पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात रविवार (दि. 26) रोजी 0-5 वयोगटातील बालकांसाठी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली. या वेळी 44 हजारांहून अधिक बालकांना पल्स पोलिओचे लसीकरण करण्यात आले. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 येथे उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण …
Read More »Monthly Archives: September 2021
आता मराठवाडा संकटात
कोकणानंतर आता मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला असून गेल्या 14 दिवसांत औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर परिसरात पावसामुळे 35 जणांचा बळी गेल्याचे समजते. याखेरीज शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकारकडून कुठलीही मदत मिळू शकेल, अशी आशाही लोकांना वाटेनाशी झाली आहे. नैसर्गिक आपत्तींमध्ये भरडून निघालेल्या रायगड, तसेच कोकणवासीयांनाही अद्याप आवश्यक तितकी मदत …
Read More »मुंबै बँकेच्या बदनामीविरोधात एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल -आ. दरेकर
मुंबई : प्रतिनिधी मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक आहे. कारण मुंबै बँक आम्ही 1200 कोटींच्या टप्प्यावरून 10 हजार कोटींवर मेहनतीने आणली. मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. या लौकिकास काळीमा फासण्याचे काम दुर्दैवाने काही जणांकडून झाले आहे. त्यामुळे बँकेच्या संदर्भात कोणीही उठसूट वाटेल ते स्टेटमेंट देईल, …
Read More »दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकर्यांची वीजतोडणी
वसुली कारवाईवर भाजपचे टीकास्त्र पनवेल ः रामप्रहर वृत्त वीज बिल थकबाकी वसुलीसाठी आता महावसुली सरकारने राज्यातील गरीब व मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान आखले आहे. धनाढ्य वीज ग्राहकांच्या आणि सरकारी कार्यालयांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीकडे दुर्लक्ष करून गरीब कुटुंबांची वीज कापणार्या ठाकरे …
Read More »जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
रसायनी ः प्रतिनिधी अलिबागमधील खिडकी येथे सामाजिक कार्यकर्ते, माजी मुख्याध्यापक, स्व. व्ही. जी. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा खुल्या गटात साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपली नावनोंदणी 30 सप्टेंबर अगोदर प्रवेश फी 50 रुपये गुगल पेद्वारे भरून दर्शन पाटील (9923952732) किंवा श्रेयस पाटील …
Read More »वर्ल्डकप फायनलसाठी बीसीसीआयची तयारी; 25 हजार चाहते राहणार उपस्थित
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएल सामन्यादरम्यान चाहते स्टेडियममध्ये येऊ लागले आहेत. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि अमिरात क्रिकेट मंडळ (ईसीबी) 25 हजार चाहत्यांना वर्ल्डकप फायनलसाठी बोलावण्याची तयारी करीत आहे, मात्र यासाठी त्यांना यूएईच्या अधिकार्यांची परवानगी घ्यावी लागेल. वर्ल्डकप स्पर्धा ही आधी भारतात होणार होती, पण कोरोनामुळे ती यूएईमध्ये …
Read More »हैदराबादने राजस्थानला नमविले
दुबई ः वृत्तसंस्था मोसमातील पहिला सामना खेळणारा जेसन रॉय (60) आणि कर्णधार केन विल्यम्सन (नाबाद 51) यांनी साकारलेल्या अर्धशतकांच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून मात केली. राजस्थानने दिलेले 165 धावांचे आव्हान 18.3 षटकांत पूर्ण करीत हैदराबादने मोसमातील केवळ दुसर्या विजयाची नोंद …
Read More »गरजूंना जीवनावश्यक किटचे वाटप
पनवेल : हुवेई कंपनीच्या वतीने आणि पनवेल पोलिसांच्या पुढाकाराने पनवेल परिसरातील 585 गरजवंत कुटुंबांना मदतीचा हात म्हणून शहरातील सिंधी पंचायत सभागृह, गोखले सभागृह व पळस्पे बिट परिसर येथे जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने अन्नधान्यासह कोरोना खबरदारीच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझर, साबण, तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटपही करण्यात आले. परिमंडळ …
Read More »‘कोकणात पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध होईल’
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोकण विभागात कृषी पर्यटनाला मोठी संधी असून 40 कृषी पर्यटन केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून ती पर्यटकांसाठी खुली केली आहेत. त्या माध्यमातून कोकणात पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध होईल, असे कोकण विभागीय उपायुक्त मनोज रानडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचालनालनालयाच्या अधिनस्त असलेले …
Read More »खारघरमधील रस्ते दुरुस्तीची संयुक्त सर्वेक्षण व्हावे
ब्रिजेश पटेल यांची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त येथील खराब रस्ते व पावसाळ्यात पडणारे प्रचंड खड्डे याबाबत कार्यकारी अभियंता तात्यासाहेब अहिरे यांना खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली खारघर, तळोजा मंडलातील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भेटून निवेदन दिले. संयुक्त सर्वेक्षण झाल्यास निकृष्ट दर्जाच्या कामांना आळा घातला जाईल, अशी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper