Breaking News

Monthly Archives: August 2021

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणशेठ पाटील पंचत्वात विलीन

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ जोमा पाटील यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. 6) सकाळी पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पार्थिवाला मुलगा सचिन पाटील यांनी मुखाग्नी दिला. लक्ष्मणशेठ यांच्या निधनाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर …

Read More »

क्रांतिदिनी 9 ऑगस्टला भूमिपुत्र पुन्हा एकवटणार

‘दिबां’च्या नावासाठी गावोगावी मशाल मोर्चा पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते दि. बा. पाटील यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकर्‍यांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका …

Read More »

सत्यमेव जयते ट्रस्टकडून पूरग्रस्तांना मदत

पनवेल : वार्ताहर काही दिवसांपूर्वी महाड आणि चिपळूण या ठिकाणी अतिवृष्टीमुळे महापूर आला आणि लोकांचे संसार उद्ध्वस्त केले. सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया नेहमीच माणुसकीच्या दृष्टिकोनातून कार्यरत असते. त्यातूनच त्यांनी मोठ्या प्रमाणात या भागासाठी मदतीचा हात दिला आहे. यामध्ये एक टेम्पो धान्य, पीठ, कपडे, ब्लँकेट, बिस्कीट, पिण्याचे पाणी, बल्ब, सॅनिटायझर, हॅण्डवॉश, …

Read More »

काळुंद्रे येथे रेशन किटचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. 5) साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काळुंद्रे येथे भाजपच्या वतीने गरजू नागरिकांना मोफत रेशन किटचे वाटप करण्यात आले. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, वॉर्ड क्रमांक 20 अध्यक्ष रघुनाथ बहिरा,  युवा …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

शैक्षणिक साहित्याचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. त्याअंतर्गत वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेचे नगरसेवक नितीन पाटील यांच्या माध्यमातून पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम सभागृह …

Read More »

धोनीच्या नावासमोरील ब्ल्यू टिक ट्विटरने हटवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणार्‍या महेंद्रसिंह धोनीबाबत मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने धक्कादायक निर्णय घेतला आहे. ट्विटरने धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून वेरिफाईड बॅच म्हणजे ‘ब्ल्यू टिक’ (अकाऊंट विश्वसनीय असल्याचे सांगणारे निळ्या रंगाचे चिन्ह) हटवली आहे. ट्विटरने घेतलेल्या या निर्णयामागचे नेमके कारण कळू शकले नाही.धोनीला भारतातील …

Read More »

गोल्फमध्ये भारतीय खेळाडू पदकाच्या शर्यतीत

टोकियो : वृत्तसंस्थाऑलिम्पिक 2020 ला सुरुवात झाली तेव्हा भारताला हॉकी, बॅडमिंटन, नेमबाजी, कुस्ती, टेनिस अशा क्रीडा प्रकारातून पदक मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. कदाचित अ‍ॅथलेटिक्समधून एखादे पदक मिळेल असे वाटत होते, पण कोणी विचार देखील केला नव्हता की गोल्फमध्ये भारताचा खेळाडू पदकाच्या शर्यतीत असेल.टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी (दि. 7) रोजी …

Read More »

मेजर ध्यानचंद यांचा मोठा सन्मान

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता ध्यानचंद यांच्या नावाने दिला जाणार नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीय खेळाडूंना देण्यात येणार्‍या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल …

Read More »

खेलरत्नांची खाण

ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला दाद देण्यासाठी बहुतेक सर्वच प्रसिद्धीमाध्यमे पुढे सरसावली. सोशल मीडियावर लोकांनी भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा अक्षरश: वर्षाव केला. अजुनही तो सिलसिला चालूच आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये हे यश मिळवले आहे हे विसरता कामा नये. कोरोनाच्या महासाथीमध्ये सरावासाठी वेळ देणे मुश्किल झाले होते. संसाधनांची कमतरता …

Read More »

पनवेलमध्ये आयव्हीएफ सेंटर

पनवेल : वार्ताहर भारताची सर्वांत मोठी फर्टिलिटी ट्रीटमेण्ट्स साखळी असलेल्या इंदिरा आयव्हीएफने पनवेलमध्ये आयव्हीएफ सेंटर उपलब्ध करून दिले आहे. पनवेलमधील के मॉलजवळ व रेल्वे स्थानकालगत हे सेंटर नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. इंदिरा आयव्हीएफने मागील दशकामध्ये 85 हजारहून अधिक जोडप्यांना गर्भधारणेमध्ये मदत केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी प्रख्यात आणि वैद्यकीय तज्ञ …

Read More »