Breaking News

Monthly Archives: May 2021

कर्जतची पर्यावरणपूरक शहराकडे वाटचाल

कचरा ही समस्या नसून धनसंपत्ती आहे हे शासनाचे रिसोर्स पर्सन रामदास कोकरे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे कचरा हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाचा विषय बनविला आहे. देशातील आणि जगातील अनेक विद्यार्थ्यांनी पीएचडीसाठी कचराशून्य डम्पिंग ग्राऊंड हा विषय निवडला आहे. त्यात ब्रिटनमधील जॉर्जिना बोनी ही विद्यार्थिनीदेखील आहे. दापोली प्लास्टिक मॉडेलवर …

Read More »

कोरोनाविरुद्ध जोरदार लढा

वैश्विक महामारी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात हाहाकार उडाला आहे. देशातील रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत चालले असून, आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. दुसरीकडे या संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार एकाच वेळी अनेक पातळ्यांवर समर्थपणे काम करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. दोन वर्षे झाली तरी कोरोना नामक दृष्टचक्र थांबण्याचे …

Read More »

कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाला मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वाढत्या कोरोना संसर्गादरम्यान शनिवारी एक दिलासादायक बातमी समोर येतेय. ’ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने कोरोनावर उपचारासाठी डीआरडीओकडून तयार करण्यात आलेल्या आणखीन एका औषधाला आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या ’इस्टिट्युट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अ‍ॅण्ड अलायन्स सायन्सेस’ तसेच हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी एकत्रित …

Read More »

सिंधुदुर्गात आजपासून होणार कडक लॉकडाऊन

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग होत असल्याचे आढळून आले असून त्याची गंभीर दखल घेत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनची घोषणा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार 9 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 15 मे रोजी …

Read More »

आघाडी सरकारने कोकणाला वार्यावर सोडलंय -प्रसाद लाड

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान भाजप नेते प्रसाद लाड यांनी आघाडी सरकारने कोकणाला वार्‍यावर सोडलंय, असे म्हणत निशाणा साधला आहे.  भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कोकणाने आजवर शिवसेनेला …

Read More »

देशात कोरोनाचे तांडव

24 तासांत चार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मृत्यूचे अक्षरशः तांडव पहायला मिळत असून, देशात अवघ्या 24 तासांमध्ये चार हजारांहून अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही देशातील एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद आहे, तसेच सलग चौथ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण आढळून …

Read More »

मुंबईत कोरोना आकड्यांची बनवाबनवी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, यावरून राज्य सरकार मुंबईत कोरोना आकड्यांची बनवाबनवी करून जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

प्रसिध कृष्णाला कोरोनाची लागण

कोलकाता ः वृत्तसंस्थाकोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेला तो केकेआरचा चौथा खेळाडू आहे.यापूर्वी वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि टीम सेफर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आयसीसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौर्‍यासाठी कृष्णाची स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून निवड झाली आहे.प्रसिधच्या …

Read More »

इंग्लंड दौर्‍यासाठी कडक नियमावली

टीम इंडियाला दोनदा राहावे लागणार विलगीकरणात नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी आणि इंग्लंड दौर्‍यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या दौर्‍यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कडक क्वारंटाइन नियमावली तयार केली आहे. टीम इंडियाला भारतातील बायो बबलमध्ये आठ दिवस, तर इंग्लंडला पोहचल्यानंतर 10 दिवस …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून महापौर निधीसाठी 25 लाख रुपयांची मदत जाहीर

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजूंना मदत करण्यात आली. त्यांचे सेवाकार्य सुरूच असून, महापौर निधीसाठी त्यांनी 25 लाख रुपये देण्याचे शनिवारी (दि. 8) जाहीर केले. हा निधी येत्या सोमवारी सुपूर्द करण्यात येणार आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल …

Read More »