नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेपूर्वीच तीन भारतीय बॅडमिंटनपटूंना कोरोनाची लागण झाली असून, एक सहाय्यक कर्मचारीदेखील कोरोना संक्रमित आढळला आहे. उर्वरित खेळाडूंचे अहवाल येणे बाकी आहे. कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली नाहीत.पॉझिटिव्ह झाल्याबद्दल भारतीय प्रशिक्षक मॅथेस बो यांनी आश्चर्य व्यक्त केले. दोन आठवड्यांपूर्वी आम्ही …
Read More »Monthly Archives: March 2021
देशांतर्गत क्रिकेटला कोरोनाचा फटका
विनू मंकड स्पर्धेबाबत अनिश्चितता; बीसीसीआयचा निर्णय मुंबई ः प्रतिनिधीदेशातील वाढत्या कोरोना रुग्णांचा फटका देशांतर्गत क्रिकेटला बसला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)ने सर्व वयोगटामधील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मे-जून महिन्यात होणार्या 19 वर्षांखालील वयोगटातील विनू मंकड स्पर्धेचाही समावेश आहे. आयपीएल स्पर्धेनंतर देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. …
Read More »वाझेंचा ऑपरेटर सरकारमध्येच
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप नवी दिल्ली : वृत्तसंस्था मुंबईतील हाय प्रोफाइल भागात सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यामुळे राज्य सरकारची मोठी अडचण झाली आहे. या मुद्द्यावरूनच मुंबई पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली. या घडामोडीनंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी …
Read More »अंबा नदी संवर्धनाची गरज; प्रदूषण व मानवी हस्तक्षेपामुळे अस्तित्व धोक्यात
पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीला प्रदूषणाने वेढले आहे. सांडपाणी, कंपन्यांमधील प्रदूषित पाणी व कचरा, वाळू उपसा यामुळे अंबा नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे नदी संवर्धनाची मागणी होत आहे. खालापूर तालुक्यातील चावणी आंबेनळी घाट व सुधागड तालुक्यातील मानखोरे या दोन ठिकाणांहून अंबा नदीचा उगम होतो …
Read More »पेण, अलिबागला जाणार्या गाड्या रद्द; कर्जत परिसरातील सकाळी प्रवास करणार्यांची गैरसोय
कर्जत : बातमीदार तालुक्यातील ग्रामस्थांना अनेकदा शासकीय कामांसाठी अलिबाग येथील जिल्हा मुख्यालयात जावे लागते. मात्र कर्जत एसटी आगाराने सकाळच्यावेळी पेण, अलिबाग येथे जाण्यासाठी असलेल्या तीन गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग ते कर्जत हे अंतर साधारण 100 किलोमीटर आहे. येथील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी …
Read More »ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठीचे प्रयत्न त्रोटकच
अमेरिकेतील अॅमेझॉन आणि ब्राझिलच्या जंगलात लागलेली आग अनेक महिने पेटत राहिली आणि त्यामुळे होणार्या ग्लोबल वॉर्मिंगची चर्चाही जगभर झाली. तापमानवाढीच्या या समस्येचे स्वरूप गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक पातळीवर सर्वत्र अनुभवण्यास मिळत असताना त्याबाबत जागतिक स्तरावर कधीही प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत. त्याचप्रमाणे ग्रामीण पातळीवरदेखील ग्लोबल वॉर्मिंगचे प्रयत्न शक्य असताना त्यासाठीदेखील …
Read More »निरर्थक मलमपट्टी
अँटिलिया स्फोटक प्रकरणात वाझेसोबत पोलीस दलातील आणखी कोण कोण आणि किती जण सामील आहेत? मुंबई पोलिसांचे दल कार्यक्षमतेबद्दल देशातच नव्हे तर जगात लौकिक कमावून आहे. असे असताना काही सडके आंबे सगळीच आढी नासवत आहेत याची वेळीच दखल का घेतली गेली नाही? राज्याचे गृहखाते झोपा काढत होते काय? अशा असंख्य प्रश्नांची …
Read More »पांढर्या कांद्याच्या मागणीत वाढ
उरण : वार्ताहर पांढरा कांदा औषधी गुणधर्म, रुचकर, कमी तिखटपणा अशी विविध वैशिष्ट्य असलेला अलिबागचा पांढरा कांदा सालाबादप्रमाणे उरण बाजारात दाखल झाला आहे. नागरिक ह्या कांद्याला खरेदी करणे पसंत करीत असतानाचे चित्र उरण बाजार पेठेत दिसत आहे. या कांद्याची ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये भात कापणी झाल्यानंतर लागवड केली जाते. अडीच महिन्यात …
Read More »सिडकोचा वर्धापन दिन साधेपणाने
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या स्थापनेस बुधवारी (दि. 17) 51 गौरवशाली वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. सिडकोची आजवरची यशस्वी कारकीर्द व सिडकोतर्फे यशस्वीरित्या हाताळण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध प्रकल्प यातूनच सिडकोचे नगरविकास क्षेत्रातील अतुल्य योगदान दिसून येते. सिडकोच्या नगरविकासातील …
Read More »प्रसिद्ध कबड्डीपटूंचा अपघातात मृत्यू
इंदापूर : प्रतिनिधी कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाटकातील विजापूरपासून वीस किलोमीटर असलेल्या बेडगी या गावाकडे निघालेल्या इंदापूर तालुक्यातील खेळाडूंच्या गाडीची कंटेनरशी धडक होऊन दोन जण ठार झाले, तर सहा जण गंभीर झाले आहेत. या सर्वांना विजापूरमधील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील कळंब येथील महाराणा कबड्डी संघ राज्यभरात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper