मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई सुरू आहे. ती आरक्षण मिळण्याच्या बाजूने यशस्वी झाली तर आपण जिंकलो असे मानले जात आहे. प्रत्यक्षात हा प्रश्न केवळ आरक्षणाचा नसून तो कसा आर्थिक आहे हे समजून घेण्याची गरज आहे. घरांत माणसे उपाशी असताना घरांतच दडवून ठेवलेल्या भाकरी म्हणजे काळा पैसा, भ्रष्ट करपद्धती आणि असुरक्षिततेतून सुटका …
Read More »Monthly Archives: May 2021
पनवेलमध्ये ‘स्वयंसिद्धा’तर्फे कोविड लसीबाबत जनजागृती
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो, पुणे-महाराष्ट्र आणि गोवा राज्य माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा-रायगडच्या वतीने रायगड जिल्ह्यातील या कॅम्पेनचे समन्वयक महादेव जयभाये यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता काशिनाथ साळवी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत व कोविड लसीकरण जनजागृती …
Read More »नवीन पनवेलमध्ये पोदी शाळेत लसीकरण केंद्र सुरू करा; नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांची मागणी
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये रोज वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यामुळे होणारे मृत्यू, याशिवाय तज्ज्ञांचे मते देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन पनवेलमध्ये पोदी शाळेत नवीन लसीकरण केंद्र सुरू करा, अशी मागणी भाजपच्या महाराष्ट्र ओबीसी सेलचे उपाध्यक्ष व नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. …
Read More »कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर उरण नगर परिषदेची दंडात्मक कारवाई
उरण : वार्ताहर राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातही कमालीचे कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. उरण शहरातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता उरण नगर परिषदेच्या वतीने शहरात बुधवार (दि. 5) पासून दंडात्मक कारवाई व दंड वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. बुधवार ते शुक्रवार या दिवसांत …
Read More »सिडकोकडून मेट्रोची यशस्वी चाचणी
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोकडून शुक्रवारी (दि. 7) आगार प्रवेश छन्नमार्गावर आणि तळोजा आगारातील चाचणी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात येऊन, ही चाचणी यशस्वीरीत्या झाली. या वेळी एकूण 850 मीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो धावली. सुरक्षिततेच्या कारणास्तव मेट्रोचा वेग कमी ठेवून तो 65 कि.मी. प्रती तास इतका राखण्यात आला. या प्रसंगी …
Read More »पनवेल महापालिका प्रभाग 16मध्ये स्वतंत्र लसीकरण केंद्र उपलब्ध करा; नगरसेविका राजश्री वावेकर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक 16साठी स्वतंत्र लसीकरण केंद्राची उपलब्धता करा, अशी मागणी भाजप नगरसेविका राजश्री वावेकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका वावेकर यांनी निवेदनात म्हटले की, शासनाकडून 18 ते 44 वयोगटातील सर्वच नागरिकांना लसीकरण करण्याबाबतचा अत्यंत …
Read More »दुर्बल घटकांना मिळणार महापौर निधीतून अर्थसहाय्य
पनवेल :प्रतिनिधी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय कारणांसाठी तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कारणांस्तव पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी लोकसहभागातून महापौर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी केले आहे. महापौर सहाय्यता निधी अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजूंना गंभीर आजारांसाठी (कोविड …
Read More »‘मविआ’त ऑल इज नॉट वेल!; काँग्रेस आमदार जिशान सिद्धकींचा मंत्री परबांवर निशाणा
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा मानापमान नाट्य रंगल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचे आमंत्रण न दिल्याने काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी हे चांगलेच संतापले आहेत. सिद्दीकी यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना गंभीर आरोप सुद्धा केले …
Read More »राज्यात 18 ते 44 वयोगटाच्या टप्प्यातही वयानुसार पडणार गट
लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांचे संकेत मुंबई ः प्रतिनिधीदेशभरात 1 मेपासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरणाच्या तिसर्या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार लसींच्या उपलब्धतेनुसार काही राज्यांनी हे लसीकरण सुरू केले. महाराष्ट्रातदेखील त्याची मोजक्या केंद्रांवर सुरुवात करण्यात आली, मात्र केंद्रांवर गोंधळ उडत असल्याने आता राज्य सरकार 18 ते 44 या वयोगटासाठीच्या लसीकरणाच्या …
Read More »चौकजवळील एनडी स्टुडिओला आग
खोपोली, मोहोपाडा ः प्रतिनिधीसुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या चौकजवळील एनडी स्टुडिओला आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि. 7) दुपारी घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र सेट जळून नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.चौक-कर्जत रस्त्यावर एनडी स्टुडिओ असून, येथे फिल्मी दुनिया हे चित्रपट थिमवर आधारित पार्कही आहे. या ठिकाणी हिंदी आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper