Breaking News

Monthly Archives: October 2021

‘सीकेटी’त महिला सक्षमीकरण आणि मुक्ती विषयावर आभासी व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त आंतरराष्ट्रीय कन्या दिन तसेच जागतिक विद्यार्थी दिवस (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती) चे औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे 18 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 …

Read More »

रसायनीत पोलीस भरती लेखी परीक्षा

मोहोपाडा : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासूनचा पोलीस भरतीचा मार्ग सुखकर झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थी गेले काही वर्ष पोलीस भरती लांब गेल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी शिथिलता केली असताना पोलीस भरतीचाही मार्ग सुकर झाला आहे, त्या अनुषंगाने पोलीस भरती प्रक्रिया सुरू …

Read More »

उरण नगर परिषदेचे कार्य कौतुकास्पद

आमदार महेश बालदी यांचे गौरोद्गार रस्ता काँक्रटीकरणाचे भूमिपूजन उरण : वार्ताहर उरण नगर परिषद करीत असलेले कार्य हे कौतुकास्पद असून सर्व नगरसेवक व नगरसेविकेंचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी केले. उरण नगर परिषद हद्दीतील सातरहाटी व हरीपांडव येथे रस्ता काँक्रटीकरण कामाचे भूमिपूजनाच्या वेळी ते बोलत होते. …

Read More »

आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत डॉ. कौस्तुभ राडकरांंचा पराक्रम

पुणे ः प्रतिनिधी पुण्याचे डॉ. कौस्तुभ राडकर यांनी आपली 29वी आयर्न मॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. ही स्पर्धा 17 तासांत पूर्ण करायची असते. हे आव्हान डॉ. कौस्तुभ राडकर यांनी 13 तास 14 मिनिटे आणि 16 सेकंदांत पूर्ण केले. त्यामुळे त्यांना आयर्न मॅन किताब मिळाला आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले …

Read More »

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व

मुंबई ः प्रतिनिधी भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेकडे आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ही स्पर्धा 4 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे रंगणार आहे. सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मुंबईचा 20 जणांचा चमू जाहीर करताना पृथ्वी शॉकडे उपकर्णधारपदाची सूत्रे …

Read More »

किकबॉक्सिंग स्पर्धेत पनवेलचे खेळाडू चॅम्पियन

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग असोसिएशनने पनवेल येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत युनायटेड शोटोकान कराटे असोसिएशनच्या स्थानिक खेळाडूंनी 20 सुवर्ण आणि चार रौप्य अशी एकूण 24 पदके जिंकून चॅम्पियनशिप पटकावली. या स्पर्धेत प्रद्युम्न म्हात्रे, रोहित भोसले, आरव शेट्टी, नवीन पडवाळ, राहुल देशमुख, प्रतीक पोखारकर, प्रणय दुरकर, शशांक शेट्ये, …

Read More »

श्रीलंकेकडून नामिबीयाचा पराभव

आबुधाबी ः वृत्तसंस्था टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीत श्रीलंकेने नामिबीयाचा सात गडी आणि 39 चेंडू राखून पराभव केला. नामिबीयाने श्रीलंकेला विजयासाठी 97 धावांचे आव्हान दिले होतं. हे आव्हान श्रीलंकेने 13 षटके आणि तीन चेंडूंत तीन गडी गमवून पूर्ण केलं. नामिबीयाने विजयासाठी दिलेल्या 97 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. …

Read More »

पनवेलमध्ये शनिवारी ‘दिलखुलास गप्पा’; संवादमालेत शरद पोंक्षे गुंफणार तिसरे पुष्प

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक सेलच्या वतीने संवादमाला पुष्प 3 अंतर्गत प्रसिद्ध अभिनेते तथा लेखक शरद पोंक्षे यांच्याशी दिलखुलास गप्पा कार्यक्रमाचे पनवेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात येत्या शनिवारी (दि. 23) सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम …

Read More »

एक्स्प्रेस वेवर सहा वाहनांचा अपघात

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधीमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका सुरूच असून खंडाळा घाटात सोमवारी (दि. 18) पहाटे सहा वाहनांचा विचित्र व भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्ग वाहतूक पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणार्‍या एका टेम्पोचालकाचे तीव्र उतारावर वाहनवरील नियंत्रण सुटल्याने तो समोरील …

Read More »

आजची शिवसेना उपर्‍यांचे वर्चस्व असणारी; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा राऊतांवर प्रतिहल्ला

मुंबई ः प्रतिनिधीशिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप हा उपर्‍यांचा पक्ष झाल्याची टीका केल्यानंतर त्यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी प्रतिहल्ला चढवला आहे. आजची शिवसेना पूर्णपणे उपर्‍यांचे वर्चस्व असणारी आहे. आपण आपल्या पक्षात असणारी उपर्‍यांची संख्या आणि भाजपमध्ये असलेल्या उपर्‍यांची संख्या याची आकडेवारी जनतेसमोर येऊ द्या, असे थेट आव्हान …

Read More »