मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लसीकरण मोहिमेवर भर दिला जातोय. अशावेळी लसी उपलब्ध नसल्याच्या या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले. यामध्ये निविदा भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. यात सुरुवातीला फक्त तीन टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासात पाच टेंडर आले. हे पाच टेंडर …
Read More »Monthly Archives: May 2021
पदोन्नतीतील आरक्षणावरून महाविकास आघाडीत बिघाडी?
सत्ता प्रिय नसल्याचा काँग्रेसचा सूचक इशारा मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारमध्ये पदोन्नतीतील आरक्षणाच्या आदेशावरून नवनवीन वाद निर्माण होत आहेत. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा देत कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीत संविधान नियमानुसार कामकाज महत्त्वाचे आहे. आम्हाला सत्ता प्रिय नाही, असे विधान करीत …
Read More »पेण तालुक्यात बुद्ध पौर्णिमा उत्साहात
पेण : प्रतिनिधी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2565 वी जयंती बुधवारी (दि. 26) पेण तालुक्यातील विविध ठिकाणच्या बुध्द विहारात उत्साहात साजरी करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून संपुर्ण जग कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करीत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन केले असून निर्बंध जारी केले आहेत. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून बुधवारी …
Read More »लसीकरणासाठी मुरूडमध्ये मोबाइल व्हॅन दाखल
रेशन दुकानदार यांनी घेतला लाभ मुरुड : प्रतिनिधी शासनाच्या योजना तसेच थेट जनतेशी संपर्क येणार्या यंत्रणांतील लोकांचे लसीकरण करण्यासाठी सर्व सुविधायुक्त मोबाइल व्हॅन बुधवारी (दि. 26) मुरूडमध्ये दाखल झाली असून, तहसीलदार गमन गावीत यांच्या उपस्थितीत या व्हॅनमध्ये लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. मुरूड तालुक्यातील रेशन दुकानदार, शिवभोजन केंद्र, गोदामातील हमाल, वाहन …
Read More »अलिबागेतील वादळग्रस्तांना भाजपकडून पत्रेवाटप
अलिबाग : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांच्या डोक्यावरील छप्पर उडाले. अलिबाग तालुक्यातील वादळग्रस्तांना आता भाजपाने मदतीचा हात पुढे केला आहे. भाजपच्या माध्यमातून तालुक्यातील वादळग्रस्तांना छताच्या पत्र्यांचे वाटप करण्यात आले. अलिबाग शहराबरोबरच लगतच्या वरसोली कोळीवाडा , रोहिदास नगर झोपडपट्टी येथील नागरिकांच्या घरावरील पत्रे वक्रीवादळात उडून गेले होते. त्यांना …
Read More »पेणमधील खारभूमी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे
उधाणाच्या पाण्याने नारवेल ते बेनवले बंधारा वाहून जाण्याची भिती पेण : प्रतिनिधी जागतिक बँकेच्या सहकार्याने पेण तालुक्यातील नारवेल ते बेनवले या 17 किमी लांबीच्या बंधार्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने पावसाळ्यात उधाणाच्या पाण्याने हा बंधारा वाहून जाण्याची भिती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. …
Read More »खालापुरातील शिवभोजन केंद्र चालकांची थाळी रिकामी
पाच महिन्यांपासून मोबदला नाही खोपोली : प्रतिनिधी कोरोना काळात गरिबांच्या पोटाला आधार देणारी शिवभोजन थाळीचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र शिवभोजन केंद्र चालकांची अवस्था बिकट झाली आहे. खालापूर तालुक्यातील केंद्र चालकांना गेल्या चार ते पाच महिन्यापासून शासनाकडून मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र कसे चालू ठेवावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना विद्यावेतन मिळवून देणारे ‘दिबा’
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…वाशी गावकर्यांनी एकजुटीने सिडकोविरुद्ध जमीन बचाव आंदोलनाची यशस्वी सुरुवात केल्यानंतर इतर गावांतही शेतकरी, …
Read More »महापौर आणि सभागृह नेत्यांकडून कोविड रुग्णालयांची पाहणी
पनवेल ः प्रतिनिधीकळंबोली येथील कोविड समर्पित रुग्णालय, एमजीएम रुग्णालय, तसेच भारतीय कपास निगमचे गोडाऊन येथे होणार्या प्रस्तावित जम्बो कोविड सेंटरला महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला.या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग ‘ब’ …
Read More »नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
सर्वपक्षीय कृती समितीला नाना पटोले यांचे आश्वासन मुंबई/पनवेल ः प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते. ओबीसी समाजासाठी त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. आमच्या पिढीचे ते आदर्श होते. त्यामुळे त्यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्वपक्षीय कृती समितीची त्यांच्याशी भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper