Breaking News

Monthly Archives: May 2021

कोरोना काळातही आयपीएल सुरू ठेवण्याचा निर्णय योग्य होता; पीटरसनकडून बीसीसीआयचे समर्थन

इंग्लंड ः वृत्तसंस्था इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने कोरोना काळातही आयपीएल सुरू ठेवण्यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) समर्थन केले आहे. अशा कठीण परिस्थितीत भारतात आयपीएल सुरू ठेवण्याचा निर्णय योग्य होता. या टी-20 लीगद्वारे काही तास लोकांचे मनोरंजन होत होते आणि हा एक दिनक्रम होता, असे पीटरसनने …

Read More »

जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा : कुस्तीपटू सीमाला सुवर्णपदक

इक्वाडोर : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची कुस्तीपटू सीमा बिस्लाने जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले. इक्वाडोरच्या लुसिया गुझमनने दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतल्याने 29 वर्षीय सीमाला विजयी घोषित करण्यात आले. 2019मध्ये सीमाने यासार दोगू स्पर्धेत अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक ऑलिम्पिक …

Read More »

नवी मुंबई महापालिकेने वैद्यकीय तज्ज्ञ नेमावेत

भाजपच्या संजय पवार यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : वार्ताहर नवी मुंबई महापालिकेने नोडल ऑफिसर किंवा पालिकेच्या नियुक्तीने वैद्यकिय तज्ज्ञ नेमण्याची मागणी भारतीय जनता पक्ष कामगार सेलचे प्रदेश सचिव संजय पवार यांच्याकडून आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे.      नवी मुंबई महापालिकेने वाढत जाणार्‍या कोविड रुग्ण संख्येसाठी नवी मुंबईमधील काही छोट्या …

Read More »

पनवेलमध्ये 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला उत्तम प्रतिसाद

आठवडाभरात 4202 जणांनी घेतला डोस पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये दिनांक 1 मे ते 8 मे या आठवड्यामध्ये 4202 इतक्या नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळालेला आहे. हे लसीकरण वय वर्ष 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना केले असून महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक …

Read More »

नवीन पनवेलमधील झोपडपट्टीवासीयांना अन्नदान

पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल येथील पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेमार्फत 26 एप्रिलपासून सोमवार व शुक्रवार अन्नदान वाटप करण्यात येते. त्याचे सातत्य ठेवत पंचशील नगर, आदई तलाव झोपड्या, सेक्टर 6 समोरील झोपड्यांमध्ये सुमारे 300 लोकांना मोफत अन्नदान करण्यात आले. या अन्नदानाच्या कार्याला सनी कैकाडी हे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी या …

Read More »

जासई हायस्कूलमध्ये कर्मवीर अण्णांची पुण्यतिथी

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी, शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी गोरगरिबांपर्यंत पोहचवणारे त्यांना शिक्षणाचे द्वार उघडून देणारे भगिरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 62वी पुण्यतिथी करण्यात आली. कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेला …

Read More »

कोरोनामुळे बिघडतेय कौटुंबिक स्वास्थ्य

मानसिक तणाव, कलहाने वाढले तंटे; पोलिसांत वादाच्या शेकडो तक्रारी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे आजारपणाव्यतिरिक्त लॉकडाऊन, आर्थिक अडचणी यांमुळे मानसिक स्वास्थ्यात बदल होत आहे. शुल्लक कारणांवरून लगेच राग येणे, चिडचिड यात वाढ होत आहे. लॉकडाऊन काळात सतत घरात असल्याने घरातल्या व्यक्तींबरोबर अनेक वाद होतात, परिणामी वाद टोकाला जाऊन अनेकांना …

Read More »

शॉर्टसर्किटमुळे भरधाव टेम्पोला आग

वाहनचालक, क्लीनर बचावले खोपोली ः प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव टेम्पोला आग लागल्याची घटना रविवारी (दि. 9) सकाळी 7.30च्या सुमारास घडली. आगीत टेम्पो जळून खाक झाला. आग लागल्याचे लक्षात येताच चालक बन्सीलाल यादव (उत्तर प्रदेश) आणि क्लीनर तुफानी गौड  (नेपाळ) यांनी वाहनातून उडी घेतली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु टेम्पोचे …

Read More »

हातभट्टी दारू विक्रेत्यावर कारवाई

म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळा पोलीस अनधिकृत व्यावसायिक, बेकायदेशीर देशी-विदेशी व हातभट्टी दारू विक्रेत्यांविरोधात विशेष कारवाई करणार आहे. एखाद्या प्रसंगात पोलीस स्वतःच फिर्यादी होऊन संबंधित अनधिकृत व्यावसायिकावर गुन्हा नोंदविणार आहेत. त्या अनुषंगाने नुकताच म्हसळा पोलिसांनी पाभरे येथे हातभट्टी दारू विक्रेता रमेश वेटकोळी याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार …

Read More »

वीकेण्डनंतरची बाजारपेठेतील गर्दी टाळा

भाजपच्या शर्मिला सत्त्वे यांचे आवाहन माणगाव ः प्रतिनिधी संपूर्ण जगाला कोरोना महामारीने सळो की पळो करून सोडले आहे. माणगाव तालुक्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत जास्त प्रमाणात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तरी माणगाव तालुक्यातील नागरिकांनी दर शनिवार, रविवारी होणार्‍या वीकेण्ड लॉकडाऊननंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन भारतीय जनता पक्ष …

Read More »