Breaking News

Monthly Archives: May 2021

जीवनावश्यक वस्तू वाटपाच्या पूर्वतयारीचा आढावा 

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपतर्फे तालुका आणि महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या वस्तूंच्या वाटपाची पूर्वतयारी मार्केट …

Read More »

म्युकरमायकोसिसचा रायगडात पहिला बळी

पनवेलमध्ये एक रुग्णाचा मृत्यू अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना संकट घोंघावत असतानाच रायगड जिल्ह्यातही आता म्युकरमायकोसिसचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यात या आजाराचे तीन रुग्ण आढळून असून यामध्ये पनवेलमधील दोन आणि खोपोलीतील एकाचा समावेश आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात या आजाराचा हा पहिला बळी ठरला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी …

Read More »

मुख्यमंत्री नुसत्या बाता मारताहेत

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल देवगड ः प्रतिनिधीविधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसीय कोकण दौर्‍यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करीत तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. देवगड येथे शुक्रवारी (दि. 21) प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केल्या जात असलेल्या टीकेचा फडणवीस यांनी समाचार घेतला. पंतप्रधान …

Read More »

मान्सूनचे अंदमान निकोबार बेटावर आगमन

नवी दिल्ली ः मान्सूनचे आगमन अंदमान निकोबार बेटावर झाले आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून लवकर हजेरी लावेल हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. यापूर्वी केरळमध्ये मान्सून वेळेआधी येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आता अंदमान निकोबार बेटांवर मान्सून सरी बसल्याने 31 मेपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दाटतील, असे हवामान खात्याकडून …

Read More »

विद्यार्थी वर्ग वार्यावर

सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द करून वेगळ्या मार्गाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या पाठोपाठ मायबाप महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याने एसएससी बोर्डाच्या परीक्षा रद्द करून टाकल्या. पण त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे काय, दहावीपश्चात पुढील शिक्षणाचे काय याची फिकीर सुद्धा केली नाही. माननीय उच्च न्यायालयाने याच बाबीवर बोट …

Read More »

पनवेल तहसीलमार्फत परिसरातील आश्रमांना मदत

पनवेल : वार्ताहर पनवेल तहसील कार्यालयामार्फत तालुक्यातील अनाथ आश्रमांना लोकसहभागातून मदतीचा हात देण्यात आला.तहसील कार्यालयामार्फत तालुक्यामधील अनाथ आश्रमांचा सर्व्हे करण्यात आला व पनवेल परिसरातील आश्रमांतील नागरिकांची संख्या विचारात घेता तहसीलदार कार्यालय पनवेल मार्फत लोकसहभागातुन अनाथ आश्रमांना मदतीचा हात देण्यात आला आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आला. लोणीवली येथील सिल …

Read More »

म्युकरमायकोसिसचे नवी मुंबईत आढळले 23 रुग्ण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतही म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असून या रुग्णांची संख्या 23 पर्यंत गेली आहे. यात खासगी रुग्णालयात 19 तर महापालिका रुग्णालयांत चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 35 टक्के रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे. मागील आठवड्यात फक्त सात रुग्ण होते. नवी मुंबईत 10 …

Read More »

‘त्या’ जाहिरात होर्डिंगच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल

पनवेल : वार्ताहर तौक्ते चक्रीवादळामध्ये जाहिरातीचा फलक मूळ स्ट्रक्चरसह खाली पडून त्या खाली झोपड्या दबल्याने, तसेच एक रिक्षा व मोटारसायकल दबल्याने नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी पनवेल शहर पोलिसांनी मे. अलवेज अ‍ॅडव्हरटायझिंगविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तौक्ते चक्रीवादळामध्ये जोरदार वाहणार्‍या वार्‍यामुळे गांधी हॉस्पिटलसमोरील इंदिरा नगर येथे आयटीआयजवळ असलेल्या मे. अलवेज …

Read More »

कळंबोलीतील गटाराची भाजप पदाधिकार्‍यांकडून पाहणी

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली मधील प्रभाग 8 मध्ये केएल 2 या ठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावरती जात आहे व तेच घाण पाणी बाजूच्या उद्यानात जात आहे. त्यामुळे तेथे डासांची उत्पत्ती झालेली आहे. या सार्‍यांचा त्रास तेथील नागरिकांना होत आहे. याची तक्रार भाजपचे कार्यकर्ते उद्धव भुजबळ यांनी भाजप भटके विमुक्त मोर्चाचे …

Read More »

नवी मुंबईत कोरोना मृत्यूदर नियंत्रणात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नवी मुंबईतील कोरोना मृत्यूदर हा भरपूर चिंता देत होता, परंतु वाढता कोरोनामुक्तीचा दर आणि कडक निर्बंध यामुळे कोरोनाचा मृत्यूदर कमी होत आहे. पहिल्या लाटेपेक्षा आताचा मृत्युदर हा कमी असला तरी दैनंदिन मृत्यू हे अधिक असल्याने ही चिंता प्रशासनापुढे कायम आहे. शहरात कोरोनाच्या …

Read More »