Breaking News

Monthly Archives: May 2021

खोपोलीत निषेध आंदोलन

खोपोली : प्रतिनिधी पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा खोपोलीतील कार्यकर्त्यांनी बुधवारी हातात फलक घेवून आपल्या घराबाहेर निषेध केला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर   तृणमूल काँग्रेसचे गुंड भाजप कार्यकर्त्यांवर खुनी हल्ले करीत आहेत. या हल्ल्याचा तसेच याबाबत मूग गिळून गुपचूप बसलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांचा जाहीर निषेध करण्याचे आवाहन भाजपचे …

Read More »

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा भाजपकडून निषेध

अलिबाग : प्रतिनिधी पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा बुधवारी (दि. 5) अलिबागमध्ये भाजपतर्फे निषेध करण्यात आला. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. विधासभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगाल राज्यामध्ये  हिंसाचार सुरु झाला आहे. या हिंसाचारात भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले …

Read More »

खारघरमध्ये कोविड रुग्णालयांची संख्या वाढवा

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तखारघरमधील कोविडबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड उपचार रुग्णालयांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.खारघरमध्ये कोविड उपचारासाठी रुग्णालयांची वाढ करण्यासंदर्भात नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सभागृह नेते …

Read More »

…म्हणून आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला ः फडणवीस

नागपूर ः प्रतिनिधीमराठा समाजाला दिलेले आरक्षण जर टिकले असते, तर त्याचे सर्व श्रेय भाजपला मिळाले असते. म्हणून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.विषयाची संवेदनशीलता पाहता आतापर्यंत मी राजकीय न बोलण्याचे ठरविले होते, मात्र अशोक चव्हाण, नवाब मलिक हे ज्या पद्धतीने …

Read More »

प. बंगालमधील हिंसेविरोधात रायगडात जोरदार निदर्शने

हिंसाचारातून ममता सरकारचे खरे रूप उघड : आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू केला असून या हिंसाचारात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात आले आहेत. या राजकीय हिंसाचाराचा उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने तीव्र निषेध करण्यात …

Read More »

मराठा आरक्षण रद्द

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णयराज्य सरकार बाजू मांडण्यात अपयशी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश व नोकर्‍यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणार्‍या याचिकांवर बुधवारी (दि. 5) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या वेळी मराठा आरक्षण अवैध असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुनावला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला …

Read More »

दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू इंग्लंडला रवाना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाचा आयपीएल हंगाम अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आला आहे. बीसीसीआयने मंगळवारी दुपारी याची अधिकृत घोषणा केली. आता या स्पर्धेतील विदेशी खेळाडू घरी जाण्याची वाट पाहत आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघातील दोन खेळाडू सॅम बिलिंग्ज आणि ख्रिस वोक्स इंग्लंडमध्ये परतले आहेत.दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्राला कोरोनाचा …

Read More »

बटलरचे यशस्वीला खास गिफ्ट

मुंबई ः प्रतिनिधीआयपीएलचा 14वा हंगाम बीसीसीआयने स्थगित केल्यानंतर सर्व विदेशी खेळाडू मायदेशी परतण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे हे खेळाडू संघातील आपल्या इतर सहकार्‍यांना भेटून घरी जात आहेत. राजस्थान रॉयल्सचा अनुभवी सलामीवीर जोस बटलरने आपला युवा सलामीवीर साथीदार यशस्वी जयस्वाल याला एक खास भेट दिली आहे. बटलरने यशस्वीला एक बॅट दिली आहे.या …

Read More »

‘पीएसएल’चा उर्वरित हंगाम यूएईत?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल 2021) सर्व सहा संघांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) ही स्पर्धा हस्तांतरित करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पत्र लिहिले आहे. पाकिस्तानमध्ये वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अंशतः लॉकडाऊन होण्याचीही चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान सुपर लीगच्या आयोजनावर शंका आहे.ईएसपीएनच्या अहवालानुसार पीएसएलच्या संघांनी पीसीबीला स्पर्धा पाकिस्तानमध्ये …

Read More »

परदेशी खेळाडूंना घरवापसीची ओढ

बीसीसीआय करणार चार्टर्ड फ्लाइटची सोय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआयपीएलचे 14वे पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर परदेशी खेळाडूंना घरवापसीची ओढ लागली आहे, पण काही देशांनी भारतातून येणार्‍या विमानसेवा रद्द केल्याने मायदेशात कसे जायचे, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने 15 मेपर्यंत भारतातील विमानसेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात …

Read More »