Breaking News

Monthly Archives: March 2021

भारताचे स्टार खेळाडू मुंबई इंडियन्स संघात दाखल

मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 2-1 असा विजय संपादन केल्यानंतर आता सर्वांना आयपीएलच्या 14व्या हंगामाचे वेध लागले आहेत. 9 एप्रिल ते 30 मेदरम्यान आयपीएलचे सामने रंगणार आहेत. त्यामुळे भारतीय संघातील सर्व खेळाडू आपापल्या फ्रेंचायझीकडे निघाले आहेत. सोमवारी कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडूही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात …

Read More »

राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंची सुवर्ण कामगिरी

पाली ः प्रतिनिधीइंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनतर्फे इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम, पोलो ग्राऊंड, श्रीनगर काश्मीर येथे पार पडलेल्या सीनियर राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी रेगू इव्हेंटमध्ये चमकदार कामगिरी केली. पालीतील अनुज सरनाईक तसेच विशाल मोरे, ओमकार अभंग यांनी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.      तसेच स्टँडिंग (फाइट) या इव्हेंटमध्ये अंशुल कांबळे व …

Read More »

टीम इंडियाने उधळला विजयाचा रंग

तिसर्‍या वन डेत इंग्लंडचा धुव्वा; मालिकाही घातली खिशात पुणे ः प्रतिनिधी भारतीय संघाने रविवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात दमदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघापुढे 330 धावांचे आव्हान ठेवले होते, पण ठरावीक फरकाने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले आणि …

Read More »

लॉकडाऊन नकोच

लॉकडाऊनच्या वर्षपूर्ती पाठोपाठच महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरोग्य आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरात ओसरलेली कोरोनाची लाट दुप्पट वेगाने उसळून त्सुनामीसारखी महाराष्ट्रावर येऊन आदळली आहे. परंतु असे असले तरी लॉकडाऊनसारखा भयंकर उपाय हा अखेरचा पर्याय असेल हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवायला हवे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत लॉकडाऊन हा निर्णायक उपाय मानता येणार …

Read More »

उरण भेंडखळच्या बीपीसीएल; प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला यश

उरण : प्रतिनिधी बीपीसीएल प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना सोसायटी बनवून प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्याचे मान्य केले आहे. या बैठकीत परमनंट कामगारांचे काम जे बाहेरचे कान्ट्रॅक्ट लेबर्स करतात ते सर्व काम प्रकल्पग्रस्त सोसायटीच्या माध्यमातून करतील असे बैठकीत ठरविण्यात आले. त्यामुळे आमदार महेश बालदी यांच्या पाठिंब्याने करण्यात आलेल्या उपोषणाला अखेर यश आले आहे. उरण …

Read More »

विद्यार्थिनींकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्याच्या खेडेगावातील कॉलेजमध्ये शिकणार्‍या तीन विद्यार्थिनींनी आपल्या दैनंदिन पॉकीट मनीतून बचत केलेल्या पैशातून कर्जत शहरातील कन्या शाळेत वह्या वाटप करून आदर्श घालून दिला आहे. या तीन तरुणींनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून या वह्या वाटपातून गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास उत्साह मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त …

Read More »

पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा…

पनवेल : प्रतिनिधी आता पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा… लॉकडाऊनच्या नुसत्या आठवणीने अंगावर काटा येतो. अलिकडच्या काही दिवसात धार्मिक, कौटुंबिक, सणासुदीच्या कार्यक्रमातही शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सुचनांचे पालन नागरिक करीत नसल्याने पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. 10 मार्च 2020 रोजी पनवेल महापालिका क्षेत्रात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. …

Read More »

नवी मुंबईतील खाजगी रुग्णालयात कोरोना लसीकरणास सुरुवात

नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे शहरात मनपाकडून विविध ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. त्यानुसार वाशीतील एमजीएम रुग्णालय व इएसआयएस या दोन रुग्णालयात जम्बो लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी भाजपचे अ‍ॅड. निलेश भोजणे व सामाजिक कार्यकर्ते अंशुवर्धन राजेश शेट्टी यांनी मनपा आयुक्त अभिजित …

Read More »

शिवजयंती साध्या पद्धतीने करण्याचे निर्देश

पनवेल : प्रतिनिधी कोविड 19मुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून 31 मार्च 2021 रोजी तिथीनुसार होणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ साधेपणाने साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. यालाच अनुसरून पनवेल महानगरपालिकेने शहरातील शिवजयंती मंडळांनी यावर्षीचा शिवजयंतीचा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी …

Read More »

पनवेलमध्ये वाढत्या कोरोनामुळे कामगारांना लॉकडाऊनची भीती

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात झालेल्या टाळेबंदीला एक वर्ष पाच दिवस पूर्ण झाले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात  कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज 200पेक्षा जास्त  रुग्ण आढळत असल्याने पुन्हा लॉकडाऊन लागेल की काय, असा प्रश्न पनवेलकरांना पडला आहे. मध्यमवर्गीय तसेच कामगार वर्गात  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, …

Read More »