Breaking News

Monthly Archives: November 2021

तळोजातील मैदानात अमली पदार्थांचे सेवन

खारघर : प्रतिनिधी तळोजा सेक्टर 10 मधील मैदानात पथदिवे बंद असल्यामूळे रात्रीच्या वेळी काही तरुण गांजा या अमली पदार्थांचे सेवन  करीत असल्याचे प्रकार सुरू आहे. या मैदानात खेळणी असल्यामुळे मुले खेळत असतात. अंधारात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कोण जबाबदार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. सिडकोने तळोजा सेक्टर 10 …

Read More »

उसर्ली खुर्दमधील अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई; ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला सिडकोचे आश्वासन

पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत नैना क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आश्वासन सिडको नैनाच्या अतिक्रमणविरोधी विभागाचे मुख्य नियंत्रक श्री. जाधव यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील नैना क्षेत्रात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या परिसरात असंख्य इमारती उभ्या राहिल्या असून अनेक …

Read More »

धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी; नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर पनवेलमधील सुकलेले पामचे झाड आणि विद्युत वहिनीवर वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. या कामी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता. प्रभागातील समस्यांचे निरसन करण्यास नगरसेवक विक्रांत पाटील नेहमीच तत्पर असतात. स्वतः जातीने हजर राहून नागरिकांच्या समस्या कशा प्रकारे सोडवता येतील याकडे यांचा जास्त कल असतो. …

Read More »

खोपोलीतील एसएमएस कंपनीच्या जनसुनावणीत ग्रामस्थ आक्रमक

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी रुग्णालयातील जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणारा एसएमएस नावाचा कारखाना आत्करगाव येथे येऊ घातला असून जैविक कचर्‍यामुळे परिसरात प्रदुषण होत नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत अनेक आजारांमुळे जीवनमान कमी होणार असल्याची भिती व्यक्त होत होती. त्यामुळे बुधवारी (दि.17) खोपोलीतील सॅम्युअल मॉल येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या …

Read More »

पनवेल महापालिकेचे फेरीवाला धोरण लवकरच होणार निश्चित

पनवेल : प्रतिनिधी महापालिकेचे फेरीवाला धोरण लवकरच निश्चित होणार असून त्यासाठी सिडकोकडे भूखंडाची मागणी केली आहे, अशी माहिती अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी मंगळवारी (दि. 16) झालेल्या फेरीवाला समितीच्या बैठकीत दिली. अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, सहाय्यक वाहतुक …

Read More »

उरणमधील पाणथळीने घेतला मोकळा श्वास

पाण्याला अटकाव करणारे पाच मार्ग खुले उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील पाणजे पाणथळ क्षेत्रात भरतीच्या पाण्याला अटकाव करणारे पाच बुजवलेले मार्ग खुले करण्यात आले आहे. सिडको, महसूल आणि वन विभागाचे अधिकारी, सोबतच नेटकनेक्ट फाउंडेशन आणि श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे पर्यावरणप्रेमी तसेच मासेमारी समुदायाच्या प्रतिनिधींनी 300 हेक्टरच्या परिसरातील हे पाचही प्रवाह …

Read More »

उरणमध्ये पोलिसांकडून रूट मार्च

उरण : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात उद्भवलेल्या जातीय घटनांच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस परिस्थिती सांभाळण्यासाठी समर्थ असून सतर्क आहेत. जनतेमध्ये तसा संदेश देण्यासाठी मंगळवारी (दि. 16) सायंकाळी 5 वाजता …

Read More »

खारघरमधील सेंट्रल पार्क मेट्रोच्या रस्त्यावर पथदिवे उभारा

सिडकोकडे नागरिकांची मागणी खारघर : प्रतिनिधी सिडकोच्या विद्युत विभागाने खारघरमधील सेक्टर 34कडून सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावर पथदिवे उभारले नसल्यामुळे रस्त्यावर अंधार पसरला आहे. अंधाराचा फायदा घेत काही चोरट्यांकडून लूटमार होण्याची शक्यता आहे. सिडकोच्या विद्युत विभागाने या रस्त्यावर पथदिवे उभारावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.  सिडकोने खारघर शहर …

Read More »

रायगड जर्नालिस्ट संघटनेकडून खोपोलीत पत्रकार कक्षाची मागणी

खोपोली : प्रतिनिधी नगर परिषदेतील कामकाजाबाबत वृत्तांकन करण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीत पत्रकार कक्ष उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रायगड जर्नालिस्ट असोसिएशन या संघटनेने मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रायगड जर्नालिस्ट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. या वेळी संघटनेचे …

Read More »

शिक्षक विजय दरेकर यांना वसंत डावखरे स्मृती पुरस्कार प्रदान

पोलादपूर : प्रतिनिधी नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोतवाल येथील माऊली प्रशालेमध्ये माध्यमिक शिक्षक असलेल्या विजय गोपाळराव दरेकर यांना यंदाचा कोकण विभाग वसंत डावखरे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. भाजप शिक्षक आघाडीतर्फे दरवर्षी गुणवंत शिक्षकांना वसंत डावखरे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. ठाणे येथे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल …

Read More »