वर्धा : येथे रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाल्याने महाराष्ट्रातील काळाबाजार थांबणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील गरिबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होणार असून देशातील इतरही ठिकाणी ते पुरविले जाईल, पण वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता असेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. वर्ध्यातील सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरातील …
Read More »Monthly Archives: May 2021
मायकल हसी भारतातच राहणार!
मुंबई ः प्रतिनिधी आयपीएल स्थगितीनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकून पडलेत. 15 मेपर्यंत भारतातून येणार्या विमान वाहतुकीवर ऑस्ट्रेलियन सरकारने बंदी घातली. त्यामुळे ऑसी खेळाडू मालदिव किंवा श्रीलंकेत आसरा घेण्याचा पर्याय शोधत होते. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सुरक्षितरीत्या भारत सोडले असून ते मालदिवच्या दिशेने प्रवास करीत आहेत, पण चेन्नई सुपर …
Read More »आयपीएल स्थगितीमुळे कोट्यवधींचे नुकसान
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज या संघांतील खेळाडू व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आयपीएलचे 14वे पर्व स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात खेळवण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे, परंतु आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहता ते अवघड वाटते. ही स्पर्धा पूर्ण न झाल्यास …
Read More »भारतातील आयपीएल आयोजनाचे गांगुलींकडून समर्थन
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलच्या 29 सामन्यांनंतर बीसीसीआयला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला, मात्र यानंतरही बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतात आयपीएल खेळवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असतानाही इंडियन प्रीमिअर लीगच्या आयोजनावरून टीका होत आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा संयुक्त …
Read More »टी-20 लीगसाठी करार करण्यापूर्वी गृहपाठ करा
‘एसीए’ने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना झापले नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकून पडलेत. 15 मेपर्यंत भारतातील विमान वाहतुकीवर ऑस्ट्रेलियन सरकारने बंदी घातलीय. त्यामुळे ऑसी खेळाडू आता मालदिव किंवा श्रीलंकेत आसर्याच्या शोधात आहेत. त्याच वेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी …
Read More »महेंद्रसिंह धोनीचा परदेशी खेळाडूंना आधार
मुंबई ः प्रतिनिधी देशातील कोरोना संकटामुळे बीसीसीआयने 10 मिनिटांच्या बैठकीत 14वी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारतातील कोरोनाच्या दुसर्या लाटेचे थैमान पाहून घाबरलेले परदेशी खेळाडू आता घरी कसे जायचे, असा सवाल करू लागले. त्यात अनेक देशांनी भारतातून येणार्या थेट विमानसेवांवर बंदी घातल्याने परदेशी खेळाडूंची चिंता वाढली. अशा वेळी कॅप्टन कूल …
Read More »मुंबई इंडियन्स आली धावून
परदेशी खेळाडूंसाठी खासगी चार्टर्ड विमानाची सोय नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यावर सर्वांत जास्त समस्या येत आहे ती परदेशी खेळाडूंच्या घरवापसीची. त्याचबरोबर बीसीसीआयला ही परिस्थिती हाताळणे थोडेसे कठीण जात आहे. कारण कमी वेळात त्यांना बर्याच गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ हा बीसीसीआयच्या भरवशावर न बसता …
Read More »पोलादपूर तालुक्यामधील परसुले गावातील प्राथमिक शाळेची इमारत पुन्हा उद्ध्वस्त
पोलादपूर : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात छप्परावरील कौले उडालेली पोलादपूर तालुक्यातील परसुले गावामधील प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरुस्ती केल्यानंतर मंगळवारी (दि. 4) संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामध्ये ही शाळा पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाली आहे. पोलादपूर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळीवारा व पावसामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर तसेच इमारतींवर कोसळल्या. शहरात पावसाचे काही …
Read More »जिल्हा शासकीय रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचार्यांची तातडीने भरती करा; भाजपची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी येथील रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयात नर्सेस भरतीला सुरूवात झाली आहे. येथील स्वच्छतेची समस्या पाहता चतुर्थश्रेणी कर्मचार्याचीदेखील तातडीने भारती करा, अशी मागणी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुहास माने यांच्याकडे केली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षीत नर्सेस भरतील सुरुवात झाली आहे. …
Read More »गावागावांत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती
उरण : वार्ताहर कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकीकडे अनेक प्रकारच्या नकारात्मक घटना व गैरसमजीतून नागरिकांमध्ये नैराश्यासह भीतीचे वातावरण तयार झाले आहे, तर दुसरीकडे वाढत्या रुग्ण संख्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनावर मोठा ताण वाढत आहे. हे लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी लोकजागृतीसाठी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper