उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील वेश्वी येथील तीन कोटी 42 लाख रुपये खर्चाचा बर्फ कारखाना व शीतगृह प्रकल्प गेली 12 वर्षे धूळ खात पडला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा वापर हा काही लोकांनी आपल्या दारू अड्ड्यासाठी बनविला आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री अस्लम शेख यांनी सदर प्रकल्पाच्या कामाची चौकशी …
Read More »Monthly Archives: November 2021
माणगाव, श्रीवर्धन, म्हसळ्यात अवकाळी पाऊस; नागरिकांची तारांबळ; आंबा, काजू पिकांचे नुकसान
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यात बुधवारी (दि. 17) पहाटेच्या सुमारास मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याने नागरिकांची पुरती तारांबळ उडाली. माणगावात बुधवारी पहाटे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. त्यानंतर पुन्हा दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले. या काळात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दुपारी चार वाजल्यापासून पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे वातावरणात थोडा गारवा जाणवत …
Read More »ओपिनियन पोल ; यूपीत पुन्हा भाजपला सत्ता
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआगामी पाच राज्यांच्या निवडणुकांची तयारी सगळ्याच पक्षांकडून सुरू आहे. अर्थातच जागांच्या गणितामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला राजकीयदृष्ट्या सर्वाधिक महत्त्व मिळते. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकते, असा अंदाज एका ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. टाईम्स नाऊ आणि पोलस्टॅट यांनी संयुक्तपणे या …
Read More »एसटी संपामुळे श्रीवर्धन बाजारपेठेत मंदी; व्यापारी हवालदिल
श्रीवर्धन : प्रतिनिधी एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे श्रीवर्धन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मंदी पाहायला मिळत आहे. त्यामुळे व्यापारी हवालदिल झाले असून, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे राज्यातील शाळा जवळ जवळ दोन वर्षे बंद होत्या. नुकताच शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात झाली होती, परंतु एसटी कर्मचार्यांनी संप पुकारल्यामुळे खेडेगावातून शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांचे …
Read More »पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरू होणार
शासनाचे संकेत मुंबई ः प्रतिनिधीयेत्या 10-15 दिवसांत राज्यातील पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर हा निर्णय होईल.ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरांत आठवी ते बारावीचे वर्ग सध्या सुरू झाले …
Read More »खोपोलीत शांतता समिती बैठक
खोपोली : प्रतिनिधी त्रिपुरा येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही ठिकाणी दंगली झाल्या, या पार्श्वभूमीवर खोपोली शहरातील जनतेने शांतता राखावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी मंगळवारी (दि. 16) येथे केले. खोपोली पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पवार उपस्थितांना मार्गदर्शन …
Read More »एसटी कर्मचार्यांच्या संपात हस्तक्षेप करून मार्ग काढावा
शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी मुंबई ः प्रतिनिधीआतापर्यंत 36 एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी सातवा वेतन आयोग लागू करावा आणि एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. हा संप चिघळत चालला आहे. सरकारही या संपाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या संपात हस्तक्षेप …
Read More »रेल्वेच्या विविध सेवा प्रकल्पांचे लोकार्पण
मुंबई ः प्रतिनिधीकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्याचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. त्या अंतर्गत पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट येथे रेल्वे सूचना व तक्रार नोंदणी केंद्र सुरू झाले आहे, तर मध्य रेल्वेवर अंबरनाथ, कोपर स्थानकात होम प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. या सेवा प्रकल्पांचे …
Read More »माथेरानच्या घोडेवाल्यांसाठी रस्त्यावर बसविलेले पेव्हरब्लॉक काढले
कर्जत : बातमीदार माथेरानकडे येणार्या रस्त्याला क्ले पेव्हरब्लॉक बसविण्यात आले होते, मात्र त्यावरून पाय घसरून घोडे पर्यटकांसह पडण्याच्या घटना घडल्याने त्या रस्त्याच्या उतारावरील क्ले पेव्हर काढले. त्यामुळे माथेरानमधील घोडे पूर्वीप्रमाणे लाल मातीतून चालणार आहेत. माथेरानमध्ये एमएमआरडीएकडून पर्यावरणपूरक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दस्तुरीपासून माथेरानकडे येणार्या रस्त्यावर …
Read More »एसटीचा संप विद्यार्थ्यांच्या मुळावर; अनेक किलोमीटरची पायपीट
पाली : प्रतिनिधी कोरोना काळात शाळा, महाविद्यालये बंद होती, ऑक्टोबर महिन्यापासून पाचवीपासून पुढील इयत्तांच्या शाळा नियमित सुरू झाल्या खर्या, मात्र एसटी संपाने विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला ब्रेक लागला आहे. शासनाच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper