Breaking News

Monthly Archives: May 2021

मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर

चंदिगड ः वृत्तसंस्था कोरोना संसर्गावर उपचार घेणारे दिग्गज अ‍ॅथलिट मिल्खा सिंग यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे मिल्खा सिंग यांना काही दिवसांपूर्वी आयसीयूत दाखल करण्यात आले होते. ‘फ्लाइंग शीख’ म्हणून जगभरात ओळखले जाणारे मिल्खा सिंग कोरोनामुळे चंदिगड येथील आपल्या घरातच विलगीकरणात होते, मात्र अचानक प्रकृती खालावल्यामुळे …

Read More »

माझ्या उत्तम कामगिरीचे श्रेय राहुल द्रविडला

पृथ्वी शॉचा खुलासा मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाचा युवा बॅट्समन पृथ्वी शॉ मागील आयपीएलमध्ये अतिशय खराब फॉर्ममध्ये होता. आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही तो फेल गेला. त्यामुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. यानंतर पृथ्वी शॉने जोरदार खेळ केला आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने सर्वाधिक धावांचा विक्रम केला, तर आयपीएल स्थगित होण्यापूर्वी त्याने …

Read More »

टी-20 वर्ल्डकपसाठी ओमानचाही पर्याय

दुबई ः वृत्तसंस्था आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये घेण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्याचबरोबर यूएईमध्ये टी-20 वर्ल्डकप आणि काही द्विपक्षीय मालिकादेखील होणार आहेत. यूएईमधील तीन पीचवर हे सर्व सामने झाल्यास शेवटच्या टप्प्यात पीच स्लो होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार हे टाळण्यासाठी टी-20 वर्ल्डकपचे काही सामने यूएईसह ओमानमध्ये घेण्याची आयसीसीची …

Read More »

‘विस्डन’चे नेतृत्व विराटकडे

पाच भारतीयांचा समावेश नवी दिल्ली ः वृत्तसंस्था क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत इंग्लंडचा मायभूमीत पराभव करणे सध्याच्या घडीला कठीण आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाने मायभूमीत मागील 30 सामन्यांत 21 विजय मिळविले आहेत. इंग्लंड सध्या एकदिवसीय सामन्याचा विश्वविजेता संघ आहे. इंग्लंड संघात अनेक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. त्यांच्याच भूमीत त्यांचा पराभव करणे स्वप्नवत …

Read More »

वाशीनंतर ‘दिबां’च्या नेतृत्वाखाली झालेला उलवा गावच्या शेतकर्‍यांचा संघर्ष!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला शेतकर्‍यांचा जमीन बचाव संयुक्त लढा वाशी, …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचा जाहीर पाठिंबा

पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने पुढाकार घेतला असून, या कृती समितीच्या भूमिकेला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचने पाठिंबा जाहीर केला आहे. त्या …

Read More »

माथेरान शिवसेनेच्या 10 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात पक्षप्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्त थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील राजकीय उलथापालथीमुळे येथील वातावरण अचानक तापले आहे. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह 10 नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत गुरुवारी (दि. 27) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेसाठी …

Read More »

राज्यातील लॉकडाऊन कायम; मात्र काही प्रमाणात निर्बंधांत शिथिलता

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. 27) राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासह सध्या सुरू असलेला लॉकडाऊन आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात …

Read More »

उरणमध्ये बुद्धपौर्णिमा उत्साहात

उरण : वार्ताहर बौद्धजन पंचायत समिती उरण शाखा क्र.843 व माता रमाई महिला मंडळ उरण बौद्धवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 26) भगवान गौतमबुद्ध यांची 2565वी जयंती उरण येथील बौद्धवाडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. या वेळी बौद्धजन पंचायत समिती उरण शाखा क्र.843चे अध्यक्ष प्रकाश …

Read More »

श्रीराम संकीर्तन पुस्तकाचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य कीर्तनकार नारदमुनींच्या जयंतीचे औचित्य साधून पनवेल येथील ज्येष्ठ कीर्तनकार अनंत ऊर्फ नंदकुमार कर्वे यांच्या श्रीराम संकीर्तन या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (दि. 27) करण्यात आले. प्रसिद्ध कीर्तनकार राजेंद्रबुवा मांडेवाल यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अखिल भारतीय कीर्तन संस्था, दादर, दूरस्थ विद्यार्थी वृंद …

Read More »