Breaking News

Monthly Archives: March 2021

मेरी कोमला कांस्यपदकावर समाधान

स्पेन : वृत्तसंस्थासहा वेळा जगज्जेतेपद पटकावणार्‍या एमसी मेरी कोमला संघर्षपूर्ण उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत व्हावे लागल्याने बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या 37 वर्षीय मेरीला अमेरिकेच्या विर्जिनिया फच्स हिने हरवले. दोघींनी तोडीस तोड खेळ केल्यानंतर पंचांनी फच्सच्या बाजूने कौल दिला.पहिल्या फेरीत दोन्ही खेळाडूंनी सावध पवित्रा …

Read More »

भारताकडून बांगलादेशचा धुव्वा

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज रायपूर : वृत्तसंस्थारोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये शुक्रवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात इंडिया लिजेंड्स संघाने बांगलादेश लिजंड्सवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना अनेक वर्षांनंतर सचिन तेंडलुकर आणि वीरेंद्र सेहवाग ही जोडी पुन्हा मैदानात पाहायला मिळाली.बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण बांगलादेशला …

Read More »

माणगावच्या शालेय मंत्रिमंडळाची स्पर्धेत दखल

ऑनलाइन निवडणूक उपक्रमाचा ‘डायट‘कडून गौरव माणगाव : प्रतिनिधी पनवेल येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने शिक्षकांसाठी घेतलेल्या यशोगाथा या शैक्षणिक उपक्रमात भाले (ता. माणगाव) येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक  संतोष बापट यांनी सादर केलेल्या ’इव्हीएम मशीनद्वारे शालेय मंत्रिमंडळ ऑनलाइन इलेक्शन’ या उपक्रमाचे विशेष कौतुक झाले. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने (डायट) मागील दोन …

Read More »

मुरूड नांदगाव येथे भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर

अलिबाग : प्रतिनिधी ऐरोली नवी मुंबई येथील जय हिंद अकादमी या संस्थेने नांदगाव (ता. मुरूड) येथील लक्ष्मी फॉरेस्ट कॅम्पिंग येथे घेतलेल्या तीन दिवसांच्या भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरात 15 पुरुष आणि तीन महिला सहभागी झाल्या होत्या. मुरुड येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रसाद चौलकर यांनी आयोजित केलेल्या या शिबिरात एन. एस. जी ब्लॅककॅट कमांडो …

Read More »

देवपाडा-वंजारपाडा रस्त्याची दुरवस्था

कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ देवपाडा – वंजारपाडा रस्त्याची पुरती वाट लागली आहे. हा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. पुढे चिंचवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. नेरळ -वंजारपाडा मार्गे देवपाडा, चिंचवाडी या गावांना जोडणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे 10 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याकडे …

Read More »

चौक गावानजीक पोल्ट्रीचा कचरा उघड्यावर

खोपोली : प्रतिनिधी कोरोना आणि बर्ड फ्लू संसर्गाच्या भीतीने नागरिक आधीच त्रस्त आहेत. मात्र चौक (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत पोल्ट्रीचा  शिल्लक कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात प्रंचड दुर्गंधी पसरली असून, रोगराईची शक्यता वाढली आहे. मुंबई – पुणे महामार्गावर खालापूर तालुक्यातील चौक गाव वसलेल आहे. मोठी बाजारपेठ म्हणून चौक गाव विकसित …

Read More »

कर्जत खांडस येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नेरळ पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार तालुक्यातील खांडस गावातील एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड आणि नंतर लैगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, विधी संघर्षग्रस्त 16 वर्षीय बालक फरार आहे. खांडस गावातील अल्पवयीन मुलीची आई …

Read More »

बाजारातील चांगल्या कंपन्यांचा शोध

आजचे जागतिक अर्थकारण आणि भारताची आर्थिक स्थिती, याचा फायदा भारताला होताना दिसतो आहे. त्यामुळे धाडसाने चांगल्या कंपन्यांत गुंतवणूक करणे चालूच ठेवले पाहिजे. अशा चांगल्या कंपन्या म्हणजे नेमक्या कोणत्या कंपन्या हे या दुसर्‍या भागात समजून घेऊ यात. कंपनीच्या निवडीबाबत आपण मागील आठवड्यात आपण मोठ्या कंपन्या व प्रवर्तकांच्या हिश्याबाबत पाहिलं होतं. आता …

Read More »

मग मनमोहन सिंग यांनी हे धाडस का केले नाही?

भारतीय अर्थव्यवस्था संघटीत करण्याच्या महामार्गाची पायाभरणी जागतिकीकरणाच्या मार्गाने ज्यांनी केली आहे, त्या माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहनसिंग यांना आता असंघटीत क्षेत्राविषयी काळजी करण्याचा अधिकार पोचत नाही. तो तेव्हाच पोचला असता, जेव्हा त्यांनी आपल्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत असंघटीत क्षेत्राच्या भल्यासाठी मुलभूत आणि आमुलाग्र असे काही बदल केले असते. देशाला जागतिकीकरणाची दिशा …

Read More »

जागतिक सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

तळोजा ः प्रतिनिधी येथील दीपक नायट्राइट लि. कंपनीत सर्व कामगारांच्या उपस्थितीत 4 ते 10 मार्चदरम्यान साजरा होत असलेल्या जागतिक सुरक्षा सप्ताहाचे थाटामाटात उद्घाटन झाले. या वेळी एमआयडीसी फायर ऑफीसर दीपक डारुगडे यांच्या हस्ते सुरक्षा साहित्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सुरक्षा साहित्यांचे प्रदर्शन पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. कार्यक्रमात साइट …

Read More »