Breaking News

Monthly Archives: August 2021

नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने केली पूरग्रस्तांना मदत

कर्जत : बातमीदार नेरळमधील राजेंद्रगुरूनगर आणि राही हॉटेल परिसरात राहणार्‍या लोकांच्या घरात 22 जुलै रोजी महापुराचे पाणी घुसले होते. तेथील पूरग्रस्तांना नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने नेरळमधील पूरग्रस्तांना एक महिना पुरेल एवढे रेशन व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष …

Read More »

रायगडात काँग्रेससमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान

जुलै महिन्यात अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर आणि महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप या दोन काँग्रेस नेत्यांचे निधन झाले. दोन्ही नेते जनाधार असलेले होते. त्यांची स्वतःची अशी ओळख होती. या दोन नेत्यांच्या जाण्याने रायगड जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वहीन झाला आहे. जनाधार असलेला आणि संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करू शकेल असा नेताच रायगड …

Read More »

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट पराभूत

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने स्वीडनच्या सोफिया मेडालेना धोबीपछाड देत 53 किलो वजनी फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यानंतर काही वेळाने झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत मात्र विनेशला पराभवाला सामोरे जावे लागले. कुस्तीपटू विनेश फोगटने 53 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात …

Read More »

भारताने इतिहास रचला 41 वर्षांनी हॉकीमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक

टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीचा पराभव करीत कांस्यपदक जिंकले. तब्बल 41 वर्षांनंतर भारताला हॉकीमध्ये पदक मिळाले. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने बलाढ्य जर्मनीचा 5-4ने पराभव केला. सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी …

Read More »

खोपोलीतील पूरग्रस्तांना शासनाने मदत करावी

भाजप नगरसेविकेचे तहसीलदारांना निवेदन खोपोली : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग 11 मधील अनेक घरांत पूराचे पाणी घुसून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुरग्रस्तांना शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका अपर्णा मोरे यांनी गुरुवारी (दि. 5) खालापूरचे तहसीलदार इरेश चपलवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.  खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग 11 …

Read More »

नेरळमध्ये निर्माण झाले अनेक कचरा डेपो

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाकडे 100 कंत्राटी कामगार असूनदेखील शहराच्या काही भागात नवीन कचरा डेपो तयार झाले आहेत. रस्त्याने जाणारे नागरिक प्लास्टिक पिशवीत आणलेला कचरा नव्याने तयार झालेल्या कचरा डेपोत फेकून देतात. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नेरळ हद्दीत ग्रामपंचायतीच्या 24 ठिकाणी कचरा कुंड्या आहेत. मात्र प्रशासनाकडून …

Read More »

पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या आशा पल्लवित

कर्जत : प्रतिनिधी पेण को ऑप बँकेसंदर्भात ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळालेच पाहिजेत, बँकेचे असेंट विकून पैसे द्यावेत किंवा राष्ट्रीयकृत बँकेत विलीनीकरण करावे, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे केली आहे. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पेण अर्बन बँक …

Read More »

‘शांतीवन’मध्ये वस्तूंच्या वाटपासह वृक्षारोपण; श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि ‘सीकेटी’चा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 3) शांतीवन नेरे येथे कुष्ठरोगग्रस्त कुटुंबातील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण …

Read More »

स्कूल कमिटी चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गव्हाण विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाच्या स्थानिक ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समितीचे सदस्य, तसेच शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला. समारंभाचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मनोगतात विद्यालयाने …

Read More »

हरित बंदर उपक्रमांतर्गत जेएनपीटीत इलेक्ट्रिक वाहने

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी ग्रीन पोर्ट (हरित बंदर) उपक्रमांतर्गत व शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून जेएनपीटीने आपल्या प्रचालन क्षेत्रामध्ये नऊ इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी गुरुवारी (दि. 5) या इलेक्ट्रिक वाहनांचे उद्घाटन केले. या वेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ व सर्व विभागाध्यक्ष …

Read More »