Breaking News

Monthly Archives: October 2021

आर्यन खानच्या कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ

मुंबई : प्रतिनिधीमुंबईतील स्पेशल एनसीबी कोर्टाने आठ आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली. यात शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत ही कोठडी वाढवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि. 26) सुनावणी ठेवली आहे. गेल्या 17 दिवसांपासून कोठडीत असलेल्या आर्यनची शाहरूख …

Read More »

भाजप युवा मोर्चातर्फे दिवाळीनिमित्त किल्ले स्पर्धा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पोस्टरचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त भव्य किल्ले स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. …

Read More »

पटोलेंचे धक्कातंत्र सुरूच; काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्याचे पक्षातून निलंबन

अहमदनगर : प्रतिनिधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सचिन सावंत यांना मुख्य प्रवक्ते पदावरून डच्चू दिल्यानंतर पक्षातील आणखी एका नेत्याला धक्का दिला आहे. यावरून काँग्रेस पक्षातील खळबळ सुरू असल्याचे दिसत आहे. पटोले यांनी आता अहमदनगरमधील पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि विविध पदांवर काम केलेल्या बाळासाहेब भुजबळ यांना पक्षातून अनिश्चित काळासाठी निलंबित …

Read More »

लसीकरणात भारताचा महाविक्रम; कोरोना प्रतिबंधक 100 कोटी लसींचा टप्पा पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोविडविरुद्ध लसीकरण मोहिमेत देशाने गुरुवारी (दि. 21) भारताने एक इतिहास रचला आहे. देशात कोविड लसीकरणात 100 कोटी डोस देण्याचे काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाचे हे यश आहे, असे म्हटले आहे. इतक्या जलद गतीने लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा गाठणारा भारत …

Read More »

सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

अबू धाबी : वृत्तसंस्था गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माच्या (41 चेंडूंत 60 धावा डाव सोडला) अर्धशतकाच्या जोरावर भारताने ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला आठ गडी आणि 13 चेंडू राखून सहज नामोहरम केले. सलग दोन लढती जिंकून भारताने रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणार्‍या ‘अव्वल-12’ फेरीतील महामुकाबल्यासाठी आपली पूर्ण तयारी …

Read More »

श्रीलंका सुपर 12 मध्ये; आयर्लंडचा 70 धावांनी पराभव

अबू धाबी : वृत्तसंस्था वनिंदू हसरंगाची (71 धावा आणि 1 बळी) अष्टपैलू चमक आणि फिरकीपटू महीष थिक्षनाच्या (3/17) प्रभावी गोलंदाजीमुळे श्रीलंकेने ट्वेन्टी-20 विश्वचषकात आयर्लंडला 70 धावांनी नामोहरम केले. सलग दुसर्‍या विजयासह श्रीलंकेने ‘अ’ गटातून ‘अव्वल-12’ फेरी गाठणारा पहिला संघ ठरण्याचा मान मिळवला. श्रीलंकेने दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ …

Read More »

‘एनएमएमटी’च्या 130 विद्युत बस धूळखात

तोटा होत असल्याने सेवा सुरू करण्याची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात आतापर्यंत 180 विद्युत बस दाखल झाल्या आहेत, मात्र यातील फक्त 50 बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. 130 बस या एनएमएमटीच्या बसस्थानकात पडून आहेत. विद्युत बस सुरू करण्याबाबत परिवहन प्रशासनाचे नियोजन नाही. 130 पर्यावरण पूरक …

Read More »

विष्णुदास भावे नाट्यगृहही आजपासून सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून बंद असलेल्या नाट्यगृहांतील तिसरी घंटा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 11 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार 22 ऑक्टोबर पासून पुन्हा वाजणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृदेखील नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी …

Read More »

टाकेदेवीत नवरात्रोत्सवात मोफत चहापाणी व्यवस्था

आमदार महेश बालदी यांचे भाविकांनी मानले आभार पनवेल : रामप्रहर वृत्त नवरात्री उत्सवात दांड फाटा येथील टाकेदेवी देवीचे 20 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या सौजन्याने मोफत चहा पाण्याची सुविधा देण्यात आली होती. याबद्दल भाविकांनी आमदार महेश बालदी …

Read More »

मंदा म्हात्रेंच्या आमदार निधीतून रुग्णालयातील एमआरआय मशीन

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयांमध्ये एमआरआय चाचणी मशीन उपलब्ध करण्याकरिता बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या  आमदार निधीतून एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह चर्चा केली आहे. या संदर्भात आमदार मंदा …

Read More »