पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि महाड तालुक्यातील ज्या गावांना अतिवृष्टीमुळे दरडग्रस्त व पूरग्रस्त होऊन आर्थिक नुकसान, पशूधन व जीवितहानी सोसावी लागली, त्या सर्व गावांचा तज्ज्ञांमार्फत अहवाल करून राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधणार असल्याची ग्वाही जनआंदोलनच्या राष्ट्रीय समन्वय अध्यक्षा मेधा पाटकर यांनी दिली. महाड तालुक्यातील तळीये गावात जुलैमध्ये …
Read More »Monthly Archives: August 2021
नगरपरिषदेसाठी प्रभाग रचना आराखडा बनविण्याचे आदेश
पेण : प्रतिनिधी पेण नगर परिषदेसह राज्यातील सर्व 227 नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचा कालावधी डिसेंबर 2021 या महिन्यात संपत असल्याने निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेला प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे, प्रारूप वॉर्ड रचनेची …
Read More »धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण
मुरूड : प्रतिनिधी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 277 श्रीसदस्यांनी मुरूड तालुक्यातील अनेक गावांत 510 झाडांची लागवड केली आहे. पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीसदस्यांनी मुरूड तालुक्यातील बारशीव, काशीद, चिकणी, माजगाव, मोरे, मुरूड शहर, डोंगरी, आगरदांडा, टोकेखार, वावे, वांदरे, अंदाड या गावात कोकम, फणस, चिंच, जांभूळ, …
Read More »कोरोनाचा ढोलकी विक्रीवर परिणाम
अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाच्या सावटाखाली साजर्या होणार्या गणेशोत्सवात यातील ढोलकीचा आवाज दाबला गेला आहे. आज रस्त्यावर ढोलकी विकण्यासाठी फिरणार्या विक्रेत्यांच्या ढोलकीचा आवाज कुणाच्या कानी पोहचत नाही. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी गावोगावी, शहरातील गल्लीबोळात खांद्यावर पाच, सहा ढोलक्या घेऊन, त्यातील एक ढोलकी वाजवत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ढोलकीविक्रेते दरवर्षी फिरतात. कोरोनाने …
Read More »खोपोली पोलीस ठाण्यात रक्षाबंधन
खोपोली : प्रतिनिधी शालोम एज्युकेशन सेंटर संचालित सोफिया शाळेच्या दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थिनींनी शनिवारी (दि. 21) खोपोली पोलीस ठाण्यात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचार्यांना राख्या बांधल्या. शालोम एज्युकेशन सेंटरच्या अध्यक्षा रूपा मजेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली येथे मतिमंद मुलांची शाळा सुरू आहे. तेथे 27 विद्यार्थी शिक्षण व प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. शाळेच्या …
Read More »भातपिकावर बगळा रोगाचा प्रादूर्भाव; शेती धोक्यात
कर्जत : बातमीदार जुलै महिन्यात कर्जत तालुक्यातील 900 हेक्टर भाताच्या शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकरी आधीच संकटात सापडला असताना आता भाताच्या पिकावर बगळा रोगाने शिरकाव केला आहे.त्यामुळे तालुक्यातील अर्ध्या भागातील भाताचे पीक बगाला रोगाने ग्रासले आहे. कर्जत तालुक्यातील भाताचे पीक जुलै महिन्यात आलेल्या महापुरात माती दगड शेतात घुसून …
Read More »आदिवासी लोकांना भाजीपाला पिकांचा आधार
कर्जत तालुक्यातील आदिवासी समाज कोरोना मुळे लागलेल्या लॉक डाऊनमुळे गेली दोन वर्षे आर्थिक आधार शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.आदिवासी समाज आजही कंदमुळे,जंगलातील मेवा आणि पावसाळ्यात माळरानावर पिकवलेला भाजीपाला यांच्या रोजगारातून कुटुंबाची गुजराण करीत असतो.मात्र गेली दीड वर्षे त्यांना बाजारात आपल्याकडील कंदमुळे, भाजीपाला नेता येत नव्हता आणि त्यामुळे ग्राहकाला हव्या त्या किमतीत …
Read More »तालिबान्यांनी घेतली अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधाराची भेट
काबूल ः प्रतिनिधी तालिबानचा नेता अनस हक्कानीने शनिवारी अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीची भेट घेतली. या वेळी तालिबानने अफगाणिस्तान क्रिकेट संघाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. रिपब्लिक वर्ल्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अनस हक्कानीने अफगाणिस्तान क्रिकेट संघातील सर्व सदस्यांशी आणि हशमतुल्लाह शाहिदीसह निवड मंडळाशी चर्चा केली. या बैठकीला …
Read More »जोस बटलर आयपीएलबाहेर; राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का
जयपूर ः वृत्तसंस्था आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. टीमचा प्रमुख खेळाडू आणि इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर पुढच्या महिन्यात यूएईमध्ये सुरू होणार्या 2021 हंगामाच्या दुसर्या टप्प्यामध्ये खेळणार नाही. बटलरने आपले नाव मागे घेतले आहे. तो आता दुसर्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे आता त्याला कुटुंबासोबत अधिक वेळ …
Read More »प्रतिकूल वातावरणावर मात करून अमित खत्रीचे रूपेरी यश
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अमित खत्रीने जागतिक युवा (20 वर्षांखालील) अॅथलेटिक्स स्पर्धेमधील 10 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेमधील भारताचे हे दुसरे पदक ठरले. समुद्रसपाटीपासून 1800 मीटर उंचीवर हे स्पर्धेचे ठिकाण असल्यामुळे तेथील वातावरणाचा अमितच्या कामगिरीवर परिणाम जाणवला. शर्यतीदरम्यान त्याला श्वासोच्छ्वासाचीही समस्या जाणवत होती, पण तरीही कारकीर्दीतील पहिल्याच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper