खारघर ः प्रतिनिधी तरुणाईच्या कलागुणांसाठी हक्काचे व्यासपीठ असणार्या भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात 11 ते 14 मेदरम्यान अभियान 2021 या ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वरांनी आणि वादनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. गायन स्पर्धेत रिद्धी समवादेने प्रथम, तर द्वितीय क्रमांक उमंग निगमने पटकावला. वादन स्पर्धेत …
Read More »Monthly Archives: May 2021
विनाकारण फिरणारे 295 जण कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल : वार्ताहर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीदेखील रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीये. शेवटी पोलीस प्रशासन व पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या मदतीने पनवेल महापालिका हद्दीत विनाकारण फिरणारे, भाजीविक्रेते व फळविक्रेते यांची रॅपिड अँटीजन व आरटीपीसीआर तपासणी सुरू केली आहे. यामध्ये तब्बल 295 जणांचा …
Read More »नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नाने पनवेलमध्ये वीजपुरवठा सुरळीत
पनवेल : वार्ताहर गेल्या दोन दिवसापूर्वी तौक्ते चक्रीवादळाचा फटका पनवेल शहराला मोठ्या प्रमाणात बसला. या वेळी शहरातील मिरची गल्ली, मिडल क्लास हौसिंग सोसायटी, भुसार मोहल्ला, कोळीवाडा, पंचरत्न हॉटेल परिसर, रोहिदास वाडा आदी भागातील रहिवाशांना बसून मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. याबाबतची माहिती कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांना मिळताच …
Read More »खारघरमध्ये लसीकरण केंद्र सुरू
पनवेल ः वार्ताहर रोटरी खारघर व मनुस्मृती ज्येष्ठ नागरिक घर यांच्या सहकार्याने पनवेल महानगरपालिकेने रोटरी मनुस्मृती मेडिकल सेंटर खारघरच्या ओवे गाव येथील सेक्टर 30 येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले आहे, अशी माहिती रोटरी खारघर मिडटाऊनचे अध्यक्ष कमलेश अगरवाल यांनी दिली. नुकतेच येथे 200 लोकांचे लसीकरण सुरळीतपणे झाले. दररोज येथे …
Read More »मच्छीमारांना भरपाई मिळून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील
नवी मुंबई : प्रतिनिधी 2020 पासून कोकणपट्टीमधील सहा जिल्ह्यांत मत्स्यव्यवसाय करणार्या मच्छीमारांवर मोठी आर्थिक संकटे आली आहेत. त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवी मुंबईमधील विधानपरिषद आमदार रमेश पाटील व त्यांचे सुपुत्र भाजप राज्य मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड. चेतन पाटील प्रयत्न करीत आहेत. शासनाबरोबर बैठका, निवेदनाबरोबरच प्रशासन संबंधित विभागाचे मत्स्यविकास …
Read More »मॅक्रो आणि मायक्रो कंटेन्मेंटमध्ये आरटीपीसीआर चाचण्या वाढविणार
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये ट्रेसिंग टेस्टींग आणि ट्रिटमेंटवर भर देण्यात येत आहे. यानुसार मॅक्रो आणि मायक्रो कंटेन्मेंटमध्ये आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यात येणार असून येथील सर्व नागरिकांना या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अद्यापही रुग्णसंख्या कमी …
Read More »डॉक्टरांच्या सुरक्षेवरून हायकोर्टाचे ठाकरे सरकारला खडे बोल; नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात पहिल्या दिवसापासून आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून लढत आहेत. कोरोनाविरोधातील या लढ्यात अनेक डॉक्टरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना योद्धे म्हणून गौरवले जात असले तरी अनेक ठिकाणी रुग्ण तसेच रुग्णांच्या कुटुंबीयांकडून डॉक्टरांना मारहाण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरून मुंबई …
Read More »सलूनवाल्यांनी मांडली विरोधी पक्षनेत्यांकडे व्यथा
माणगाव ः प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाचा कोकणाला जबरदस्त तडाखा बसला. या वादळग्रस्त भागाची पाहणी करताना रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर असताना बुधवारी (दि. 19) सायंकाळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर माणगाव येथे आले होते. त्या वेळी येथील सलून व्यावसायिकांनी आपली व्यथा त्यांच्यापुढे …
Read More »महाड शहरातील प्रवेशाचे मार्ग रोखले; पोलिसांची कारवाई
महाड ः प्रतिनिधी महाड शहरातील वाढती गर्दी कमी करण्यासाठी बुधवारी (दि. 19) अखेर पोलिसांनी विनाकारण फिरणार्यांना शहरात येणारे तीन मार्ग पूर्णपणे बंद केले. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून, पोलीस प्रशासनाकडून हा एकच उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे. महाड तालुक्यातील कोरोना वाढीचा दर हा इतर तालुक्यांच्या तुलनेने जास्त आहे. महाड …
Read More »महाड तालुक्यात चक्रीवादळामुळे 451 घरांचे, 30 गोठ्यांचे नुकसान
18 जिल्हा परिषद शाळांचीदेखील हानी महाड ः प्रतिनिधी गतवर्षी निसर्ग चक्रीवादळातून सावरणार्या कोकणातील नागरिकांना या वर्षी पुन्हा एकदा तोक्ते चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. महाड तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पंचानाम्यातून जवळपास 451 घरांचे नुकसान झाले आहे. घरांबरोबरच इतर खासगी मालमत्ता आणि शासकीय मालमत्तेचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. महाड तालुक्यात तोक्ते चक्रीवादळ थेट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper