Breaking News

Monthly Archives: May 2021

काशीद जेट्टीच्या कामाला वेग

मुरुड तालुक्यातील काशीद या ठिकाणी केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत 112 कोटी रुपये खर्च करून भव्यदिव्य जेट्टी बांधण्याच्या कामाला वेग आला असून सन 2021 अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर जलमार्गाने केवळ दोन तासांत काशीद येथून मुंबई गाठता येणार आहे. पर्यटनस्थळ म्हणून काशीद जगप्रसिद्ध आहे. येथे  पर्यटकांची नेहमी मोठी गर्दी …

Read More »

पनवेलमध्ये दोन नवीन लसीकरण केंद्रे सुरू

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात 45 वर्षांवरील नागरिकांना विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिकांसाठी पालिकेने दोन नवीन लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. यामध्ये टाटा हॉस्पिटल, खारघर येथे पहिले एक शासकीय लसीकरण केंद्र होते. त्यात वाढ करत आणखी एक लसीकरण केंद्र याठिकाणी सुरू करण्यात आले आहे, तसेच खांदा कॉलनी येथील रोटरी क्लब याठिकाणी …

Read More »

तिसर्‍या लाटेची तयारी

दुसरी लाट शिखर गाठण्याआधीच तिसर्‍या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी तिसरी लाट कधीही येऊ शकते असा इशारा अधिकृतरित्या दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट नेमकी कधी आणि कशी येईल, तिचा जोर कितपत असेल याचा अंदाज मात्र तज्ज्ञांनाही अजुन आलेला नाही. तथापि, …

Read More »

आदर्श विवाह सोहळा : अकरा जणांच्या उपस्थितीत निवृत्त मुख्याधिकार्यांच्या कन्येचा विवाह

कर्जत : प्रतिनिधी येथील नगर परिषदेचे सेवानिवृत्त मुख्यधिकारी दादाराव अटकोरे यांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा अवघ्या अकरा जणांच्या उपस्थितीत संपन्न करून कोरोना महामारीच्या काळात समाजापुढे एक आदर्श ठेवला. शासनाने कितीही निर्बंध आणले तरी त्याचे तंतोतंत पालन होतेच असे नाही. मध्यतंरी विवाह सोहळ्यासाठी 50 जणांची उपस्थिती असावी असा आदेश होता मात्र …

Read More »

अलिबाग येथील कौटुंबिक न्यायालयाचे उद्घाटन

अलिबाग : वैवाहिक वादाची तसेच कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे जलदगतीने व सामोपचाराने निकाली निघावीत या हेतूने अलिबाग येथे सुरु करण्यात आलेल्या कौटुंबिक न्यायालयाचे मंगळवारी (दि. 5) उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. रायगडच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे, पालकमंत्री …

Read More »

कर्जतमध्ये 18 ते 45 वयोगटासाठीही लसीकरण

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार शहरात तीन तीन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यापैकी पहिले लसीकरण केंद्र गुरुवारी (दि. 6) सुरू करण्यात आले. आज पहिलाच दिवस असल्याने लस घेण्यासाठी नागरिकांनी पहाटे पाच वाजल्यापासूनच गर्दी केली होती. या केंद्रावर 18 ते 45 वयोगटासाठीही लसीकरण करण्यात आले. कर्जत उप जिल्हा …

Read More »

आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई; सुधागडातील दांड कातकरवाडीतील महिलांची घोटभर पाण्यासाठी वणवण

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आदिवासी वाड्यांना भीषण पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, दांड कातकरवाडीतील लहानग्यांसह वृद्ध महिलांची घोटभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात फरफट होत असल्याचे चित्र दिसून येतंय. उन्हाळ्यात उद्भवणार्‍या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील काही गावात नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. तर बहुतांश ठिकाणी नदी, विहिरी, तलावांतील पाण्याचा वापर …

Read More »

लसीकरणाचा वेग कायम राखा

पंतप्रधानांची उच्चस्तरीय बैठकीत राज्यांना सूचना नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 6) उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोना संसर्गाचा राज्य आणि जिल्हानिहाय आढावा घेतला. या वेळी पंतप्रधानांनी औषधांची टंचाई आणि लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिले. राज्यांनी कोरोना लसीकरणाचा वेग कायम राखावा, अशी …

Read More »

गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्र नको

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनागरिकांना होणार्‍या मनस्तापाचा विचार करून खारघरमधील गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्राला परवानगी देऊ नये, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.खारघर सेक्टर 12मधील गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्राला परवानगी न देण्याबाबत नगरसेवक शत्रुघ्न …

Read More »

सातार्‍यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर दगडफेक

मराठा आरक्षण प्रकरणाचे पडसाद सातारा ः प्रतिनिधीसर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर दुसर्‍या दिवशी सातार्‍यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. येथे गृहराज्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गोवर्‍या पेटवत तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांवर दगडफेक करीत तोडफोड करण्यात आली आहे.सातार्‍यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका परिसरातील निवासस्थानासमोर गुरुवारी (दि. 6) अज्ञात …

Read More »