पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी सुळसुळाट झाला असून दोन महिलांच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्यांनी खेचून ते पसार झाले आहेत. या घटनांमुळे सध्या महिला वर्गात भितीयुक्त वातावरण आहे. नवीन पनवेल सेक्टर 15 येथील जनता किराणा स्टोअर्स येथे एक 15 वर्षीय मुलगी जात असताना तिला पाठीमागून एका व्यक्तीने जोराचा धक्का …
Read More »Monthly Archives: October 2021
गव्हाणफाट्याची वाहतूक कोंडी फुटणार
चिरनेर महामार्गावर उड्डाणपूल उभारणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हिरवा कंदील उरण : प्रतिनिधी उरण-पनवेल महामार्गावर गव्हाणफाटा हे वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्र बनले असून, नागरिकांसह वाहनचालक व येथील व्यवसायिक कमालीचे त्रस्त आहेत. त्यामुळे आत्ता या वाहतूक कोंडीवर उड्डाणपुलाचा पर्याय काढण्यात आला आहे. त्यामुळे चिरनेर परिसराकडे जाणार्या महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने …
Read More »ऋतुराजचे पुण्यात जल्लोषात स्वागत
पुणे ः प्रतिनिधी आयपीएल 2021 स्पर्धेत चेन्नईडून खेळतांना पुणेकर ऋतुराज गायकवाडने सर्वांची मने जिंकली. ऋतुराज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याचे रविवारी (दि. 17) पुण्यात आगमन झाले. या वेळी पुणेकरांनी फटाक्यांची आतषबाजी करीत त्याचे जल्लोषात स्वागत केले. ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये खेळल्या गेल्या 16 सामन्यांत 635 धावा केल्या आहेत. यात एक …
Read More »‘सॅफ’चे भारताला आठव्यांदा विजेतेपद
माले ः वृत्तसंस्था भारतीय संघाने दबदबा कायम राखताना तब्बल आठव्यांदा ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या चषकावर आपली मोहोर उमटवली. अंतिम सामन्यात भारताने नेपाळवर 3-0 अशी मात करीत मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनात पहिलेच जेतेपद पटकावले. नेपाळविरुद्धचे मागील तीनपैकी दोन सामने जिंकण्यात भारताला यश आले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचे पारडे …
Read More »प्रदीर्घ संघर्षांनंतर मिळविलेले यश रोमहर्षक -आमदार प्रशांत ठाकूर; रोठ बुद्रकमध्ये ग्रामसचिवालयाचे उद्घाटन, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन
धाटाव ः प्रतिनिधी रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सत्तेवर आलेले सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी प्रदीर्घ संघर्षानंतर मिळविलेले यश हे रोमहर्षक असल्याचे त्यांच्या भावनेतून दिसून येते. या यशासाठी त्यांनी 25 वर्षे त्यांच्या विरोधकांविरुद्ध लढा दिला. हे करीत असताना त्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागला. प्रसंगी गुन्हे दाखल होऊन तुरूंगात जावे लागले, मात्र …
Read More »महाडमध्ये कोरोनाचा विसर; मंत्र्यांच्या उपस्थितीत गर्दी आणि धक्काबुक्की
महाड ः प्रतिनिधी महाड नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय भवनाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. 16) पार पाडला. या वेळी झालेली गर्दी आणि धक्काबुक्की पाहता पालिकेलाच कोरोनाचा विसर पडल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, या सोहळ्यास आलेल्या तीन मंत्र्यांनी महाडकरांना केवळ दिवाळीच्या कोरड्या शुभेच्छा, तर तटकरेंना कानपिचक्या दिल्या. महाड पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज नवीन …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे; दसरा मेळाव्यातील टीकेचा फडणवीसांकडून समाचार
नागपूर ः प्रतिनिधी शिवसेनेचा दसरा मेळावा शुक्रवारी मुंबईत झाला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. …
Read More »अलिबागेत अल्पवयीन मुलीला देहविक्रीला लावण्याचा प्रयत्न; फार्महाऊस मालक, महिलांसह चौघांना अटक
अलिबाग : प्रतिनिधीघरातून पळालेल्या अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने देहविक्रीच्या नरकात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार अलिबाग तालुक्यात उघडकीस आला आहे, मात्र या मुलीने अत्यंत हुशारीने या नराधमांच्या तावडीतून पळ काढत मांडवा सागरी पोलीस ठाणे गाठले आणि स्वतःची सुटका करून घेतली. या प्रकरणी दोन महिला व एका फार्महाऊस मालकासह चौघांना …
Read More »रोह्यात श्री धावीर महाराजांचा पालखी उत्सव
सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना रोहे : प्रतिनिधी ग्रामदैव श्री धावीर महाराज पालखी उत्सवाला शनिवारी (दि. 16) पहाटे सुरुवात झाली. मंदिरात धार्मिक विधी, पूजा, आरती झाल्यानंतर रायगड पोलीस दलाच्या वतीने रोह्याचे निरीक्षक संजय पाटील आणि पोलीस पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र सलामी दिली. पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, भाजप उत्तर …
Read More »शिवभक्तांनी बांधले अलिबागच्या कुलाबा किल्ल्याला तोरण
अलिबाग : प्रतिनिधी इतिहासाची साक्ष म्हणून अलिबाग समुद्रात उभा असलेल्या कुलाबा किल्ल्यावर विजयादशमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी (दि. 15) शिवभक्तांनी गोंड्याच्या फुलांचे तोरण बांधले. तसेच किल्ल्यातील तोफांचेही यथासांग पूजन केले. अलिबागमधील गडवाट प्रवास सह्याद्रीचा, स्वराज्याचे शिलेदार, मावळा प्रतिष्ठान या संस्थांचे सदस्य दरवर्षी कुलाबा किल्ल्याला तोरण बांधून आणि शस्त्रपूजन करून दसरा सण साजरा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper