Breaking News

Monthly Archives: March 2021

खोपोलीत लसीकरणाची सोय व्हावी; नागरिकांची मागणी

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण सापडलेल्या खोपोली शहरातील नगर परिषदेच्या रूग्णालयात कोरोना लसीकरणाची सोय व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर एप्रिल महिन्यात खालापूर तालुक्यात पहिला कोरोना रूग्ण सापडला होता. त्यानंतर वर्षभरात केवळ खोपोली नगर परिषद हद्दीतच 80 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तीन …

Read More »

सावधगिरी बाळगूया कोरोनाला टाळूया

पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे वाढते रुग्ण ही चिंतेची बाब असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. सावधगिरी बाळगूया कोरोनाला टाळूया, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. अलिकडच्या काही दिवसांत कुटूंबातील सर्व सदस्य बाधित असल्याचे दिसून …

Read More »

रोटरी क्लबचे सेवाकार्य आदर्शवत; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन, पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य साहित्याचे लोकार्पण

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहरात आणि तालुक्यात असलेल्या रोटरी क्लब्जनी समाजाला काही तरी देण्याची निकोप स्पर्धा केली तर अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतील. रोटरी क्लबचे हे सेवाकार्य पनवेलकरांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण करेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर  यांनी गुरुवारी (दि. 11) केले. ते आरोग्य साहित्याच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. …

Read More »

एमपीएससी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; पुण्यासह राज्यात विद्यार्थ्यांचा उद्रेक, राज्य सरकारचा निषेध

पुणे ः प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 14 मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त असून, एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात पुण्यासह अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलत असल्याची अधिकृत माहिती एमपीएससीने गुरुवारी (दि. 11) …

Read More »

उरणमधील कराटेपटूंचे सुयश

उरण ः प्रतिनिधीअलिबाग येथे स्टुडंट ऑलम्पिक असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये उरण तालुक्यातील पूर्व विभागातील गोशीनरियु कराटेपटूंनी पदके जिंकली.स्पर्धेत उरणमधील अमिता अरुण घरत, अमिषा अरुण घरत, सेजल नामदेव पाटील, अर्णव सुशांत पाटील, रोहित शरद घरत, आयुष सुधाकर पाटील, यश रामचंद्र मोकल, सुजित कृष्णा …

Read More »

लबाडाघरचे आवतण

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लबाड सरकार असा दुर्लौकिक महाविकास आघाडीच्या सरकारने मिळवल्याची शेलकी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळाचे अधिवेशन संपताना केली. खरे तर त्याला शेलकी टीका असे म्हणण्यापेक्षा ती लोकांच्या मनातील भावनाच आहे असे म्हणावे लागेल. एकमेकांमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय नसलेले हे तीन चाकी महाबिघाडी सरकार अंतिमत: मराठी …

Read More »

ॐ नम: शिवाय! नियमांचे पालन करून भक्तांनी घेतले महादेवाचे दर्शन

उरण : वार्ताहर महाशिवरात्रीनिमित्त उरण शहरातील महादेवाच्या मंदिरात भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून भक्तांनी मनोभावे भोळ्या शंकराचे दर्शन घेतले. दरवर्षी शहरातील शंकराच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील मंदिरांमध्ये गर्दी कमी होती. अनेकांनी घरातच पूजा, उपवास, नैवद्य करून महाशिवरात्री मोठ्या …

Read More »

विक्रांत पाटील यांच्या नगरसेवक निधीतून शिव मंदिराच्या परिसरात सुशोभिकरण

पनवेल : वार्ताहर कार्यक्षम नगरसेवक तसेच माजी उपमहापौर विक्रांत पाटील त्यांनी आपल्या नगरसेवक निधीतून पनवेल तालुका पोलीस स्टेशन जवळील शिव मंदिराच्या आवारात लोखंडी ग्रील व आणि पत्र्याची शेड बसविण्यात आले आहेत. विक्रांत पाटील नेहमी आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यास प्राधान्य देत असतात व त्याचबरोबर विकासकामे, तलाव आणि मंदिरांचे सुशोभीकरण हे सुद्धा …

Read More »

खारघरमध्ये महिला दिनी विरंगुळा केंद्राचे लोकार्पण

पनवेल : प्रतिनिधी खारघर  सेक्टर 11 मध्ये महिला दिनी महिला पोलीस निरीक्षक आणि महिला डॉक्टरच्या हस्ते विरंगुळा केंद्राचा लोकार्पण सोहळा झाला. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग 4 चे नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या नगरसेवक निधीतून हे विरुंगुळा केंद्र उभारण्यात आले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर येथे सेक्टर 11 मध्ये असलेल्या उद्यानात अनेक दिवस …

Read More »

नवी मुंबईत होणार महाराष्ट्र भवन

 आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणी व पाठपुराव्यास यश नवी मुंबई : प्रतिनिधी वाशी येथील आरक्षित भूखंडावर भव्य महाराष्ट्र भवन उभारण्याकरिता चालू अर्थसंकल्पीय वर्षात निधीची तरतूद करण्यात यावी, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार  मंदा म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांजकडे मागणी केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वाशी नवी मुंबई येथे …

Read More »