपुडा, लग्न तसेच अन्य सोहळे, समारंभांची  रेलचेल सुरू झाली. …

Read More »

नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; पेण भाजपची मागणी

पेण ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेखी पत्राद्वारे दरमहा 100 कोटी रुपये वसूल करून देण्याबाबतचे आरोप केले आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांवर एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने असे आरोप करणे पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात, जनमानसात राज्य सरकारची बदनामी सुरू आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख …

Read More »

राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपचा हल्लाबोल

कर्जतमध्ये निषेध आंदोलन कर्जत ः बातमीदार, प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यात माजी आयुक्तांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे. एवढा मोठा पुरावा …

Read More »

सायकलपटू अ‍ॅड. गजानन डुकरे यांचा आणखी एक विक्रम

90 किमीचे अंतर साडेतीन तासांत पूर्ण कर्जत ः बातमीदारक्रीडापटू असलेले कर्जत तालुक्यातील अ‍ॅड. गजानन डुकरे यांनी 26 जानेवारी रोजी भारताचा तिरंगा झेंडा लावून सायकल चालवत एक विक्रम केला होता. त्यानंतर रविवारी (दि. 21) झालेल्या सायकालिंगच्या राजगुरू भगतसिंग सुखदेव इंडियन फ्लॅग साईड वर्ल्ड अट्टेम्प स्पर्धेत त्यांनी 90 किलोमीटर अंतर विक्रमी वेळेत …

Read More »

गोळीबार करणारा शेकापचा नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात

दोन साथीदारांसह कोठडीत रवानगी खोपोली ः प्रतिनिधीगोळीबार करून फरार झालेला खोपोली नगर परिषदेचा शेकापचा नगरसेवक प्रशांत कोठावले व त्याचे दोन साथीदार यांना अटक करण्यात अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याला यश आले आहे. या तिघांना खालापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 15 मार्चला एका …

Read More »

सचिन वाझे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती

केंद्र सरकारने चौकशी करावी -राज ठाकरे मुंबई ः प्रतिनिधीदहशतवादी बॉम्ब ठेवतात अशा घटना आपण आजवर पाहत आलो, पण आता पोलीस बॉम्ब ठेवतात ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय धक्कादायक बाब आहे. बॉम्ब ठेवणारा सचिन वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य पद्धतीने होणार नाही. …

Read More »

हे तर चोरांचे आणि खुन्यांचे सरकार -प्रकाश आंबेडकर

मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. हे चोरांचे आणि खुन्यांचे सरकार आहे. त्यामुळे ते बरखास्त …

Read More »

तेव्हा राज्य सरकार झोपले होते का?

फडणवीसांचा सवाल मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 21) …

Read More »

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या खंडणी वसुली कारभाराचा पनवेलमध्ये भाजपकडून जाहीर निषेध

पनवेल ः हरेश साठेपोलिसांना दरमहा 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचे टार्गेट देऊन महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात पनवेल भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 21) जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची …

Read More »

रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीची हमी द्यावी; सुरेश कोकाटे यांची मागणी

नागोठणे ः प्रतिनिधी खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 31 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात रिलायन्स प्रकल्पग्रस्तांसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीची हमी दिल्याबाबतचे पत्र प्रकल्पग्रस्तांना द्यावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष सुरेश कोकाटे यांच्यासह इतर प्रकल्पग्रस्तांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करण्याच्या …

Read More »