Breaking News

Monthly Archives: May 2021

प. बंगालमधील हिंसाचाराचा भाजपकडून जाहीर निषेध; माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट -विक्रांत पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त सध्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बंगालमध्ये अमानुष हिंसाचार सुरू आहे, बंगाल जळत आहे आणि विजयाचा उन्माद डोक्यात गेल्याने ममता बॅनर्जी हे मुकसंमत्तीने बघत आहेत. या माणुसकीला काळीमा फासणार्‍या गोष्टीचा जाहीर निषेध भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील …

Read More »

नियोजित पक्षी अभयारण्याबाबत राज्य सरकारचे उदासीन धोरण; तातडीने कार्यवाहीची पर्यावरणप्रेमींकडून मागणी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ एनआरआय येथील पाणथळची जागा पक्षी अभयारण्य म्हणून विकसित करण्याची योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानुसार संबंधित विभागाला आदेश दिले होते, परंतु सध्याच्या आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे ही योजना कागदावरच राहिल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करून एनआरआयसह पांजे-फुंडे येथील …

Read More »

‘सीकेटी’मध्ये स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची पुण्यतिथी

पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या नावाने व आशीवार्दाने सुरू करण्यात आलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदाकॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय आणि नवीन पनवेल येथील सीकेटी कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 7) अभिवादन करण्यात आले. जनार्दन भगत शिक्षण …

Read More »

कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा; नवी मुंबईत 50 टक्के खाटा रिक्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पंधरा दिवसांपूर्वी शहरात सर्वच प्रकारच्या खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता. रुग्णांना खाटांच्या प्रतीक्षेत थांबावे लागत होते. शहरातील ही गंभीर परिस्थिती आता बदलली आहे. दैनंदिन रुग्ण तीनशेच्या घरात आले असून पालिकेच्या डॅशबोर्डवर शहरातील रुग्णालयांमध्ये 50 टक्के खाटा रिक्त असल्याचे चित्र आहे, मात्र अतिदक्षता, …

Read More »

बिकट वाट

लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यावरच देशात कोरोना महासाथीची दुसरी लाट अनपेक्षितपणे येऊन आदळली. या दुसर्‍या लाटेत तरुणांमधील संसर्ग मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागल्याने 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरणही सुरू करावे लागले. देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा सुरळीत सुरू ठेवायचा असेल तर नोकरी-व्यवसायात सक्रिय असणार्‍यांना फार काळ घरात ठेवून चालणार नाही. त्यामुळे या …

Read More »

कोरोनाविरुद्ध मोहिमेत ‘विरुष्का’चा सहभाग

दोन कोटींची मदत, इतरांनाही आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएल स्थगित झाल्यानंतर घरी परतलेल्या विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यात सहभाग घेतला आहे. ‘केट्टो’सोबत मिळून हे दोघे निधी गोळा करणार आहेत आणि त्यातील प्रत्येक रक्कम ही कोरोना लढ्यासाठी वापरली जाईल. त्यांनी स्वतः दोन कोटींची मदतही केली …

Read More »

भारतात आयपीएल आयोजित करणे चुकीचे नव्हते : गांगुली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे भारतात आयोजन करण्यात कोणतीही चूक नव्हती, परंतु प्रवासामुळेच जैव-सुरक्षा (बायो-बबल) परीघ भेदले गेले, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले आहे. ‘सहा जैव-सुरक्षित परिघांमधील केंद्रांवर आयपीएलच्या आयोजनाची योजना उत्तम होती. जैव-सुरक्षित वातावरणातही कोरोनाचा शिरकाव कसा झाला याचे नेमके कारण …

Read More »

आयपीएलसाठी तीन पर्याय

मुंबई ः प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा दुसरा टप्पा आता भारताबाहेरच होणे शक्य आहे. याकरिता संयुक्त अरब अमिराती (यूएई), इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन पर्याय उपलब्ध असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली. आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी उर्वरित सामने …

Read More »

पेणमध्ये मास्क, सॅनिटायझरचे वाटप

पेण : प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ पेण प्राईडतर्फे पेण तालुक्यातील कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांना नुकताच मास्क व सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले. क्लबचे प्रेसिडेंट शशिकांत भगत, व्हाईस प्रेसिडेंट प्रमोद पाठक, सेक्रेटरी राजेश मुळे, विरेंद्र पटेल, डायरेक्टर सुदर्शन शेळके, प्रशांत भगत, प्रांजल पाठक, हेमंत भगत, चेतन तांडेल, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे …

Read More »

मुरूडमधील आरोग्य केंद्रांना वैद्यकीय साहित्याची भेट

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचा उपक्रम मुरुड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या मुरुड शाखेतर्फ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिमीटर, थर्मल स्क्रिनिंग गन, बीपी ऑपरेटिंग मशीन, ग्लुकोमीटर, फोर इन वन स्टिमर आणि  सॅनिटायझरची भेट देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुरुड ग्रामिण रुग्णालय तसेच तालुक्यातील बोर्ली, नांदगाव, आगरदांडा …

Read More »