मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरी भागातील वीजपुरवठा करणार्या वाहिन्या भूमिगत करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता, तसेच त्या संदर्भात मागणी व पाठपुरावा करून शासनाचे लक्ष केंद्रित केले. त्या अनुषंगाने महावितरणकडून 151.53 कोटी रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) …
Read More »Monthly Archives: March 2021
रायगडात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
रोहा तालुक्यात दोन कोरोनाबाधित आढळले रोहे ः प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाचे रूग्ण रोज सापडत असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मंगळवारी रोहा तालुक्यात कोरोनाचे दोन रूग्ण सापडले असून सहा व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. रोहा तालुक्यात सध्या 32कोरोना सक्रिय रूग्ण असून, ते विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. फेबुवारीमध्ये कोरोनाचे रूग्ण बरे …
Read More »देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग
मुंबई ः अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी झालेल्या आरोपानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग आणला. यासोबतच फडणवीसांनी मराठा आरक्षणावरून काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधातही हक्कभंगाची नोटीस दिली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाची सध्या राष्ट्रीय …
Read More »अखेर सचिन वाझेंची उचलबांगडी; मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ठाकरे सरकार बॅकफूटवर
मुंबई ः प्रतिनिधी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दा विरोधी पक्ष भाजपने अधिवेशनात आक्रमकपणे लावून धरल्यानंतर ठाकरे सरकार बॅकफूटवर आले आहे. या मृत्यू प्रकरणात संशयाची सुई असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अखेर गुन्हे शाखेतून बदली करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी (दि. 10) विधान परिषदेत …
Read More »माणगावात स्त्रीशक्तीचा जागर
माणगाव : प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद व साहित्याचा मधूघट समूह यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव शहरातील बालाजी मंदिर सभागृहात घेण्यात आलेल्या जागर स्त्रीशक्तीचा सन्मान हिरकणींचा या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. अक्षरा चव्हाण यांनी केले. कोमसाप दक्षिण रायगड अध्यक्ष संजय गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या …
Read More »कर्जत रेल्वेस्थानकात जागतिक महिला दिन उत्साहात
कर्जत : बातमीदार रेल्वे पॅसेंजर असोसिएशन, रेल्वे पोलीस आणि आरपीएफ जवान यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत रेल्वे स्थानकात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष सुवर्णाचे जोशी, असोसिएशनच्या सदस्या कल्पना दास्ताने, शर्वरी कांबळे, बिनिता घुमरे, सुषमा ढाकणे, मनिषा अथणीकर यांच्यासह आरपीएफ पोलीस रुपाली मोहिते, माधुरी खंडागळे यांनी या वेळी महिलांच्या …
Read More »कर्जत भाजप महिला मोर्चाकडून नारीशक्तीचा सन्मान
कर्जत : बातमीदार भाजप महिला मोर्चा कर्जत मंडळाच्या वतीने शेलू येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बचत गट यशस्वीपणे चालवणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला, तसेच कोरोना काळात चांगले काम करणार्या महिला डॉक्टर्स, पोलीस, शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्या वृषाली वैद्य यांनी महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. भाजप महिला मोर्चा …
Read More »पोलादपूर नगरपंचायतीच्या सीमा आकसणार?
तालुक्याचे गाव असलेल्या पोलादपूर ग्रामपंचायतीला राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार नगरपंचायत घोषित करून तहसीलदारांना प्रशासक नियुक्त केले आहे, मात्र नगरपंचायतीच्या रचनेमध्ये सीमा विस्तारण्याऐवजी आकसण्याचा धोका महामार्गाच्या चौपदरीकरणासोबत जुलै 2005च्या पूरस्थिती पुनर्वसनामुळे निर्माण झाला आहे. पोलादपूर ग्रामपंचायत पूर्वी ग्रुप ग्रामपंचायत होती, मात्र तिचे विभाजन होऊन चरई आणि काटेतळी या स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात …
Read More »रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज : रोमहर्षक सामन्यात इंग्लंडची भारतावर मात
रायपूर ः वृत्तसंस्था रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात थरार पाहायला मिळाला. इंग्लंड लिजंडने अवघ्या सहा धावांनी भारत लिजंडवर मात केली, पण भारताच्या इरफान पठाण आणि मनप्रीत गोनी यांनी इंग्लंडच्या संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंड लिजंडच्या 189 धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग ही जोडी अपयशी …
Read More »मुंबई इंडियन्सला जेतेपदाचे षटकार मारण्याची संधी
मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवणार्या मुंबई इंडियन्स या वर्षी जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी मैदानात उतरेल आणि त्यांची पहिली लढत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्याशी होणार आहे. आयपीएलच्या 14व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेतील सर्व लढती देशातील सहा शहरांत होणार आहेत. कोरोना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper