Breaking News

Monthly Archives: March 2021

पनवेल बसस्थानकात कोरोना नियमांचा फज्जा

प्रवाशांसह वाहकांवर कारवाई करण्याची मागणी पनवेल : वार्ताहर पनवेलमध्ये बसथानकातील बसवर मास्क नाही, प्रवेश नाही असे फलक लावण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्षात मास्कचे गांभीर्य कोणालाच दिसत नाही. त्यामुळे कोरोना महामारीचे गांभीर्य न घेणार्‍या प्रवासी व वाहकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

खोपोली बसची वेळ बदला -भाजपची मागणी; एसी बससाठीही आग्रह

खोपोली ः प्रतिनिधी खोपोली शहर तसेच खालापूर तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी तसेच कामानिमित्त नोकरदार, अधिकारीवर्गाच्या सोयीसाठी खोपोली भाजपने पुढाकार घेतला आहे. नवी मुंबई येथील सकाळची पहिली बस 6 वा. तसेच दुपारदरम्यान एसी बस सुरू करण्याचे निवेदन पत्र भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी व शहर सरचिटणीस इश्वर शिंपी यांनी आमदार गणेश नाईक, …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला इंटरनॅशनल डायमेन्शन अवॉर्ड

ब्रिटिश कौन्सिलकडून जागतिक बहुमानलोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन खारघर ः प्रतिनिधीजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला ब्रिटिश कौन्सिलकडून इंटरनॅशनल डायमेन्शन अवॉर्ड मिळाला आहे. या जागतिक बहुमानामुळे शाळेसह संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.शैक्षणिक वर्ष 2019-20मध्ये घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शालेय अ‍ॅक्टिव्हिटी स्पर्धेत रामशेठ ठाकूर …

Read More »

कर्जतमध्ये चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा

कर्जत ः बातमीदार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून सत्याग्रह केला होता. त्या अनुषंगाने 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. त्या अंतर्गत कर्जत तालुक्यात असंख्य भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

उरणचा डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सोडवा

आमदार महेश बालदी यांची शासनाकडे मागणी उरण ः वार्ताहरउरण शहर तसेच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी कायमस्वरूपी डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा उपलब्ध नसल्याने दरदिवशी गोळा होणारा सुका व ओला कचरा टाकणार कुठे अशी समस्या निर्माण होत आहे. राज्य शासनाने डम्पिंग ग्राऊंडसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी केली …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर कौन्सिलिंग उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या वतीने करिअर कौन्सिलिंग उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. 20) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना …

Read More »

परप्रांतीयांचा पुन्हा परतीचा प्रवास

नागपूर ः प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा मजुरांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. हे स्थलांतर महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये होऊ लागले आहे. मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये येणार्‍या व जाणार्‍या बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या बसस्टॅण्डवर मध्य प्रदेशमध्ये …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला कोरोना लसीकरणाचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीतील उपजिल्हा रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी शनिवारी (दि. 20) भेट देत नागरिकांना देण्यात येणार्‍या कोरोना प्रतिबंधक लसींची व साठवणुकीची माहिती घेतली, तसेच लस घेतलेल्या नागरिकांशी संवाद साधला.केंद्र शासनाच्या आदेशानुसार 1 मार्चपासून पनवेल महापालिका …

Read More »

रत्नागिरीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट; चार कामगारांचा मृत्यू, एक जण जखमी

रत्नागिरी ः रत्नागिरीत लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल कंपनीमध्ये शनिवारी (दि. 20) सकाळी स्फोट होऊन चार कामगार मृत्युमुखी पडले, तर एक जण जखमी आहे.मिळालेल्या माहितीनुसार, घरडा कंपनीत 7 नंबरच्या प्लांटमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटानंतर आग लागली आणि परिसरात धुराटे लोट पसरले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकाही …

Read More »

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाइनच

मुंबई ः प्रतिनिधीराज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (दि. 20) जाहीर केले. त्यानुसार इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत, तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल व 21 मेदरम्यान होणार आहे.राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदा दहावी, …

Read More »