Breaking News

Monthly Archives: March 2021

कर्जतमध्ये ट्रक उलटला

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार चौक- मुरबाड रस्त्यावरील चारफाट्यानजिकच्या  रेल्वे पुलाच्या चढणीवर एक लोखंडी सळया भरलेला ट्रक पलटी झाला आणि अडकला. अन्यथा खाली राहणार्‍या घरातील रहिवाश्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता. या अपघातात ट्रकची पुढची काच फुटल्याने चालक सुरक्षितपणे बाहेर आला. ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडली. लोखंडी सळ्या भरलेला ट्रक …

Read More »

कर्जतमध्ये नवीन नऊ पॉझिटिव्ह

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाचा जोर कमी-जास्त होत आहे.  गुरूवारी (दि. 11) नवीन नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर बुधवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे दोन दिवसात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात चिंताजनक वातावरण झाले आहे. कर्जत तालुक्यात आजपर्यंत 1949 कोरोना रुग्ण सापडले असून त्यापैकी 1829 जणांनी …

Read More »

महिलांना हीन वागणूक देणार्या हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खोपोलीत भाजपतर्फे निषेध

अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन खोपोली : प्रतिनिधी जागतिक महिला दिनी महिला आमदारांना वेठबिगार्‍यासारखी वागणूक देणारे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाकडून उत्तर रायगड अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 12) खोपोलीत आंदोलन करण्यात आले. भाजप महिला मोर्चाच्या खोपोली शहर अध्यक्ष शोभा काटे, …

Read More »

परीक्षार्थींचा उद्रेक

राज्य सेवा परीक्षा आयोजनाच्या कामात सरकारी कर्मचारीच सहभागी असतात हे खरे आहे. परंतु त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ का आली याचे उत्तर मात्र मिळू शकत नाही. संबंधित कर्मचार्‍यांना याआधीच कोरोना नियंत्रणाच्या कर्तव्यातून मोकळे करून परीक्षेच्या कामाला जुंपता आले असते. साहजिकच वैतागलेल्या परीक्षार्थींनी इतके दिवस झोपला होता काय असा सवाल सत्ताधार्‍यांना …

Read More »

पनवेल मनपा हद्दीत आजपासून रात्रीची संचारबंदी

पनवेल : येथील महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी 125 कोरोना रुग्ण आढळले असून, या आठवड्यात सतत 90पेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महापालिका हद्दीतील कोणत्याही व्यक्तीस …

Read More »

नवी मुंबईत वर्षभरात 301 सायबर गुन्हे

साडे चार कोटी रुपयांची फसवणूक; 30 आरोपींना अटक नवी मुंबई : प्रतिनिधी इंटरनेटच्या वापरात वाढ होत असतानाच सायबर गुन्ह्यांशी संबधित गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात गेल्या कॅलेंडर वर्षामध्ये याप्रकारचे 301 गुन्हे घडले असून यातील फक्त 46 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणून 30 आरोपींना अटक केली …

Read More »

कॅनडातही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बोलबाला; कोरोला लस पुरविल्याबद्दल पोस्टर लावून कौतुक

ओटावा ः वृत्तसंस्था कोरोनाच्या वैश्विक महामारीने संपूर्ण जगालाच आपल्या कवेत घेतले. कोरोनामुळे लाखो लोकांचे बळी घेतले आहेत, परंतु आता कोरोनाची लस बाजारात आल्याने जगभरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लशींचा पुरवठा केल्याबद्दल कॅनडा सरकारने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. कॅनडामधील ग्रेटर टोरंटो परिसरातील रस्त्यांवर भारत …

Read More »

महाराष्ट्रात कोरोना स्थिती गंभीर; केंद्राला चिंता

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात एकीकडे कोरोनावरील लसीकरण सुरू असताना काही राज्यांत मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत आहेत. खासकरून महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत असून, देशाला कोरोनामुक्त करायचे असेल सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज आहे, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 70 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या  वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे 70 सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचअनुषंगाने गुरुवारी (दि. 11) महाशिवरात्रीनिमित्त पनवेलमध्ये रेल्वे स्थानकाजवळ व अन्य ठिकाणी गरीबांना 70 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष …

Read More »

नागपुरात सात दिवस लॉकडाऊन

नागपूर ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नागपूर मनपासह पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत असलेल्या कामठी, हिंगणा आणि वाडी येथेही हे लॉकडाऊन असणार आहे. नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत सात …

Read More »