Breaking News

Monthly Archives: October 2021

अवैध पार्किंगवर कारवाई करा

भाजप ट्रान्सपोर्ट सेलची मागणी; वाहतूक पोलिसांना निवेदन उरण : रामप्रहर वृत्त जासई ते गव्हाण टाकी व वीरगो यार्ड ते पागोटे उड्डाण पूल (एनएच-4बी) या रस्त्याच्या दुतर्फा अनेक गाड्या अवैधपणे पार्किंग केलेल्या असतात. या गाड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर घरत यांनी केली आहे. या …

Read More »

दिवाळीत कोरोना आकडेवारीबाबत नवी मुंबई महानगरपालिका दक्ष

मृत्यूदरात घट असली तरी काळजी घेण्याचे आवाहन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळीसारखा मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका कोरोना बाधीतांची संख्या वाढू नये याकरिता दक्ष असणार आहे. मृत्यूदरात घट होत असली तरी दिवाळीमध्ये नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी …

Read More »

झोपडपट्टीवासीयांना मिळणार हक्काचे घर; पनवेल मनपा महासभेत पुनर्वसनास मंजुरी

पनवेल ः प्रतिनिधी येथील महापालिकेने झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी पहिले पाऊल उचलत पनवेलमधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या प्रकल्पातून झोपडपट्ट्यांचा विकास करणे, परवडणारी घरांची निर्मिती करणे याकरिता इमारत बांधकाम व पायाभूत सुविधा तयार करण्यास महासभेने बुधवारी (दि. 20) मंजुरी दिली. कोरोना संसर्गामुळे ज्या महिलांचे पती …

Read More »

कामोठ्यात भाजप पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष कामोठे शहर मंडल अंतर्गत विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांचा नियुक्तीप्रदान सोहळा मंगळवारी (दि. 19) झाला. कामोठे येथील भाजपच्या कार्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी त्यांच्या हस्ते पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र …

Read More »

अलिबागच्या शर्विकाची आणखी एक उत्तुंग झेप; गुजरातचे गिरनार शिखर केले सर

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबागची चार वर्षीय बाल गिर्यारोहक शर्विका जितेन म्हात्रे हिच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. तिने गुजरातमधील सर्वात उंच गिरनार शिखर सर केले असून अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली कन्या ठरली आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर वसलेल्या गिरनारच्या गुरुशिखर या सर्वोच्च स्थानी …

Read More »

मविआ सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले; जागर अभियान मेळाव्यात फडणवीसांचा हल्लाबोल

ठाणे ः प्रतिनिधी राज्यात ओबीसी समाजावर आज मोठा अन्याय होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. ओबीसींना न्याय मिळत नाही, तोवर भाजप गप्प बसणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 20) राज्य सरकारला दिला. भाजपच्या ठाणे-कोकण विभागीय ओबीसी जागर …

Read More »

देशाला फसवणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे -मोदी

नवी दिल्ली ः देशाची फसवणूक करणार्‍यांसाठी जगात कुठलीही जागा सुरक्षित असता कामा नये. कोणी कितीही ताकदवान असो. जर ती व्यक्ती राष्ट्रहीत आणि जनहीत यांच्यामध्ये येत असेल तर त्यावर कारवाई करताना केंद्रीय यंत्रणांनी मागे रहाता कामा नये, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मुख्य दक्षता आयोग …

Read More »

अलिबागच्या चिमुकल्या शर्विकाने सर केले गिरनार शिखर

अलिबाग : प्रतिनिधी येथील चार वर्षीय बालगिर्यारोहक शर्विका जितेन म्हात्रे हिच्या शिरपेचात आणखी  एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. तिने मंगळवारी (दि. 19) गुजरातमधील सर्वात उंच गिरनार शिखर सर केले आहे. हे शिखर सर करणारी शर्विका ही भारतातील पहिली कन्या ठरली आहे. आपल्या बारा जणांच्या टीमसह शर्विकाने 18 ऑक्टोबरच्या रात्री …

Read More »

खालापुरात कापलेल्या भातशेतीचे नुकसान

शेतकरी हवालदिल; नुकसानभरपाईची मागणी खोपोली : प्रतिनिधी परतीच्या पावसाने तयार झालेल्या भात पिकांची नासाडी केली असून, शेतात उभे असलेले भातपिक आडवे झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या चार दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतात तयार झालेले भातपीक कापण्यासाठी शेतकर्‍यांनी  सुरुवात केली खरी, पण बुधवारी दुपारच्या दरम्यान पडलेल्या अवेळी पावसाने उभे असलेले …

Read More »

महडमध्ये लग्नाचे प्रलोभन दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पीडिता गर्भवती; आरोपीला अटक खोपोली : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला लग्नाचे प्रलोभन दाखवत शरीरसंबंध ठेवून तिला गरोदर ठेवणार्‍या आकाश पाटील (रा. चिंचवली गोहे, ता. खालापूर) याच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आकाशला अटक केली आहे. महड येथे राहणार्‍या अल्पवयीन मुलीला आकाशने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे खोटे प्रलोभन …

Read More »